मित्रांनो, भगवान महादेव हे अशी देवता आहे की जे आराधना केल्यानंतर त्वरीत प्रसन्न होतात. आणि आपल्या भक्तांच्या इच्छा ऐकून त्या लगेच पूर्ण करतात. श्रावन महिना हा भगवान रुद्राचा म्हणजेच भगवान शिवाचा महिना आहे. या दरम्यान भगवान रुद्र पृथ्वी चालवतात असा लोकांचा समज आहे. त्यामुळे या काळात भगवान शंकराला प्रसन्न करणे खूप सोपे आहे. पण, यावेळी जर का पूजा करतांना चूक झाली तर त्याचाही विपरीत परिणाम होतो.
श्रावण हा असा महिना आहे जेव्हा भगवान शिवाने देवी पार्वतीला वरदान दिले होते की, मी तुला आपली पत्नी म्हणून स्विकारील आणि जो कोणी या महिन्यात माझी भक्तिभावाने पूजा करेल त्यांची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेल. म्हणून भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यात अनेक उपाय केले जातात आणि जीवनात सुख-समृद्धी येते. श्रावण महिना सुरू व्हायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. श्रावण महिना ही आपल्याकडं सण-उत्सवाची नांदी असते. या महिन्यात काही गोष्टी मनोभावे केल्यानं अनेक चांगली फळं मिळतात.
यंदा श्रावण महिन्यात पाच सोमवार आहेत. श्रावण महिन्याच्या सोमवारी लोक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकराची पूजा करतात. या महिन्यात तपश्चर्या केल्यानंतर माता पार्वतीला शिव आपला पती म्हणून सापडला असं मानलं जातं. श्रावणाच्या दिवसांमध्ये काही गोष्टी केल्यास नोकरी, घर-कुटुंब, वैवाहिक जीवन, आरोग्य आणि पैशाशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात. म्हणुनच आज आपण श्रावण महिन्याचे महत्त्व आणि भगवानं शंकराला प्रसन्न करण्याचे उपाय जाणुन घेणार आहोत.
श्रावण महिण्यांत धन समृद्धीसाठी आणण्यासाठी हे उपाय करा. जर तुम्हाला सतत पैसाची चणचण भासत असेल तर शिव पार्वतीची मनोभावे पूजा करून त्यांना केशर टाकून दुधाच्या खिरीच्या नैवेद्य दाखवावा. या उपायाने भगवान शिव प्रसन्न होतील त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या अडचणीही बऱ्याच अंशी कमी होतील.जर तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती बळकट करायची असेल तर श्रावण सोमवारी उसाच्या रसाने भगवान शंकराचा रुद्राभिषेक करा. हा उपाय केल्याने तुमची आर्थिक परिस्थिती बळकट होईल.
महादेवाच्या मंदिरात बेलच्या झाडाखाली बसलेल्या जास्तीत जास्त गरजू लोकांना खीर द्यावी. असे केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी टिकून राहते आणि तुमच्या आर्थिक समस्याही संपतात.जर तुमच्या घरातील एखाद्या सदस्याला कोणताही जुनाट आजार किंवा रोग असेल तर अशा व्यक्तीने श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी मोहरीच्या तेलाने भगवान शंकराला रुद्राभिषेक करावा. असे केल्याने पीडित व्यक्तीच्या वेदना कमी होऊ शकतात. जर तुम्हाला शक्य झाले तर सव्वा लाख मातीचे आणि एक कोटी मातीचे शिवलिंग बनवून त्यांची पुजार्याकडून पूजा करून घ्यावी.
हे गरजेचे नाही की तुम्ही हे शिवलिंग एका दिवसात बनवा आणि त्यांची पूजा करा. तुमची इच्छा असेल तर तुम्ही ठराव घेऊन त्यांची हळूहळू पूर्तताही करू शकता. असे केल्याने कुटुंबात सुख-शांती राहते आणि आर्थिक त्रासही कमी होतो. १०८ बेलपत्राने भगवान शंकराची पूजा करा. भगवान शिवाला एक बेलपत्र अर्पण करताना ॐ सांब सदा शिवाय नम:चा सतत जप करावा. यामुळे मनोकामना पूर्ण होतील आणि जीवनात सतत यश मिळेल.
पुराणानुसार समुद्र मंथन श्रावण महिन्यात झाले. त्यावेळी समुद्रमंथनातून १४ रत्ने बाहेर पडली. यापैकी १३ रत्ने आपापसात, देव-दानवांमध्ये वाटली गेली. त्यात विषाचाही समावेश होता. हे हलाहल विष भगवान शंकराला देण्यात आलं होतं. भगवान शंकरानं गळ्यात हलाहलविष घातलं होतं. यामुळं भगवान शंकराचा कंठ निळा पडला, त्यामुळं भगवान शंकराला नीलकंठ म्हटलं गेलं. त्या विषाची उष्णता इतकी होती की देवतांना ती थंड करण्याचा कोणताही मार्ग सुचत नव्हता. शेवटी शिवशंकरानं चंद्रदेवांना डोक्यावर धारण केलं आणि भगवान शंकराच्या मस्तकावर गंगा अवतरली, तरीही तापमान कमी झालं नाही.
तेव्हा भगवान शंकराला हजारो प्रवाहांनी अभिषेक करण्यात आला. तेव्हापासून भगवान शंकराला जल अर्पण करण्याची परंपरा आणि श्रद्धा सुरू आहे.प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या मनोकामना करून जलाभिषेक करते. हे सगळं विधीवत केल्यास अत्यंत शुभ लाभ मिळतो. इच्छापूर्तीसाठी पाण्याबरोबरच दूध, दही, तूप, उसाचा रस, मध, गंगाजल, आमरस, साखर इत्यादींनी शिवाचा अभिषेक केला जातो. श्रावण महिन्यात पूर्ण भक्तीभावानं, श्रद्धेनं शिवशंकराची पूजा केली तर त्याची मनोकामना नक्कीच पूर्ण होते.
शिवाला पाण्याने अभिषेक केल्यानं दीर्घायुष्य प्राप्त होतं आणि अडथळे नष्ट होतात. दुधाने अभिषेक केल्यास निरोगी शरीर प्राप्त होते. उसाच्या रसाचा अभिषेक केल्यानं लक्ष्मी प्रसन्न होते. तुम्हाला समृद्धी प्राप्त होते. सुगंधी द्रवानं अभिषेक केल्यास माणूस प्रसिद्ध होतो. साखरेनं अभिषेक केल्यानं धनधान्याची भरभराट होते. आंब्याच्या रसानं अभिषेक केल्यानं चांगली मुलं प्राप्त होतात. गंगाजलाचा अभिषेक केल्यानं मोक्ष प्राप्त होतो. शिवाला तुपानं अभिषेक केल्यानं समृद्धी येते.
अशा प्रकारे हे काही गोष्टी आहेत ज्या श्रावण महीन्यात कराव्यात.