नमस्कार मित्रांनो,
अश्रू सांगून जातात दुःख किती आहे. विश्वास सांगून जातो जोडीदार कसा आहे. गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे. संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे. वाचा सांगून जाते माणूस कसा आहे. सवड सांगून जातात ज्ञान किती आहे. ठेच सांगून जाते लक्ष कुठे आहे. डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे.
स्पर्श सांगून जातो मनात काय आहे आणि वेळ दाखवते नातेवाईक कसे आहेत. भाऊबंदकीतली चार माणसं एका दिशेने तेव्हाच चालत असतात जेव्हा पाचवा खांद्यावर असतो. संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो की, लोक काय म्हणतील आणि शेवटी लोक हेच म्हणत असतात की राम नाम सत्य है.
माणसाची कदर करायची असेल ना तर जिवंतपणीच करा. कारण तिरडी उचलण्याच्या वेळी तिरस्कार करणारी सुद्धा रडतात. मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे. आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही. हीच खरी व्यथा आहे. म्हणून मित्रांनो माणसांना जिवंतपणीच समजून घ्या.
मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो. चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवतो. कारण औषध जरी कडू असलं तरी ते आपल्या फायद्याचे असते. चांगल्या माणसांच सुद्धा अगदी तसंच असतं. मोठी व्यक्ती संधी मिळाली नाही अशी कधीच तक्रार करीत नाही. संयम नावाच्या कटू वृक्षाचे फळ नेहमी गोड असतात.
जबाबदारी पडली की, ती शिकवतेच. धडपडी नंतर विश्रांती सुखकर असते. स्वाभिमान हा सर्वच सद्गुणांचा पाया म्हणता येईल. मौन ठेवले तर चांगलेच होते, वाईट होत नाही. खरे शहाणपणाचे उत्तर म्हणजे मौन होय. विश्रांती देणारे एकमेव औषध म्हणजेच झोप. जीवनातील यश हे खूप कष्टाने मिळते. दुःखातून येणारी सुख हे मधुर असते.
संशयातून संशयच उत्पन्न होतो. इच्छापूर्ती झाली म्हणजे ती आत्म्याला मधुर वाटते. या जगात सर्वात सोपी आणि निरुपयोगी गोष्ट म्हणजे चिंता करणे. श्रमातून जे फळ मिळत ते सर्व प्रकारच्या सुखात अत्यंत मधुर असते. अशक्य गोष्ट ती जिच्यासाठी प्रयत्न केलेले नसतात. उपाशी पोटी साधे अन्न देखील रुचकर लागते.
जो निष्पाप असतो, त्याला सुखाची झोप लागते. दिवस कितीही मोठा असला तरी त्याचा अंत होतोच. तलवारीपेक्षा लेखणीचे सामर्थ्य अधिक असते. श्रम करणाऱ्याला गोड झोप लागते. थोड्या आनंदात गोडी असते. द्वेष करणाऱ्या माणसाची नजर फार तीक्ष्ण असते. दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो. आपण जिंकू असा विश्वास असलेलेच विजयी होऊ शकतात.
साधे जीवन जगणे ही जगातील सर्वात चांगली गोष्ट आहे. उपकार घेणे म्हणजे स्वतःची स्वातंत्र्य गमावणे होय. सर्वात मोठे वरदान म्हणजे खरा मित्र लाभणे. घाबरट्याला सारेच अशक्य असते. एका रात्रीत तयार झालेल्या बर्फावर विश्वास ठेवू नका. सत्य कोणत्याही कसोटीला घाबरत नाही. सत्याला शपथांच्या आधाराची गरज नसते.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.