सावधान तुम्ही दारातच चप्पल काढता का?

वास्तूशास्त्र

नमस्कार मित्रांनो,

आपण आपल्या घरातला पसारा आवरतो. नीटनेटका ठेवतो परंतु घरा इतकंच महत्त्वाचं असतं आपलं अंगण किंवा शहरी भागाबद्दल बोलायचं झालं तर उंबरठा बाहेरील कॉरिडोर अर्थात सज्जा. अतिथी येण्याचे ते प्रवेशद्वार किंवा माता लक्ष्मीच्या आगमनाचा तो मार्ग दुर्लक्षित ठेवून कसं बर चालेल.

यासाठी पूर्वी रोज अंगण सारवून सडा-रांगोळी काढली जात असे. पण आजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे तेवढं करणे शक्य नसलं तरी त्या परिसरात निदान चपलांचा ढीग नसावा याची काळजी मात्र आपण घेऊ शकतो. कारण वास्तुशास्त्रानुसार घराच्या प्रवेश द्वारा जवळ असलेला चपलांचा ढीग यशाचा मार्ग आडवतो . तो कसा चला जाणून घेऊया.

मित्रांनो वास्तविक असंही म्हटलं जातं की, ज्यांच्या घराबाहेर चपलांचा ढीग असतो तो खरा श्रीमंत. मात्र याचा शब्दशः अर्थ न घेता या मागे असलेला तर्क असा आहे की, चपलांचा ढीग म्हणजे घराशी जोडलेली माणसं ही खरी श्रीमंती.

परंतु जशी श्रीमंती उधळून उपयोग नसतो तसाच या श्रीमंतीचा पसाराही प्रेक्षणीय ठरत नाही. म्हणूनच तो नेहमी आवरलेला असावा. वास्तुशास्त्रानुसार घराबाहेर वापरण्याचा चपला घरात आणू नयेत.

त्या चपलांबरोबर न का रा त्म क ऊर्जा घरात प्रवेश करते. म्हणून चपला नेहमी दाराबाहेर काढाव्यात. मात्र अनेक ठिकाणी चपला चोरीला जाण्याची भीती असते किंवा कुत्रे, मांजरी खेळता खेळता कुरतडून टाकतात. या दृष्टीने चपलांचा कपाटात चपला ठेवणे अधिक योग्य ठरते.

वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात चपला विखुरलेले असतात तिथे शनि देवाची अवकृपा होते. कारण शनिदेव हे शिस्तप्रिय आहेत. तसेच त्यांची पूजा किंवा त्यांच्या नावे दान करताना चपलाही दान केल्या जातात. त्यामुळे चपलांचा पसारा शनिदेवांची वक्रदृष्टी ओढावून घेतो.

म्हणूनच चपला एका कोपऱ्यात नीट मांडून ठेवावे. जुने बुटा किंवा चपला घरात ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. याशिवाय मानसिक आणि आर्थिक समस्या घरात आपले स्थान निर्माण करतात. म्हणूनच वापरात असलेली पादत्राणे सुस्थितीत ठेवणे योग्य ठरते.

बूट आणि चपलांचा रॅक कधीही देव घराच्या भिंतीला किंवा स्वयंपाक घराला लागून ठेवू नये. तसेच चपलाचे रॅक घराच्या पूर्व-उत्तर किंवा आग्नेय ईशान्य दिशेला सुद्धा देऊ नये. चपला रॅकसाठी उत्तर पश्चिम किंवा दक्षिण पश्चिम दिशा उत्तम मानली जाते.

घरात शूज आणि चप्पल विखुरलेली असेल तर घरातील सदस्यांमधील संबंध बिघडू शकतात. तसेच घरात तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे वापरायच्या चपला देखील विखुरलेल्या ठेवू नयेत. घराच्या कोपऱ्यात व्यवस्थित ठेवाव्यात. झोपताना बेडखाली चपला कधीही ठेवू नये त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *