सावधान!! यावेळी पिंपळाच्या झाडाजवळ जावू नका!!

अध्यात्मिक माहिती

पिंपळाच्या झाडाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जातात. या झाडांमध्ये देवी देवतांचा वास असतो आणि त्याची पूजा केल्याने अनेक फायदे होतात. शनि दोषापासून व्यक्तीची मुक्ती होते. त्यामुळे धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या झाडाला अत्यंत उपयुक्त मानले जाते.पिंपळाची पूजा केल्याने पुण्य आणि पूर्वजांच्या आशीर्वाद मिळतात.

शास्त्रज्ञांनी झाडाचा अप्रतिम असे वर्णन केलेले आहे. मात्र, पिंपळाची पूजा करताना तुम्ही कधी वेळेकडे लक्ष दिले का? मग यापुढे पिंपळाच्या झाडाची पूजा करताना वेळेचे भान नक्की ठेवा. चला तर मग जाणून घेऊया हिंदू धर्मशास्त्रात पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याची कोणती वेळ दिलेली आहे.

पिंपळाच्या मुळामध्ये भगवान विष्णू-केशव, फांद्यांमध्ये नारायण आणि पानांमध्ये देवगिरी आणि सर्व देवतांचा वास असतो. पिंपळ वृक्ष हे भगवान विष्णूचे रूप मानले जाते. पिंपळ हे पूर्वजांचा आणि तीर्थक्षेत्राचा निवासस्थान आहे. भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, पिंपल झाड हे सर्वश्रेष्ठ आहे.

तसेच पिंपळ हे भगवान विष्णूचे एकमेव रूप आहे, असं सांगितलं जातं. यावरून पिंपळाच्या झाडाचे महत्व दिसून येत. त्यामुळे पिंपळाची पूजा केल्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो असे म्हणतात. तसेच यामुळे सर्व कार्ये पुर्ण होतात असे म्हणतात.

ज्योतिष शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाची दररोज पूजा केली पाहिजे. कारण यात विविध देवदेवतांच्या वास असतो. त्यामुळे सर्व देवी-देवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. पिंपळाच्या झाडाच्या पूजेनंतर प्रदक्षिणा घालून नमस्कार केल्यास सर्व प्रकारची अडचणी देखील नष्ट होतात.

पूर्वजांचा आशीर्वाद मिळण्यासाठी पिंपळाची पूजा करणे सर्वोत्तम मानले जातात. यांचे आशीर्वाद मिळण्यासाठी पिंपळाची रोपे लावली पाहिजे असे तर त्या म्हटल्या जात.त्यामुळे आजूबाजूला वातावरणात सकारात्मक राहते असे म्हणतात. पिंपळाची रोज पूजा केल्याने पितृदोष नाहीसे होतात. शनिवारी पिंपळाची पूजा करणं फायदेशीर मानले जाते.

मात्र पिंपळाची पूजा सुर्योदयापूर्वी कधीही करू नये. शास्त्रात असे सांगितले. कारण यावेळी पिंपळाच्या काळात धनाची देवी लक्ष्मी तिची बहीण अलक्ष्मी वास करते. तसेच अलक्ष्मीला दारिद्र्यची देवी मानले जात आणि ती जीवनात नेहमीच दारिद्र्य अडचणी आणते. म्हणून सूर्योदयापूर्वी पिंपळाची पूजा करून येणे किंवा या झाडाजवळ जावू नये असे सांगितले जाते.

असे केल्याने घरात दारिद्र्य येतं. नेहमी सूर्योदयानंतर पिंपळाची पूजा करावी असं सांगितलं जातं. पिंपळाच्या मूळामध्ये पाणी अर्पण करून आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावल्यास शनीशी संबंधित त्रास दूर होतात. ज्या व्यक्तीवर शनीची साडेसाती चालू आह.

त्यांनी पिंपळाची पूजा नक्की करावी आणि प्रदक्षिणा घालावी. असे केल्यास शनी महादशापासून मुक्ती मिळते, असं सांगितलं जातं. पिंपळाच्या झाडाची पूजा करताना हे नियम नक्की लक्षात ठेवावे, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल..

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *