मित्रांनो, प्रत्येकालाच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी, समाधान असावे असे वाटत असते. घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद-विवाद, अडचणी असू नयेत यासाठी प्रत्येक जण हा कष्ट घेत असतो. तर मित्रांनो वास्तुशात्रानुसार घरात काही प्राणी आणि पक्षी ठेवणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की हे प्राणी आणि पक्षी घरात सुख-समृद्धी आणतात.
मित्रांनो आपल्या घरामध्ये प्रान्यांमुळे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा त्रास होत नाही. कारण देवी देवतांचे रूप हे प्राण्यांमध्ये असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती लाभेल. कोणते प्राणी आपल्या घरात ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आणि आपल्याला कोणत्याही समस्या येणार नाही. हे आपण आता जाणून घेऊयात.
तर मित्रांनो पहिला प्राणी आहे कुत्रा. हिंदू धर्मात कुत्र्याला भैरव बाबाचा दर्जा देण्यात आलेला आहे. घरात कुत्रा पाळल्याने तो त्याच्या मालकाचा अडचणी स्वतःवर घेतो. यासोबतच घरात कुत्रा पाळल्याने आर्थिक संकटही दूर होते. कुत्रा आपले रक्षण करतो. जर तुम्हाला कुत्रा पाळता येत नसेल तर तुम्ही बाहेरच्या कुत्र्याला रोज एक चपाती खायला द्यावी. असे केल्याने तुमच्या घरात नेहमी सुख शांती टिकून राहील.
दुसरे म्हणजे मासे. मासे घरात ठेवणे शुभ मानले जाते. भगवान विष्णूचा मत्स्या आवतारामुळे हिंदू धर्मात मत्स्यशेतीला खूप महत्त्व दिले गेले आहे. असे म्हणतात की मासे पाळल्याने घरामधे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ज्या काही अडचणी येतात त्या सर्व अडचणी हे मासे आपल्यावर घेत असतात. एक्वेरियम मध्ये एक सोनेरी आणि एक काळा मासा ठेवणे खूप शुभ मानले जाते. काळा मासा आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे कुटुंबांवर जे काही संकट येणार आहे ते संकट दूर होते आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य दूर होते.
तिसरा प्राणी म्हणजे ससा. वास्तुशास्त्रात ससा हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. मान्यतेनुसार ज्या घरात ससे असतात त्या घरात नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक उर्जेचा संचार वाढतो. ससा आपल्या घरात असल्यामुळे आपल्या घरातील मुलांवर जी काही वाईट नजर पडलेली असते ती निघून जाते आणि कोणतीही वाईट नजर आपल्या मुलांवर पडत नाही. ससा आपल्या घरामध्ये असल्याने आपले घर नेहमी आनंदाचे राहते. तसेच सुखी देखील होते. ससा हे शांतीचे प्रतीक मानले जाते.
चौथे आहे कासव. वास्तुशास्त्रानुसार कासवाला पाळल्याने चांगली प्रगती होते. कासवाचे संगोपन केल्याने घरातील सर्व वाईट गोष्टी दूर होतात. तुमचे ध्येय साध्य करणे तुमच्यासाठी सोपे होऊन जाते. कासव हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. कासव हे महालक्ष्मीचे प्रतिनिधित्व करते. जर घरात कासव ठेवणे शक्य नसेल तर तांब्याचे किंवा चांदीचे कासव घरात ठेवल्याने घरात समृद्धी येते.
पाचवे आहे घोडा. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार घोडा पाळणे खूप शुभ मानले गेलेले आहे. हे आपल्यासाठी भाग्यवान मानले जाते. प्रत्येक व्यक्तीला घोडा पाळणे शक्य नसते.तर तुम्ही घरामध्ये घोड्याचे चित्र किंवा घोड्याची मूर्ती ठेवू शकता. याच्या मदतीने तुम्ही तुमचे प्रत्येक ध्येय सहज साध्य करू शकता.
तर मित्रांनो हे होते असे काही प्राणी. जे प्राणी जर तुम्ही घरात पाळले तर यामुळे तुमच्या घरांमध्ये सुख समृद्धी नांदते. कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला भासणार नाही. तुमचे घर नेहमी आनंदी राहील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.