साधे सोपे काही वास्तु उपाय करतात खूपच चमत्कार!

वास्तूशास्त्र अध्यात्मिक

मित्रांनो जर घराचे वास्तुदोष चुकले तर घरामध्ये भांडण तंटे वाद-विवाद चालू असतात घरातल्यांचे एकमेकांचे मत आपल्याला पटत नाहीत सारखे लहान सहान गोष्टीवरून घरांमध्ये भांडण होत असतात व आणखी काही गोष्टी होत देखील असतात व तुमच्या घरामध्ये कोणीतरी उदास किंवा आजारी सारखे राहू शकते.

तर मित्रांनो वास्तुदोष दूर करण्यासाठी चमत्कारिक उपाय आहेत त्यासाठी तुम्हाला तुमचा पैसा खर्च करावा लागणार नाही व तुमचा वेळ देखील खर्च करावा लागणार नाही तर ते साधे सोपे सात उपाय कोणते आहेत चला तर आता आपण जाणून घेऊया.आपण आज ज्या उपायाबद्दल बोलणार आहोत.

त्या उपायांनी घरातली नकारात्मक ऊर्जा नाहीशी हो घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो.घर एकदम सकारात्मकतेने भरनार आहे. सकारात्मकता आपल्या मनात येते आणि आपल्यालाही प्रसन्न वाटायला लागतं.मित्रांनो पहिला उपाय आहे बेड जवळ मोठ्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवायचे आहे.

तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला कोणत्याही व्यक्तीमध्ये जर नैराश्याची लक्षणे दिसत असतील किंवा तुम्हाला स्वतःलाच तसं वाटत असेल तर नैराश्याच्या या समस्येतून बाहेर पडण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार तुम्ही एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्या आणि त्यात रात्रभर फुले टाकून ठेवा सकाळी हे पाणी तुम्ही एखाद्या झाडाला घाला.

त्यामुळे तुमचं मन शांत होईल आणि मन पूर्णपणे शांत होण्यासाठी साधारणपणे 40 दिवस तुम्हाला हे करायच आहे. 40 दिवस पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनस्थितीमध्ये झालेला बदल दिसून येईल.उपाय नंबर दोन जर तुम्ही खूपच भावनिक असाल तुमचं मन सतत अशांत राहत असेल तर तुम्ही तुमच्या हाताच्या एका मुठी मध्ये तांदूळ ठेवा.

आणि अकरा किंवा 21 वेळा ओम नमः शिवाय जप करायचा आहे. जप करून ते तांदूळ पक्षांना खाऊ घाला हा नियम तुम्ही साधारणपणे 16 दिवस करायचा आहे असा केल्यामुळे तुम्हाला घरात सकारात्मक ऊर्जा आलेली जाणवेल घरामध्ये सुख शांती समृद्धी येणार आहे. सोपा उपाय तुम्ही केल्यानंतर एखादा मुक्या पक्षाचा किंवा प्राण्याचा पोट देखील भरणार आहे.

उपाय नंबर तीन तुमच्या घराच्या पूर्वेला एखाद मोठ झाड आहे का बघा आणि झाडाची सावली जर तुमच्या घरावर पडत असेल . तर तुमच्या घराला पूर्व दिशेषी जोडलेला वास्तू दोष आहे.या दोषामुळे घरात सतत भांडण होत राहतात ही भांडणं दूर करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर नेहमी शेंदूर आणि गायीच्या तुपाने तिलक लाऊन ठेवायचा आहे.

त्याचबरोबर त्याच्यावर आपल्याला ओम असे लिहायचे आहे. ज्योतिष शास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. आणि त्यामुळे जर तुमच्या कुंडलीमध्ये तुमचा चंद्र चांगला असेल तर तुम्हाला मानसिक शांतता सहज मिळते पण तुमचा चंद्र खराब असेल तर तुम्हाला सतत अस्वस्थता जाणवते.

तुमची वृत्ती चंचल असते आणि त्यामुळे तुम्ही कशातही रमते अशा परिस्थितीत घरात एक मोठी बकेट किंवा भांड पाण्याने भरा आणि त्यात काही सुगंधित फुल टाकून ठेवा. रोज फुलं आणि पाणी बदला त्यामुळे घरात शांतता राहणार आहे. पाहिलं असेल एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथे एखादा आकर्षक पात्र तांब्याचा असेल किंवा दगडाचा असेल असा मोठा भांड ठेवलेला असतो त्यामध्ये पाणी भरलेलं असतं आणि छानशी फुलं टाकलेली असतात.

ते बघून आपलं मन सहजच प्रसन्न होतं असं एक भांड आपण आपल्या घरातही ठेवू शकतो आणि त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण ही प्रसन्न होई.उपाय नंबर पाच तुम्हाला तुमच्या घराच्या पूर्व दिशेला काही लाकडी वस्तू ठेवायच्या आहेत त्या वस्तू शोभेच्या असल्या तरी चालेल त्यामुळे घरालाही शोभा येईल.आणि बघणार्‍यांनाही प्रसन्न वाटेल

उपाय नंबर सहा घरामध्ये चंदनाची अगरबत्ती लावायची आहे. अगरबत्तीच्या वासाने संपूर्ण घर प्रसन्न होतं. आणि त्यात ही चंदनाची अगरबत्ती असेल तर आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आपल्या शरीराला सुद्धा त्याचा फायदा होतो आणि सहाजिकच घरातलं वातावरण आनंदी असेल.

तर कोणाला भांडण करावसं वाटेल आणि त्यामुळे तुम्ही मानसिक तणावापासूनही मुक्त होतात. तुम्हाला रोज संध्याकाळी चंदनाची अगरबत्ती लावायची आहे. तुम्हाला जर पाहिजे असल्यास दिवसातून दोन वेळा सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता. त्यामुळे तुमचा तणाव निश्चिती कमी होणार आहे.

उपाय नंबर सात तुमची बेडरूम अशी ठेवायची आहे की जेणेकरून येणाऱ्या पाहुण्यांना थेट तुमचा बेड दिसणार नाही. जर तुमच्या दरवाजा जवळच बेड असेल तर त्याला थोड तुम्हाला बदलायचे आहे .वास्तुदोषामुळे दांपत्य जीवनामध्ये अडचणी निर्माण होतात. मित्रांनो वरती मी जे तुम्हाला साथ उपाय सांगितलेले आहे ते तुम्ही आवश्य करून पहा याच्यामुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *