रोज सकाळी स्वामींची पूजा कशी करावी? नक्की जाणून घ्या

अध्यात्मिक राशिभविष्य वायरल

मित्रांनो स्वामींचे सर्व भक्त आहेत. स्वामींची रोज पूजा अर्चना केली जाते. तर मित्रांनो आपण रोज सकाळी किंवा आपल्या देवघरात स्वामी समर्थांचा फोटो तर आपल्या देवघरात असतो. व आपल्या देवघरात स्वामीचा फोटोही पुजतो. तर मित्रांनो, स्वामींची पूजा करताना श्रद्धेने मनोभावे व विश्वासाने ही पूजा करावी.म्हणजेच स्वामी आपल्या कुटुंबावर व प्रत्येक व्यक्तीला स्वामींचे दर्शन होईल व प्रसन्न होतील.

तसेच, स्वामींची पूजा करत असताना न चुकता केली पाहिजे. घरात कोणत्याही व्यक्तीने, पुरुष किंवा महिलांनी ही स्वामींची पूजा केली तरी सुद्धा चालते. तर मित्रांनो स्वामींची पूजा ही कशी करावी हे आपण या माहितीच्या आधारे समजावून घेऊ.

तर मित्रांनो सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून देवघरात प्रवेश करायचा आहे. पण स्वामींची पूजा करत असताना मनात श्रद्धा असावी व विश्वास व मनोभावे ही पूजा करावी म्हणजे त्याचा लाभ आपल्याला नक्कीच मिळेल. पण ही पूजा न चुकता करावी.

अगदी सोपी व सरळ साधी स्वामींची पूजा आहे. मित्रांनो, आपल्या देवघरात स्वामींचा फोटो हे प्रत्येकाच्या घरात असतोच तर पूजा करत असताना आपण खाली बसण्याचे आधी पाठ किंवा छोटी चटई घेऊनच बसावे व स्वामींच्या फोटो समोर बसावे. खाली बसल्यावर एक छोटेसे आरतीचे ताट तयार करायचे आहे.

तसेच ,आरतीचे ताट तयार करत असताना दोन कापसाचे वाती, पाणी, हळद-कुंकू ,अष्टगंध ,सफेद रंगाची फुले, गोड दूध हे सर्व त्या आरतीच्या ताटात ठेवायचे आहे. तर मित्रांनो, स्वामींची पूजा करत असताना स्वामींच्या फोटोला अष्टगंध लावा .अगरबत्ती ,दिवा ,सफेद रंगाची फुले अर्पण करावी. गोड दूध म्हणून प्रसाद दाखवा. पण दूध ठेवताना त्यात तुळशीचे पान टाकायला विसरू नका.

तसेच छोटासा ग्लास भरून पाणी ठेवावे. तर मित्रांनो, हे सर्व झाल्यावर तुम्ही स्वामींच्या समोर हात जोडून नमस्कार करा व मनात कोणताही विचार आणू नका. कोणत्याही गोष्टीचा विचार करू नका. नकारात्मक विचार मनात आणू नका. कारण स्वामींची पूजा करत असताना आपले मन साफ असावे व श्रद्धा विश्वासाने व मनभावे अशी ही पूजा करावी. म्हणजे त्याचे लाभ आपल्याला मिळत राहील.

तर मित्रांनो स्वामींची पूजा झाल्यावर आपण स्वामी समर्थांच्या फोटो समोर बसून एक माळ किंवा अकरा माळ असा जप श्री स्वामी समर्थ असे म्हणून करायचा आहे. मित्रांनो, जे आपण स्वामी समर्थांच्या पुढे जी अगरबत्ती लावली होती. त्या अगरबत्तीची रक्षा आपल्या कपाळावर लावून घ्या. पुन्हा एकदा नमस्कार करा.

तसेच हे सर्व काही झाल्यानंतर स्वामींची पूजा झाल्यावर एक किंवा दोन तासानंतर जे आपण प्रसाद म्हणून ठेवलेले दूध होते ते घरातल्या प्रत्येक व्यक्तीला थोडे थोडे प्रसाद म्हणून द्यावा. दुपारी जेवण झाल्यावर स्वामी समर्थ यांना जेवणाचा नैवेद्य दाखवावा.

घरात येणारे संकट किंवा पैशाची अडचण दूर होईल .
कोणत्याही कामात जर यश मिळत नसेल तर, तेही आपले कमी होतील . तर मित्रांनो, स्वामींची पूजा करत असताना मनोभावे व विश्वासाने नक्कीच करा म्हणजे तुम्हाला याचे यश प्राप्त होईल .ही पूजा अगधी साधी सोपी सरळ आहे. त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळत राहील.

तर ही अशी स्वामींची पूजा रोज सकाळी न चुकता करा म्हणजे तुम्हाला कोणत्याही बाबतीत किंवा आयुष्यामध्ये अडचण येणार नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *