आपल्या हिंदू धर्मात देवपूजा करताना दिवा लावण्याचे एक वेगळेच महत्व आहे. असे मानले जाते की, दिवा न लावता केलेले पूजन अपूर्ण असते. आपण जी काही पूजा करतो त्याचे फळ आपल्याला दिवा लावल्यावरच मिळते. त्याचे कारण असे की, आपण जी काही पूजा करतो ती पूजा भगवंतापर्यंत पोहोचवण्याचे काम दिव्यामार्फतच होते. त्यामुळे देवघरात नेहमी देवपूजा करताना सर्वात आधी दिवा लावाला पाहिजे.
याशिवाय, घरात दिवा लावल्याने घरातील वास्तुदोषही दूर होतात. दिवा लावताना अशा प्रकारे लावावा कि देवपूजा झाल्या नंतरही 3-4 तास तरी दिवा तेवत राहावा. याशिवाय, पूजा झाल्यानंतर लगेचच दिवा मालवणे अशुभ मानले जाते आणि दिवा जितक्या वेळेपर्यंत तेवत असतो तो पर्यंत आपल्याला पूजेचे फळ मिळत राहते. तसेच त्याचबरोबर दिवा तेवत असताना घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होऊन जाते.
व आपल्या जीवनातील सर्व अंधकार निघून जातो. पूर्व व उत्तर दिशेला दिवा लावणे खूप शुभ असते. तर पश्चिम वर दक्षिण दिशेला वेळप्रसंगीच दिवा लावला जातो. दक्षिण दिशा हि पितरांची व यमदेवांची दिशा असल्याने श्राद्ध पक्ष किंवा पितरांची मृत्यू तिथी इत्यादी दिवशी या दिशेला दिवा लावावा. याचबरोबर, नेहमी दिवा लावल्याने आपली फक्त पूजाच पूर्ण होत नाही तर आपल्या जीवनातील अडचणी व बाधा हि दूर होतात.
शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे कि दिवा लावताना काही मंत्रांचा उच्चार केल्यास आपल्या सर्व मनोकामना व इच्छा पूर्ण होतात. आम्ही तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहोत ज्याचा तुम्ही दिवा लावताना त्याचा उच्चार केलात तर तुम्ही जी इच्छा भगवंताकडे व्यक्त कराल ती लगेचच पूर्ण होईल. जेव्हा तुम्ही पूजन करताना दिवा लावता त्या वेळी तुम्हाला या मंत्राचा 3 वेळा जप करायचा आहे.
हा मंत्र असा आहे “शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा, शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोस्तुते” या मंत्राचा 3 वेळा जप झाल्यानंतर आपली जी काही इच्छा असेल ती लवकरच भगवंताकडे प्रकट करावी. असे म्हटले जाते कि दिवा लावून मंत्र म्हटल्यानंतर आपण जर आपली इच्छा भगवंतांना सांगितली तर ती लगेचच भगवंतांपर्यंत पोहोचते आणि आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते.
याशिवाय, सध्या श्रावण महिना सुरू आहे , त्यामुळे, संध्याकाळी जवळील महादेवाच्या मंदिरात जाऊन दिवा लावायचा आणि मनोभावे प्रार्थना करायचा आहे. याशिवाय, श्रीसूक्तपठण करायचे आहे. श्री लक्ष्मी सूत्र पाठ करायचा आहे आणि पाठ करायचा आहे म्हणजे ते वाचायचा आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पूर्णतः धार्मिक आचरण ठेवायचा आहे.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.