रामनवमीच्या दिवशी अवश्य खरेदी करा ‘या’ गोष्टी..

अध्यात्मिक माहिती

यंदाची रामनवमी जर तुम्हाला तुमच्या परिवारासाठी अतिशय स्मरणीय बनवायची असेल, तर रामनवमीला तुमच्या घरात काही गोष्टी आणल्या तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. कोणत्या आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊया..
चैत्र नवरात्रीच्या पाठोपाठ आलेल्या श्रीरामनवमी खूप महत्त्व असतं.

राम नवमी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. तुम्हालाही यंदा राम नवमी तुमच्या परिवारासोबत अतिशय स्मरणीय बनवायचे असेल तर राम नवमीला काही गोष्टी तर तुम्ही घरात आणल्या तर त्यामुळे घरात भक्तीच आणि प्रसन्नतेचे वातावरण राहत असं सांगितलं जातं. या दिवशी काय खरेदी करावं?

तर या दिवशी पूजेच्या वस्तू, पिवळ्या रंगाच्या वस्तू किंवा सोनं खरेदी करावं. यामुळे घरात भरभराट होते. शिवाय राम नवमीच्या दिवशी चांदीचा हत्ती सुद्धा खरेदी करू शकता आणि तो खरेदी करून आपल्या घरात स्थापित केल्यास त्यामुळे तुमच्या घरातील वातावरण समृद्ध बनते.

याव्यतिरिक्त राम नवमीच्या दिवशी श्री हनुमान किंवा श्रीराम आणि माता सीतेची मूर्ती देखील खरेदी करून ती घरात स्थापित करू शकता. या दिवशी तुम्ही घरासाठी सजावटीच्या वस्तूंची खरेदी करू शकता. शिवाय राम नवमीच्या दिवशी वाहन, जमीन इमारत खरेदी करणे देखील शुभ मानल्या जातात. कारण हा शुभमुहूर्त असतो.

या दिवशी घरोघरी धार्मिक ग्रंथांचं वाचन केलं जातं. संध्याकाळी घरात राम रक्षा स्तोत्र म्हटल्या जातात, श्रीरामाची मूर्ती फुलांनी आणि हार आणि सजवली जाते. तसेच देशभरात जन्मोत्सव साजरा केला जातो आणि ठीकठिकाण पालखी मिरवणूक काढली. अयोध्या नगरी तर जन्मोत्सव साजरा केला जातो.

तसेच उत्सवाचे भव्य आयोजन सुद्धा करण्यात येतात. तर तुम्हीसुद्धा राम नवमीच्या दिवसात या काही प्रमुख वस्तू खरेदी करून परिवारासाठी अतिशय खास बनवू शकता आणि राम नवमी ही खास करू शकता..

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *