मित्रांनो, श्रावण महिनातील दुसरा सण म्हणजे रक्षाबंधन. भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा करण्यात येतो. यंदा श्रावणात तिसऱ्या सोमवारी 19 ऑगस्ट 2024 ला रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी बहीण ही भावाचं औक्षण करुन त्याचा मनगटावर राखी बांधते. पण तुम्हाला भावाला टिळा लावण्याची योग्य पद्धत माहितीये का? त्याचबरोबर औक्षणाच्या ताटामध्ये कोणकोणत्या वस्तू ठेवाव्यात? आणि भावाच्या प्रगतीसाठी बहिणीने कोणकोणते उपाय करावे? त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.
ज्योतिषाच्या मते, भावाच्या कपाळावर टिळा लावताना, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही टिळा लावण्यासाठी कोणते बोट निवडले आहे?. भाऊ मोठा आणि बहीण लहान असल्यास करंगळीवर टिळा लावावा. हे तेच बोट आहे ज्याला अनामिका म्हणून ओळखलं जातं. तर भाऊ लहान आणि बहीण मोठी असेल तर बहिणीने अंगठ्याने टिळा लावून राखी बांधवावी. शास्त्रानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी जेव्हा एखादी बहीण टिळासाठी योग्य बोटाची निवड करते तेव्हा तिचा भावाच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो.
जेव्हा लहान बहीण आपल्या मोठ्या भावाला करंगळीने टिळा लावते तेव्हा त्याच्या जीवनात सुख-समृद्धी येते. तर जेव्हा मोठी बहीण तिच्या लहान भावाला अंगठ्याने टिळा लावते तेव्हा त्याच्या जीवनात प्रगती होते. तो प्रत्येक कामात यश मिळवतो आणि निर्भयही होतो. याशिवाय, हे देखील लक्षात ठेवा की टिळा नेहमी सरळ रेषेत लावावा, वाकड्या पद्धतीने नाही. तसंच कुंकवाचा तिळा लावल्यानंतर तांदूळ लावावे. कारण त्याशिवाय टिळा विधी अपूर्ण मानला जातो.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षा सूत्र बांधते. हा सण साजरा करताना पूजेच्या ताटात सात वस्तू आवश्यक रूपात असाव्या.
त्यातील पहिली गोष्ट म्हणजे कुंकू. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी कुंकू लावणे शुभ मानले जाते. या दिवशी बहीण भावाच्या कपाळावर तिलक लावून त्याच्या दीर्घायू होण्याची कामना करते. दुसरी वस्तू म्हणजे अक्षता. कुंकू लावल्यानंतर कपाळावर तसेच डोक्यावर अक्षता टाकणे अनिवार्य असतं. याचा अर्थ भावावर शुभता बनलेली राहो.
तिसरी वस्तू म्हणजे नारळ. नारळ म्हणजे श्रीफळ. श्री अर्थात देवी लक्ष्मीचे फळ. हे फळ देताना बहिणीने प्रार्थना केली पाहिजे की भावाच्या जीवनात सुख-समृद्धी राहो आणि त्याची उन्नती व्हावी. चौथी वस्तू म्हणजे रक्षा सूत्र. रक्षा सूत्र बांधल्याने त्रिदोष शांत होतात. त्रिदोष अर्थात वात, पित्त आणि कफ. या दोषांमुळेच शारीरिक आजार उद्भवतात. मनगटावर रक्षा सूत्र बांधल्याने शरीरात यांचे संतुलन राहतं.
पाचवी वस्तू म्हणजे मिष्टान्न. राखी बांधल्यानंतर भावाला गोड खाऊ घातल्याने नात्यात गोडवा टिकून राहतो. गोड खाऊ घालताना प्रार्थना करावी की नात्यात हा गोडवा नेहमी टिकून राहावा. सहावी वस्तू म्हणजे दिवा. राखी बांधण्याची सुरुवात करत असतानाच दिवा प्रज्वलित करून घ्यावा. दिव्याच्या ज्योतीमुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. आणि शेवटची वस्तू म्हणजे पाण्याने भरलेला कलश. पाण्याने भरलेला चांदीचा किंवा तांब्याचा कलश ताटात असावा. याच्या प्रभावाने भाऊ-बहिणीच्या जीवनात सुख आणि प्रेम स्थायी राहतं.
रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या उजव्या हाताला राखी बांधणे शुभ मानले जाते. शास्त्रानुसार उजवा हात किंवा सरळ हात हा वर्तमान जीवनातील कर्माचा हात मानला जातो. यासोबतच उजव्या हाताने केलेले दान आणि धार्मिक कार्य देव लवकर स्वीकारतो, असेही मानले जाते. त्यामुळे धार्मिक कार्यक्रमानंतर या हातावर कलव वगैरेही बांधले जातात.उजव्या हाताला राखी बांधणे धार्मिक दृष्टीकोनातून शुभ मानले जाते. त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही याचे अनेक फायदे आहेत.
उजव्या हाताला रक्षासूत्र बांधल्याने आजारांपासून दूर राहते. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर शरीराच्या प्रमुख अवयवांपर्यंत पोहोचणाऱ्या नसा मनगटातूनच जातात. अशा स्थितीत या ठिकाणी रक्षासूत्र किंवा राखी बांधल्याने व्यक्तीचा रक्तदाब योग्य राहतो आणि व्यक्तीचा वात, पित्त आणि कफ संतुलित राहतो. हिंदू धर्मात काळा रंग हा नकारात्मकतेचे प्रतिक असल्याचे म्हटले आहे. अशा परिस्थितीत जर एखाद्या बहिणीने आपल्या भावाला काळ्या रंगाची राखी बांधली तर तिला तिच्या आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
याशिवाय भावाच्या मनगटावर देवदेवतांचे चित्र असलेली राखीही बांधू नये कारण ही राखी जास्त वेळ बांधल्याने अपवित्र होते. अशा वेळी चुकूनही भावाच्या मनगटावर अशा प्रकारची राखी बांधू नका. याशिवाय तुटलेली किंवा भंगलेली राखीही वापरू नये. असे केल्याने भाऊबहिणीच्या नात्यात तणाव निर्माण होतो. त्याचबरोबर रेशीम धाग्याची किंवा सुती धागा असलेली राखीच बहिणीने बाबासाठी खरेदी करावे.
अशाप्रकारे राखी पौर्णिमेला भावाच्या रक्षणासाठी बहिणीने कोणकोणते उपाय केले पाहिजे याबद्दलची माहिती आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेतलेली आहे.