पुजविधिशी संबंधित या गोष्टी चुकूनही खाली पडू देऊ नका!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असतेच आणि या देवघरांमध्ये विविध प्रकारच्या मुर्त्या देखील असतात आणि आपण देवघरातील देवतांची अगदी मनोभावे व श्रद्धेने पूजा करीत असतो. जेणेकरून आपल्या अडीअडचणींपासून संकटांपासून देवी देवता आपल्याला मार्ग दाखवतील. त्या संकटातून आपल्याला बाहेर काढतील.

तर तुम्ही दररोज पूजा करीत असताना काही गोष्टींची काळजी घेणे खूपच गरजेचे आहे. तर पूजा विधी समयी तुम्हाला या गोष्टी अजिबात खाली पडू द्यायच्या नाहीत. कारण हे खूपच अशुभ मानले गेलेले आहे. तर पूजेदरम्यान नेमक्या कोणत्या गोष्टी या जमिनीवर पडू देऊ नयेत याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तर प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असते आणि विधिवत आपण पूजा देखील करीत असतो. ही पूजा करीत असताना आपण देवतांपाशी दिवा प्रज्वलित करीत असतो. हा दिवा विझणार नाही याची दक्षता आपण घ्यावी. तसेच जर दिवा विझला तर तो परत प्रज्वलित करावा. परंतु हा जर दिवा खाली जमिनीवर पडला तर त्याच्या संपर्कामध्ये एखादा कागद किंवा प्लास्टिक आले तर हे आपल्याला खूपच नुकसानकारक ठरू शकते आणि भयानक गोष्टींचा सामना देखील करावा लागतो.

त्यामुळे हा दिवा जमिनीवर पडू देऊ नये. तसेच आपण पूजेदरम्यान कुंकू वापरतो. हे कुंकू देखील जमिनीवर पडणे खूपच अशुभ मानले गेलेले आहे. कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. अशावेळी हे कुंकू जर जमिनीवर पडले तर ते केरसुणीने न भरता तुम्ही एखाद्या कापडाच्या साह्याने भरून घ्यायचे आहे.

परंतु शक्यतो करून तुम्ही हे कुंकू जमिनीवर अजिबात पडू देऊ नये. कारण मग यामुळे अनेक अशुभ परिणाम आपल्याला होऊ लागतात. तसेच आपल्या घरामध्ये अनेक देवीदेवतांच्या मूर्ती असतात. या मुर्त्या काचेच्या, तांब्याच्या, दगडाच्या अशा विविध प्रकारच्या असतात. या मुर्त्या देखील तुम्ही जमिनीवर पडू देऊ नये.

कारण या मुर्त्या जर जमिनीवर पडल्या तर त्या भंग पावतात किंवा त्यांना तोडफोड होऊ शकते आणि या मुर्त्या जर तोडफोड झाल्या तर आपल्याला अनेक संकटांचा सामना देखील करावा लागू शकतो. तसेच अनेक प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येऊ लागतात. त्यामुळे मित्रांनो तुम्ही अशा मुर्त्या लहान मुलांच्या हाताशी देऊ नये.

तसेच या मुर्त्या आपल्या हातून खाली पडणार नाही त्याची पुरेपूर दक्षता घ्यायची आहे. जर अशा भंग पावलेल्या मुर्त्या तुमच्या देवघरांमध्ये असतील तर त्या लगेचच विसर्जित करायला हव्यात. तसेच पाण्याचा कलश हा देखील आपल्या देवघरातील महत्त्वपूर्ण मानला जातो. हा पाण्याचा कलश समृद्धीचे प्रतीक मानला जातो. याला शास्त्रामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.

पाणी हे आपल्या जीवनाचे अमृत असते आणि हा पाण्याचा कलश कधीही जमिनीवर ठेवायचा नाही किंवा कलशातील पाणी जमिनीवर सांडू देता कामा नये. त्यामुळे घर प्रवेशावेळी देखील आपण एखाद्या समजूतदार व्यक्तीकडेच पाण्याचा कलश देत असतो.

तर मित्रांनो वरील सांगितलेल्या या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि या गोष्टी तुम्ही पूजेदरम्यान जमिनीवर पडणार नाहीत याची पुरेपूर काळजी घ्यावी. कारण यामुळे मग आपल्याला कोणत्याही संकटांचा सामना करावा लागणार नाही आणि आपल्या जीवनामध्ये अशुभ असे काहीच घडणार नाही. आपली केलेली देवपूजा ही देवांपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि देव आपल्यावर प्रसन्न देखील होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *