मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले गेलेले आहे. आपल्या देवघरांमध्ये विधीवत पूजा अर्चना ही दररोज केली जाते. अनेक मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण प्रार्थना देखील देवांपाशी करीत असतो. तसेच आपल्या घरातील वादविवाद दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी देखील आपण देवांना विनवणी करीत असतो.
हिंदू धर्मात शंखाला पवित्र मानलं गेलं आहे. कुठल्याही धार्मिक कार्यक्रमात शंखनाद करने शुभ मानलं जाते. हिंदू धर्मशास्त्रात देवपूजेबाबत, परंपरांबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी दिल्या आहेत. तर पूजा करताना शंखनाद करण्याचे नेमके महत्त्व काय आहे याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
धर्मशास्त्रानुसार शंख हा भगवान विष्णु आणि देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. शंखात जल घेऊन त्याने श्रीहरी विष्णूला आंघोळ घातल्यास ते भाविकांवर प्रसन्न होतात. तसंच भाविकांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. समुद्रमंथनात जी 14 रत्नं सापडली, त्यात शंखदेखील होता असं म्हटलं जातं.
हिंदु धर्मशास्त्रानुसार शंखाची पूजा कशी करावी याचे काही नियम आहेत. शंखाचा थेट संबंध हा देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूशी येतो. यासाठी विष्णूपूजनासमयी शंख पूजन त्याचा नाद करणं हे लाभदायी ठरतं.
पूर्वीच्या काळी ऋषीमुनी हे आपल्या उपासनेच्या वेळेस यज्ञ करताना देखील शंखनाद करत असत. शंख फुंकल्याने त्यातून जो नाद निर्माण होतो त्यामुळे देव आपल्यावर प्रसन्न होतात. भक्तांच्या हाकेला ते धावून येतात. अनेक अडीअडचणी ज्या काही आपल्या आहेत या अडीअडचणी आपल्या देवांपर्यंत पोहोचतात आणि त्यातून देव आपल्याला योग्य तो मार्ग देखील दाखवीत असतात.
म्हणजेच पूजा करताना आपण शंखनाद केला तर यामुळे देव आपल्यावर प्रसन्न होतात. त्यामुळेच पूजेच्या वेळी शंखनाद करणे खूपच शुभ मानले गेलेले आहे.देवघरात शंख ठेवल्याने देवी लक्ष्मीचा वास घरात कायम राहतो. दक्षिणावर्ती शंख अधिक शुभ मानला जातो. सकाळ-संध्याकाळ शंख वाजवल्याने घरातील अनिष्ट शक्तींचा नाश होतो. तसंच घरातील वातावरण सकारात्मक राहतं.
यामुळे कौटुंबिक वातावरणही चांगलं राहतं. शंखाशी निगडित काही महत्त्वपूर्ण माहिती शास्त्रात शंखाशी निगडित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जो शंख पूजेत वापरला जातो, तो कधीही वाजवू नये. शंख वाजवायचा असल्यास दुसरा शंख वापरावा असं शास्त्र सांगतं.
पूजेतील शंख वाजवल्याने त्याचे पावित्र्य नाहीसे होते. देवघरातील शंख हा लाल कपड्यावर ठेवावा. तसंच पूजेतील शंखात पाणी ठेवून ते पाणी घरात शिंपडावं. शंख वाजवण्यापूर्वी तो गंगेच्या पाण्याने किंवा इतर कुठल्याही शुद्ध पाण्याने शंख साफ करून घ्यावा.
तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे पूजेमध्ये शंखाच महत्व खूपच आहे आणि शंखनाद करणे हे आपल्यासाठी शुभ देखील मांनले जाते. त्यामुळे वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही देखील पूजेच्या दरम्यान शंखनाद अवश्य करावा. याचा लाभ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.