नमस्कार मित्रांनो,
बऱ्यादा आपण एखाद्या व्यक्तीला उसने पैसे देतो. उधार पैसे देतो. त्या व्यक्तीची गरज भागवतो, मात्र कित्येक महिने उलटून सुद्धा, ही समोरची व्यक्ती, आपले घेतलेले पैसे परत करत नाही. उधार पैसे परत करण्यास टाळाटाळ करते.
अशा वेळी आपण काय करावं? अनेक जण शत्रुत्व पत्करतात. समोरच्या व्यक्तीला धमक्या देतात. आणि विनाकारण आपण आपलेे शत्रू वाढवतो. त्यातून क्वचित प्रसंगी आपल्या जिवाला सुद्धा धोका निर्माण होण्याची शक्यता असते.
मित्रांनो अशा वेळी आपण काही प्रभावी ज्योतिष उपाय, वापरून आपला पैसा परत मिळवू शकतो. आज तंत्र-मंत्र शास्त्रातील एक असा उपाय पाहणार आहोत, की ज्यामुळे आपण ज्या व्यक्तीला पैसे उसने दिले आहेत. ती व्यक्ती स्वतः तुमचे पैसे तुम्हाला परत करेल. किंवा तुमचे पैसे परत येण्याची अशी परिस्थिती निर्माण होईल. की तुमचे उधार पैसे तुम्हाला नक्की मिळतील. मित्रांनो तंत्र-मंत्र शास्त्रातील तुम्हाला उपाय सांगत आहोत.
पहिला उपाय – हा तुमचे पैसे एखाद्या व्यक्तीने घेतलेले आहेत. कित्येक दिवस काही महिने उलटलेले आहेत. मात्र पैसे परत मिळत नाही आहेत. अशा लोकांसाठी आहेत.
दुसरा उपाय – हा त्यापेक्षाही प्रभावी आहे. आणि तो कधी वापरायचा ते तुम्हाला लवकरच समजेल. आपण त्याला उपाय जाणून घेऊया. मित्रांनो हा उपाय आपण गुरुवार किंवा रविवार या दोन दिवसांपैकी कोणत्याही दिवशी करू शकता.
गुरुवार किंवा रविवार तर या दिवशी आपण सूर्य उगवण्यापूर्वी उठावे. म्हणजे सूर्योदयापूर्वी, स्वच्छ स्नान करावे आणि एक आसन अंथरून म्हणजे चटई वगैरे घेऊन त्यावर बसावे. पूर्वेकडे तोंड करून बसावे. आणि एक मंत्र सांगितलेला आहे. त्याचा 108 वेळा जप करावा.
मंत्र आहे ओम आदित्याय नमः ओम आदित्याय नमः लक्षात घ्या! आपण सूर्योदयापूर्वी उठून या मंत्राचा जप करायचा आहे. सूर्य उगवू लागेल. तेव्हा आपण तांबे धातूच्या भांड्यात, तांब्याच्या लोटामध्ये पाणी घ्यायचे आहे.
आणि त्यामध्ये आपण लाल मिरचीचे अकरा दाने त्यामध्ये टाकायचे आहे आणि हे जल ज्यामध्ये लाल मिरचीच्या बिया अकरा बिया उजव्या हाताने आपण त्या तांब्यामध्ये टाकायचे आहेत. आणि उगवत्या सूर्यदेवाना अर्घ्य म्हणून अर्पण करायचे आहे. हे अर्घ्य अर्पण करतानासुद्धा, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप आपण कायम चालू ठेवायचा आहे.
अर्घ्य अर्पण केल्यानंतर सुर्यदेवांना मनोभावे हात जोडून आपले उधार दिलेले पैसे, उसने दिलेले पैसे परत मिळण्याची प्रार्थना करायची आहे. मित्रांनो हा उपाय आपण दर गुरुवारी किंवा रविवारी पुनरावृत्त करावा. जोपर्यंत आपले पैसे आपल्याला परत मिळत नाही. काही दिवसातच तुमची उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. दुसरा जो उपाय आहे तो आहे. की? खूप सारा कालावधी उलटला आहे अगदी वर्ष उलटून गेलेली आहेत दोन-तीन वर्ष झालेली आहेत. मात्र पैसा काही मिळालेला नाही आहे.
आणि खूप मोठी रक्कम आहे आणि समोरची व्यक्ती ही रक्कम परत करण्याची कोणतीही शाश्वती दिसत नाही. अशावेळी आपण हा उपाय करा. मित्रांनो यासाठी आपल्याला रविवारचा दिवस निवडायचा आहे. रविवारच्या दिवशी आपल्याला एक तांब्याच पात्र घ्यायच आहे.
त्या पात्रामध्ये आपण एक कपुरी पान, काहीजण नागिनीचा पान म्हणतात. विड्याच पान म्हणातात. असा आहे कपुरी पान आपण देठासहित ठेवायचा आहे. पालथ न घालता ते आपण ठेवायचे आहे. त्या वरती देशी कापूर आपण ठेवायचा आहे.
भरपूर प्रमाणात देशी कापूर आपण त्यावर ठेवणार आहोत. आणि हा कापूर आपण जाळायचा आहे. हा कापूर जाळल्यानंतर आपण स्वच्छ भोजपत्र घ्यायचा आहे. म्हणजे मला त्याला हिंदीमध्ये भोजपत्र म्हणतात. तुम्हाला कोणतेही पूजेच्या दुकानांमध्ये हे भोजपत्र मिळेल. जर नसेल साधा कागद घेतला तरी चालेल.
मात्र या कागदावरती कोणत्याही प्रकारच्या रेषा नसाव्यात. असा कागद आपण घ्यायचा आहे. आणि त्यावरती देशी कापराच्या काजळाने ज्या व्यक्तीने आपले पैसे घेतलेले आहेत त्या व्यक्तीचा पण नाव लिहायचं आहे. लक्षात घ्या फक्त नाव त्याचं संपूर्ण नाव लिहायची गरज नाही आणि त्यानंतर आपल्या उजव्या हाताने या भोजपत्रावर किंवा या कागदावरती आपण सात वेळा थाप मारायची आहे. सात वेळा आपला उजवा हात या कागदावरती आपटायचा आहे.
आणि प्रत्येक वेळी हात आपटताना त्या व्यक्तीचं नाव घेऊन आपले उसने पैसे, उधार घेतलेले पैसे त्या व्यक्तीला लवकरात लवकर परत करण्यास सांगायचे आहे. त्यानंतर हे भोजपत्र किंवा तो कागद आपल्या कॅश बॉक्समध्ये, तिजोरी मध्ये किंवा कपाटामध्ये जिथे तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवता पैसे ठेवता.
धन ठेवता त्या ठिकाणी ठेवायचे आहे. ठेवताना ते नाव वरच्या बाजूला असावं. तर अशा प्रकारे हा कागद तिथे ठेवल्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा दगड ठेवायचा आहे. आता हा आपण लाल रंगाचा दगड कुठून आणणार? त्यासाठी एक दगड घ्यावा. शक्यतो मोठा दगड घ्या. या दगडाला स्वच्छ करून कुंकवाच्या साह्याने हा दगड लाल करायचा आहे. असा हा लाल दगड आपण या कागदावर, भोजपत्रावर ठेवायचा आहे. मित्रांनो हा उपाय ज्याने आपले पैसे घेतलेले आहेत. हा जो उपाय आपण घेतलेला आहे. त्याने त्या व्यक्तीला कोणतही नुकसान पोहोचत नाही.
फक्त त्या व्यक्तीला आपले पैसे परत देण्यास हा उपाय, प्रवृत्त करतो. तुम्हाला यासारखे अनेक उपाय सापडतील. काही काही उपाय आपण जाणीवपूर्वक टाळायला हवेत. कारण ते उपाय समोरच्या व्यक्तीला इजा पोहोचू शकतात. आणि म्हणुन जर तुमच्या जवळची व्यक्ती असेल, ना त्यातली व्यक्ती असेल.
तुमच्या जवळचा मित्र असेल तर आपण आज आम्ही सांगितलेले हे दोन उपाय अवश्य करा. समोरच्या व्यक्तीला कोणतेही नुकसान पोहोचणार नाही. सोबतच एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो पैसा हा जितका चांगला आहे तितका वाईट सुद्धा आहे. हा पैसा तुम्हाला शत्रू निर्माण करतो. आणि म्हणून समोरच्या व्यक्तीचे मन दुखावू नका. ती व्यक्ती तुमचं बरं वाईट करण्याचा विचार त्याच्या मनात येईल आणि म्हणून पैसा जितका चांगला आहे. तितका तो वाईट सुद्धा असतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.