मित्रांनो पितृपक्ष सुरू होण्याआधी घरातील करून घ्या ही कामे. नाही तरी आपल्या अडचणी वाढतील. अनंत चतुर्थी नंतर म्हणजेच गणपती बाप्पांच्या विसर्जनानंतर सुरू होतो. तो पितृपक्षाचा पंधरवडा गणपती विसर्जनाच्या नंतरचे पंधरा दिवस हे खूप महत्त्वाचे दिवस असतात. ज्या पद्धतीने देवी देवतांचे संवाद येत असतात तसाच हा पितृपक्ष असतो.
आपले जे पूर्वज आहेत किंवा आपल्या घरातील ज्या मोठ्या मेलेले व्यक्ती आहेत ज्या व्यक्ती आपल्या सोबत नाहीत. त्या लोकांचे श्राद्ध घालण्याचे हे पंधरा दिवस असतात. म्हणूनच याला पितृपक्ष असे म्हणतात. आणि काही दिवसांमध्येच पितृपक्षाचा पंधरवडा सुरू होणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापर्यंत पितृपक्ष बरेच जण करत श्राद्ध घालत असतात.
हा पितृपक्ष सुरू होण्याआधी घरांमध्ये करून घ्या ही कामे ही कामे केल्याने आपल्या घरामध्ये कोणत्याही अडचणी येणार नाहीत ज्या पद्धतीने गणपती दसरा दिवाळीमध्ये आपण घराची साफसफाई करतो त्याच पद्धतीने पितृपक्ष येण्याआधी देखील घराची साफसफाई करायची आहे घर झाडून स्वच्छ करावे.
घरामध्ये कोणतीही जाळी राहणार नाही.याची काळजी घ्यावी घरामध्ये खराब झालेल्या वस्तू बाहेर टाकाव्यात. भंगार वगैरे असेल तर ते देखील बाहेर टाकावे घरामध्ये घाण ठेवायची नाही. कारण आपले पूर्वज आपले पितर हे पृथ्वीवर येत असतात. आणि आपण त्यांना श्राद्धाच्या स्वरूपामध्ये घास देत असतो म्हणूनच घराची साफसफाई करावी.
घराची साफसफाई करून झाल्यानंतर घरामध्ये गोमूत्र शिपडायचे आहे. घरामध्ये असलेली सर्व भांडी धुऊन काढावीत. अंथरून पांघरून हे देखील धुऊन घ्यावे. खर साफ सफाई करण्याचे काम पितृपक्ष सुरू होण्याआधी करायचे आहे. आणि पितृपक्ष सुरू झाल्यानंतर हे दिवस खूप महत्त्वाचे आणि खास असतात घरामध्ये कटकटी, भांडण होणार नाही. याची काळजी घ्यायला पाहिजे.
ज्यांना व्यसन आहे त्या व्यक्तींनी व्यसन करू नये अशा लहानसांच्या चुका आहेत त्या चुका करायच्या नाहीत या चुका जर आपल्याकडून झाल्या तर आपल्याला पितृदोष लागण्याची शक्यता आहे पितृपक्ष सुरू झालेल्या दिवसापासून दररोज न चुकता कावळ्याला कुत्र्याला चपाती खाऊ घाला आपण जो कुत्र्याला किंवा कावळ्याला घास घालणार आह.
तो घास जो आपण स्वयंपाक ताजा करतो. त्यातील घालावा दोघांना एक एक चपाती घातली तरी चालते. किंवा एक चपाती दोघांमध्ये घातली तरी चालते. मात्र पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत कुत्र्याला आणि कावळ्याला घास घालायचा आहे. कावळ्यासाठी घराच्या छतावर चपाती ठेवायची आहे. आणि कुत्रा जाऊया आपला दारात येतो त्यावेळी त्याला खाऊ घालायची आहे.
हे काम तुम्हाला पितृपक्ष संपू पर्यंत दररोज करायचा आहे. याचा तुम्हाला लाभ नक्की होईल. पितरांचा आशीर्वाद मिळेल त्यामुळे पितृपक्ष सुरू होण्याआधी ही कामे घरातील सर्वांनीच करून घ्या. ही जर कामे केली तर आपल्याला ज्या काही अडचणी येणार आहेत. त्या अडचणी येणार नाहीत. आणि आपल्याला मित्राचा आशीर्वाद लाभेल. आणि सर्व काही चांगले घडेल.
मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.