पितृदोष आहे की नाही कसे ओळखाल?

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो आपल्याला शास्त्रामध्ये आपल्याला विशेष अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींची माहिती पाहायला मिळते. बऱ्याच जणांच्या घरामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादविवाद हे होतच राहतात. आपण वास्तुदोष आपल्या घरामध्ये होऊ नये यासाठी शास्त्रांमध्ये सांगितलेल्या गोष्टींचे ज्ञान घेऊनच आपण आपले घर हे बांधत असतो.

जेणेकरून वास्तुदोष आपल्या घरामध्ये होणार नाही. तसेच बऱ्याच वेळा आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी आपल्या जीवनामध्ये येत असतात आणि त्या पाठीमागे पितृदोष देखील लागलेला असतो. पितृदोषसाठी आपण अनेक प्रकारचे उपाय देखील करतो. जेणेकरून त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला होईल.

म्हणजेच पितृ आपल्यावर कायम प्रसन्न राहतील. तर आपल्या घरामध्ये लागलेला पितृदोष आहे हा पितृदोष कसा ओळखायचा? याविषयी आज मी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर चला तर जाणून घेऊयात आपल्याला पितृदोष लागला आहे की नाही हे आपण कसे ओळखावे.

आजकाल प्रत्येक जण आपल्या जन्मतारखेवरून आपली कुंडली काढत असतो. जेणेकरून आपल्या कुंडलीमध्ये आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांविषयी माहिती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच आपल्याला कोणत्या अडचणीचा सामना करावा लागणार की आपल्याला सुखाचे दिवस येणार आपली प्रगती कशी असणार आहे आपल्या कुंडलीमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष आहे का जेणेकरून आपल्याला त्यावरती निवारण करता येईल त्यासाठी आपण कुंडली ही काढतच असतो.

अशा बऱ्याच काही गोष्टी आपण कुंडलीवरून जाणून घेऊ शकतो. परंतु बऱ्याच वेळा काय होते की, आपल्याला आपली जन्मतारीख, जन्मवेळ किंवा जन्मदिवस हा माहीत नसल्याकारणाने कुंडली काढण्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळे आपण कुंडली काढत नाही.

मग आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे का हे आपल्याला माहिती होत नाही. तर आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात. या गोष्टी तुम्ही जर निरखून पाहिले तर त्यावरून आपल्याला नक्की समजेल की पितृदोष आहे की नाही. मित्रांनो आपल्या जीवनामध्ये अनेक अशा काही घटना घडत असतात.

म्हणजेच अशा काही गोष्टी घडत असतात जेणेकरून आपण पितृदोष आहे की नाही हे जाणून घेऊ शकतो. तर या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत चला तर जाणून घेऊ. तर आपल्या कुटुंबामध्ये जर मुलगा आणि वडील यांच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत भांडणे होत असतील म्हणजे त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे मतभेद हे अनेक गोष्टींवरून होत असतील म्हणजेच एकमेकांशी त्यांचे पटत नसेल तर तुम्ही त्यावेळेस नक्की समजून जा की तुम्हाला पितृदोष आहे.

तसेच जेव्हा अनेक प्रकारच्या अडचणी आपल्याला निर्माण होतात तसेच काही वेळेस आपले जमलेले लग्न देखील मोडते त्यावेळेस देखील तुम्ही नक्की समजून जा की आपल्याला पितृदोष आहे. म्हणजेच जर तुमची कुंडली जमत असून देखील ते लग्न मोडले जाते त्यावेळेस आपल्या कुंडलीमध्ये नक्कीच पितृदोष हा असतो हे नक्की तुम्ही समजून जा.

अनेक कारणांमुळे जर तुमचे विवाह जुळत नसतील तसेच विवाह होऊन खूपच वर्षे झाली असतील आणि तरी देखील तुमच्या घरामध्ये पाळणा हलत नसेल म्हणजेच तुम्हाला संतांनप्राप्ती होत नसेल, गर्भपात हा सारखा होत असेल किंवा आपल्या घरामध्ये अपंग मुले जन्माला येत असतील तर याचा अर्थ असा असतो की पितृदोष आहे.

तसेच जर आपल्या कुटुंबातील सदस्य हे सतत आजारी पडत असतील म्हणजेच एका पाठोपाठ एक व्यक्ती हा सतत आजारी पडत असेल तर हे देखील लक्षण पितृदोषाचे असू शकते. तसेच जर तुम्हाला अनेक कारणामुळे कर्ज घ्यावे लागले असेल आणि हे कर्ज इतके वाढते की त्यातून कसे बाहेर पडावे हे आपल्याला समजत नाही.

म्हणजेच एक प्रकारचा कर्जाचा डोंगर आपल्याला झालेला असतो. तर त्यावेळेस देखील पितृदोष आहे हे नक्की तुम्ही समजायला हवे. तसेच तुमचा जर एखादा स्वतःचा व्यापार किंवा व्यवसाय असेल आणि या व्यापारांमध्ये व्यवसायामध्ये तुमची प्रगती होत नसेल म्हणजेच त्यामध्ये सतत अपयश तुम्हाला प्राप्त होत असेल.

तसेच म्हणावे तसे आपणाला त्यातून फायदा देखील होत नसेल म्हणजे कितीही परिश्रम घेतले, मेहनत घेतली तरी देखील त्यामध्ये आपणाला हवे तितके यश प्राप्त होत नसेल तर याचाही अर्थ असा असतो की, तुम्हाला पितृदोष आहे. जर आपल्या नोकरीमध्ये तुम्हाला तुमची प्रगती होत नसेल कुटुंबातील सदस्यांमध्ये काही ना काही कारणामुळे भांडण होत असतील,

अन्नधान्याची तुमच्या घरामध्ये बरकत नसेल हे संकेत देखील पितृदोष असण्याचे असतात. त्यामुळे मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टीवरून तुम्ही पाहू शकता की तुम्हाला पितृदोष आहे की नाही. परंतु आपण अशा अनेक गोष्टींवर दुर्लक्ष करत असतो. परंतु या गोष्टी म्हणजेच पितृदोष आहे याचा संकेत आपणाला देत असतात.

त्यामुळे तुम्ही वेळीच सावध व्हा आणि पितृदोष दूर करण्यासाठी काही ना काही शास्त्रात दिलेले उपाय तुम्ही अवश्य करावे. जेणेकरून पितृदोष हा दूर होऊन तुमचे जीवन सुखा समाधानाचे नांदेल. कुटुंबातील सर्व व्यक्ती आनंदी राहतील आणि कोणत्याही प्रकारची अडचण किंवा बाधा किंवा संकटे अजिबात तुमच्या जीवनामध्ये येणार नाहीत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *