पंचक असताना मृत्यू झाल्यास 5 जणांचा होतो मृत्यू! का ठरतो अशुभ काळ?

अध्यात्मिक

मित्रांनो माणूस जन्माला आला की त्याचा मृत्यू अटळ आहे. पूर्वीचे लोक हे शंभर वर्ष जगत होते. पण अलीकडे कमी वयातच मृत्यूला सामोरे जावे लागते. हिंदू धर्मामध्ये अनेक रूढी परंपरा चालत आलेले आहे. म्हणजेच मित्रांनो ज्यावेळेस व्यक्तीचा मृत्यू होतो त्यावेळेस त्याला स्वर्गात किंवा नरकात जागा मिळणे हे त्याच्या कर्मानुसार अवलंबून असते.

जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जे पंचक काळात झाला तर असे मानले जाते की पाच जणांचा मृत्यू होतो. त्यामुळे पंचक काळ हा अशुभ मानला जातो. रावणाचा मृत्यूदेखील पंचक काळात झाला असे शास्त्रात सांगितले आहे. जो सर्वात अशुभ काळ मानला जातो.

तसेच असे मानले जाते की, या कालावधीत मृत्यू झाल्यामुळे 5 ते 7 दिवसात कुटुंबातील किंवा नातेवाईकांमधील इतर चार लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता देखील वाढते. आज आम्ही तुम्हाला त्याच पंचक काळाबद्दल सांगत आहोत. पंचक म्हणजे काय?ज्योतिषी राजकुमार चतुर्वेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 नक्षत्रांचा काळ पंचक मानला जातो. रेवती नक्षत्र, उत्तरा भाद्रपद, पूर्वा भाद्रपद, शतभिषा हे पंचकातील चार कालखंड आहेत.

या चार कालखंडातील चंद्रग्रहणाच्या तिसऱ्या नक्षत्राच्या भेटीला पंचक म्हणतात. पंचक काळात घडलेल्या अशुभ कार्याची 5 दिवसात 5 वेळा पुनरावृत्ती होते असे मानले जाते. तर मित्रांनो पंचक काळात अनेक कामे करणे अशुभ मानले जाते. सर्वात मोठी पाच कामे म्हणजे घराचे छत, स्लॅब घालणे, दक्षिण दिशेला प्रवासाला जाणे, लाकडी वस्तू खरेदी करणे, पलंगाची दुरुस्ती करणे किंवा पलंग तयार करणे आणि मृतदेहाचे अंतिम संस्कार करणे. ही कामे पंचक काळात करणे शक्यतो टाळावे.

पंचक काळात प्रत्येक वाराचा वेगळा परिणाम होतो. पंचक काळ हा अशुभ असतो. पण, ग्रहांचे संक्रमण आणि ग्रहांच्या स्थितीमुळे हा प्रभाव फक्त कमी जास्त होतो. रविवार ते शनिवार असे सात दिवस स्वतंत्र पंचक काल तयार होतो. या पंचांमध्ये बुधवार आणि गुरुवारचे पंच दोषमुक्त असल्याचे सांगितले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार पंचक काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याबरोबरच एक गवताचा पुतळा बनवून त्याच वेळी त्याचे अंतिम संस्कार करण्याची परंपरा आहे. जेणेकरून पंचकातील अशुभ परिणाम टाळता येतील.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *