पैशांची कमतरता भासते तर नियमितपणे या गोष्टी करा, पैसा कधीच कमी पडणार नाही!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो सहसा प्रत्येक जण आनंदी सुखी आणि समृद्ध जीवन मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. पैसे जीवन सुरळीत चालवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. लोक ते मिळवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करत असतात कठोर परिश्रम आणि समर्पण पैसे मिळवण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरते.

परंतु काही वेळा नेमकं उलट देखील घडताना बघायला गेलं तर लाखो प्रयत्नानंतरही लोकांना पैशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. बहुतेक वेळा लोक पैसे कमावतात पण त्या हातात टिकत नाही यामागे अनेक कारणे असू शकतात पण वास्तू किंवा इतर दोषही कोणावर तरी परिणाम करू शकतो.

लोकांनाही नेमकं लक्षात येत नाही की अडचण कुठे आहे. तसे धनप्राप्तीसाठी ज्योतिष शास्त्रात काही उपाय सांगितलेले आहेत या उपायांचा अवलंब केल्यास जीवनात सतत येणाऱ्या आर्थिक संकटावर मात करता येते. चला तर मग जाणून घेऊयात काही सोपे उपाय.

मित्रांनो तुम्हाला पैशाची कमतरता भासत असेल तर या गोष्टींची सवय लावणं आवश्यक आहे. पहिली शिवलिंगला अभिषेक करणे. असे मानले जाते की भगवान शंकराला प्रसन्न करणं सोपं नाही परंतु जर शंकर देव तुमच्यावर प्रसन्न झाले तर धन आणि इतर त्रास दूर होतात.

भगवान शिव शंकराला प्रसन्न करून धनसंपत्ती मिळवायची असेल तर दररोज शिवलिंगाला अभिषेक करा. यासोबतच शंकराला अत्यंत प्रिय असणारी बेलाची पाने ही अर्पण करा. दूधही भगवान शंकराला अर्पण करावे. दुसरे मंदिरात दिवा लावा. जर तुम्ही देवी लक्ष्मी आणि श्री गणेशाची खऱ्या भक्ती भावाने पूजा केली तर पैशाची समस्या तुमच्यावर प्रभाव पडू शकत नाही.

लक्ष्मी मातेला संपत्तीची देवीदेखील म्हटलं जातं आणि धनप्राप्तीसाठी तुम्ही तिच्यासमोर दिवा लावू शकता. आपल्या घरातील मंदिरात लक्ष्मी आणि श्री गणेशाच्या समोर मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य लावला पाहिजे. तिसरे गुरुवारी उपवास करा. धनाची देवता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही उपवास देखील करू शकता.

शास्त्रानुसार गुरुवारचा उपवास केल्यास देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो. हा दिवस भगवान विष्णूलाही समर्पित आहे आणि त्यामुळे लक्ष्मी आणि विष्णूच्या देवाच्या पूजेने तुम्ही देवी लक्ष्मीलाही प्रसन्न करू शकता आणि विष्णू देवालाही म्हणून गुरुवारी उपवास अवश्य करा.

चौथे घराची नियमित स्वच्छता ठेवा. असे मानले जाते की ज्या घरात स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही तिथे माता लक्ष्मीचा वास करत नाही. अशा घरातील सदस्यांवर माता लक्ष्मीचा कोप होतो. जर तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर घरातील स्वच्छतेची विशेष काळजी घ्या आणि हे काम रोज करण्याची सवय लावा. याचा एक फायदा असा आहे की तुम्ही निरोगी राहू शकाल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *