नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावावा? दिशा कोणती असावी? दिवा विझला तर? काय करावे

अध्यात्मिक वायरल वास्तूशास्त्र

मित्रांनो नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावावा? दिवा कोणत्या दिशेला असावा ? दिवा विझला तर काय करावे ?याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखामध्ये घेणार आहोत. काही दिवसांमध्येच नवरात्रीला सुरुवात होणार आहे. 26 सप्टेंबर 2022 सोमवारच्या दिवसापासून नवरात्री सुरू होणार आहे. घटस्थापने पासून नवरात्रीला सुरुवात होते. बऱ्याच जणांच्या घरांमध्ये घटस्थापन केला जातो.आणि अखंड दिवा लावला जातो.

तर काहींच्या घरांमध्ये फक्त अखंड दिवा लावला जातो. हा अखंड दिवा नऊ दिवस लावला जातो. दसऱ्यापर्यंत हा दिवा लावायचा असतो. हा दिवा लावत असताना दिवा आपल्याला मोठा घ्यायचा आहे कमीत कमी तो दिवा बारा तास तरी चालला पाहिजे. हा दिवा स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्यामध्ये दोऱ्याची वात घालायची आहे. कापसाची वात घालायची नाही. दोऱ्याची वात बाजारामध्ये सहज आपल्याला मिळू शकते.

नवरात्रीमध्ये नऊ दिवस दिवा लावण्यासाठी पूजा सामग्रीच्या दुकानांमध्ये मोठी वात मिळते. ती वात आणून दिवा लावला तरी चालतो. अखंड दिवा लावण्यासाठी जीवात घेणार आहोत. ती वात कमी पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. दिवा लावण्यासाठी तेल सव्वा लिटर घ्यायचे आहे. नऊ दिवस त्या तेलाचा दिवा लावायचा आहे. आणि नऊ दिवस दिवा लावून जरी ते तेल शिल्लक राहिले ते दुसऱ्या कशासाठीही वापरायचे नाही.

त्यानंतर फक्त देवघरामध्ये दिवा लावण्यासाठीच ते तेल वापरायचे आहे. दिवा लावण्यासाठी ज्या काही वस्तू लागतात, त्या सर्व वस्तू आपल्याकडे असायला पाहिजेत. नसतील तर त्या वस्तू नवरात्री येण्याआधीच आपल्या घरामध्ये आणून ठेवा नवरात्रीमध्ये जो आपण अखंड दिवा लावणार आहोत. तो दिवा देवघरामध्ये किंवा देवघरासमोर एखादे पाठ ठेवून त्या पाटावर किंवा चौरंगावर दिवा लावला तरी चालतो. देवघरामध्ये दिवा लावत असताना आपल्या डाव्या हाताला दिवा लावायचा आहे.

देवांच्या उजव्या बाजूला दिवा लावायचा आहे. जर आपण देवघराच्या बाजूला किंवा देवघराबाहेर दिवा लावणार असाल तर तो दिवा देखील आपल्या डाव्या हातालाच लावायचा आहे. दिवा लावत असताना सर्वप्रथम दिवा घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये वात घालायची आहे. त्यानंतर तो दिवा पाटावर ठेवून किंवा ज्या ठिकाणी ठेवणार आहात. त्या ठिकाणी रांगोळी घालायची आहे. त्यानंतर तो दिवा तेथे ठेवायचा आहे.

त्यानंतर फुले अक्षता वाहून पूजा करायची आहे. त्यानंतर कुंकू ओले करून त्या दिवाला टीळा लावावा. त्या कुंकवाने स्वस्तिक काढावे. आणि घटस्थापनेच्या दिवशी शुभ मुहूर्तावर तो दिवा लावावा. दिव्याची वात सरळ किंवा आपल्या बाजूला असेल अशा पद्धतीने दिव्यामध्ये वात घालायची आहे. आणि दररोज सकाळ संध्याकाळ त्या दिव्यामध्ये तेल घालायचे आहे. याची काळजी आपल्याला घ्यायची आहे.

जो अखंड दिवा लावणार आहोत. त्या दिव्याला सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा आहे. जर वारा लागून दिवा विजला किंवा चुकून जरी दिवा विजला तर काय करावे हा प्रश्न सगळ्यांच्याच मनामध्ये येतो. सर्वात प्रथम आपला दिवा विझणार नाही. याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि चुकून जर दिवा विजला तर देवघरासमोर बसून दिव्यासमोर बसून चूक भूल झाली मला माफ करा. अशी प्रार्थना करायची आहे.

त्यानंतर तो दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा आहे. आपल्याकडून दिवा विझला आहे. अपशकून झाला आहे. असा मनामध्ये विचार आणायचा नाही. पुन्हा दिवा प्रज्वलित करून तो दिवा विझणार नाही. याची काळजी घ्यायची आहे. मनामध्ये कोणताही नकारात्मक विचार करायचा नाही. सर्व सकारात्मक विचार करावा. दिवाळीतला तर हात जोडून दिव्याची माफी मागायची आहे. आणि पुन्हा अखंड दिवा लावायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही नवरात्रीमध्ये नऊ दिवस दिवा लावू शकता.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *