मित्रांनो, प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये भरपूर धनसंपत्ती, पैसा हवा असतोच. त्यासाठी ते भरपूर मेहनतही करीत असतात. परंतु तो पैसा या ना त्या कारणाने खर्च होतो. मग आपणाला पैशांची कमतरता भासत राहते. कितीही जपून पैसा वापरला तरीही आपणाला पैसा अपुरा पडत राहतो. पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही व त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय देखील करीत राहतो. परंतु काही वेळेस या उपायांचा देखील आपणाला फायदा होत नाही. मग आपण नशिबालाच दोष देत राहतो.
मित्रांनो आता सर्वजण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर मित्रांनो आज मी तुम्हाला नवीन वर्षात करण्याचा उपाय सांगणार आहे तो केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील.
आपलं पाकीट पैशांनी भरलेलं असावं, असं अनेकांना वाटत असेल. त्यासाठी काही महत्त्वाचे उपाय केल्यास त्याचा उपयोग होऊ शकतो. आयुष्यात कुठलीही अडचण येऊ नये यासाठी पैसा आणि धनधान्य नेहमी असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. आपलं पाकीट कायम पैशांनी भरलेलं असावे यासाठी सर्वजण नेहमी धडपड करत असतात. काही उपाय केले तर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी राहू शकते. याबद्दल आता जाणून घेऊया.
तर मित्रांनो तुम्ही जर नवीन वर्षात तुमच्या पाकिटात चांदीचं नाणं ठेवलं तर माता लक्ष्मी आपल्यावर कृपा करतील आणि पैशांचा जणू पाऊस होईल. पण पाकिटाच्या ज्या भागात आपण चांदीचं नाणं ठेवणार आहोत तिथे इतर वस्तू असू नये याची काळजी घ्यायला हवी.
तसेच मित्रांनो नवीन वर्षात पाच छोट्या वेलची घेऊन नंतर त्या वेलची लाल रंगाच्या रेशमी कापडात बांधून पाकिटात ठेवाव्यात. हा उपाय केल्यास तुमचं पाकीट कधीही रिकामं राहणार नाही. त्यात कायम पैसे असतील.
तसेच नवीन वर्षामध्ये मंत्रोच्चार करून पिंपळाचं पान शुभमुहूर्तावर पाकिटात ठेवा. हा उपाय केल्यास तुमची आर्थिक अडचणींपासून सुटका होऊ शकते. याशिवाय नवीन वर्षात आपली एक इच्छा लाल कागदावर लिहून रेशमी कापडात बांधून ती पर्समध्ये ठेवल्यास वर्षभराच्या आतमध्ये ती इच्छा नक्की पूर्ण होऊ शकते.
मित्रांनो तुम्ही नववर्षाच्या पहिल्या दिवशी माता लक्ष्मीच्या चरणांवर तांदळाचे दाणे अर्पण करा. नंतर तेच दाणे आपल्या पाकिटात ठेवावेत. असे केल्याने वर्षभर पाकीट कधीही रिकामं राहणार नाही. तसंच अवास्तव खर्चापासूनही दिलासा मिळेल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे माता लक्ष्मीसमोर ठेवले जाणारे तांदूळ खंडित असू नयेत. म्हणजेच त्या अक्षता असायला हव्यात.
तर मित्रांनो येणाऱ्या या नवीन वर्षात हे जर उपाय तुम्ही केलात तर तुमच्या सर्व समस्या, अडचणी नक्की दूर होतील. येणाऱ्या नवीन वर्षात तुम्हाला कोणत्याच अडचणीचा सामना देखील करावा लागणार नाही.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.