नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये काय करावे आणि काय करू नये जाणुन घ्या साविस्तर…

अध्यात्मिक

मित्रांनो आता थोड्या दिवसांमध्ये नवरात्री सुरू होणार आहे तर नवरात्रीमध्ये आपण देवींना प्रसन्न करून घेण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे पूजा प्रार्थना उपवास देखील करत असतो पण आपल्याकडून अशा काही चुका होतात की त्या चुका केल्यानंतर आपण जे काही केलेलं व्रत वैकल्य असू दे किंवा पूजा प्रार्थना असुदे कितीही मनाने भक्ती भावाने श्रद्धेने केले तरीदेखील आपल्याला त्याचं फळ मिळत नाही.

तर मित्रांनो 15 ऑक्टोबरला घटस्थापना आहे जेव्हा आपल्या घरात घटस्थापना होते तेव्हा कोणते नियम पाळावेत हे आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीच्या दिवशी कलश स्थापित केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत या द्वारे देवी दुर्गा ची कृपा तुमच्यावर राहते आणि तुम्हाला शुभ फळ देखील मिळते.

मित्रांनो पहिल्या दिवशी प्रतिपदा तिथी कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसार करायचे आहे दिवसातून दोनदा कलश्यासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे आरती दोन्ही वेळा करायचे आहे दुर्गा सप्तशतीचे पठण तुम्हाला करायचे आहे माते दुर्गाचे मंत्र आणि स्तोत्रे जप करायचा आहे जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी पाळा फक्त सात्विक अन्न खा.

आणि आत्म संयम ठेवा नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते म्हणून अध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्यासह आत्मसाक्षणासाठी हा सर्वात कमी उत्तम काळ मानला गेलेला आहे नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीच्या श्लोकांचे पठण करणे ही खूपच शुभ मानले जाते हा अतिशय पवित्र सण मांडला आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे विशेषत या काळात दररोज आंघोळ करा स्वच्छ कपडे घाला आणि प्रार्थना स्थळ देखील स्वच्छ ठेवायचा आहे.

नवरात्रीच्या दिवसांमध्ये काय करू नये?

मित्रांनो सर्वात पहिला आहे ते म्हणजे जर कलश च्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर ती विजवू नका ती सतत प्रकाशमय राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे जर उपवास पकडला असाल तर पूर्णपणे उपाशी राहू नये फास्ट फ्रेंडली भोजन करायचे आहे मांसाहार करू नका आणि मादक गोष्टी पिऊ नका. नवरात्री दरम्यान दाढी करू नका किंवा केस कापू नका नखे देखील कापू नका कोणाबद्दल कठोर वागू नका राग टाळा आणि ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा .

नवरात्री दरम्यान उपवास ठेवणाऱ्यांना व्यक्तीने लसुन कांदा मांस याचं सेवन करू नये जर तुमच्या घरात कॉलेज स्थापना अखंड ज्योती असते किंवा देवीचा जागरण ठेवलं जातं तर घरात कधीही रिकामं सोडू नये नेहमी घरात कोणी ना कोणी असावं काळा रंगाचे कपडे घालून देवी दुर्गा ची पूजा अर्चना करू नये त्याऐवजी लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत उपवास ठेवणाऱ्यांनी चप्पल बूट आणि बेल्टचा वापर करायचा नाही या काळामध्ये ब्रह्मचर्य पालन करायचा आहे विष्णुपुराणानुसार उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने नवरात्री दरम्यान दिवसा झोपायचं नाही .

नवरात्रीत उपवास ठेवणाऱ्या लोकांनी फळ खायचे आहेत यादरम्यान नऊ दिवसापर्यंत धान्य आणि मिठाचे सेवन करायचं नाही तुम्ही उपवास सोडण्यासाठी शिंगाड्याचे पीठ सेंदामीत बटाटा मेवा शेंगदाणे याचे सेवन करू शकता उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालीसा किंवा दुर्गा सप्तशतीचे पठण करताना कुणाशी बोलायचं नाही असं केल्यास पूजा अपूर्ण मानली जाते शांत घरात वर्षभर आनंद आणि समृद्धी नांदते तुमच्या घरी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद मतभेद किंवा मारामारी टाळायची आहे .

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *