नशीबवान मुले कोणत्या दिवशी जन्म घेतात…जाणून घ्या तुम्हीही नशीबवान आहात काय ते ?

जरा हटके

नमस्कार मित्रांनो,

रविवार : ज्या व्यक्तींचा जन्म रविवारी होतो, त्यांच्यावर सूर्यदेवाची कृपा असते. या व्यक्ती सूर्यसमान तेजस्वी असतात. त्या नशिबानं असतात, भाग्यशाली असतात आणि त्यांना दीर्घयायुषची प्राप्ती होते. यांचा स्वभाव मुळातच शांत असतो. या व्यक्ती कधीच कोणाच्या कामामध्ये नाक खुपसत नाहीत आणि स्वतःच्या कामात सुद्धा नाक खुपसलेलं आवडत नाहीत. ज्या व्यक्ती त्यांच्या कामात सतत अडथळा आणतात त्यांचा त्यांना प्रचंड राग येतो.

सोमवार : ज्या व्यक्तींचा जन्म सोमवारी होतो अत्यंत गोडबोले असतात. खूप गोड बोलतात. हसमुख असतात. चेहरा हसरा असतो. सतत खुश राहतात. कधीही ह्या व्यक्ती तुम्हाला नाराज दिसणार नाहीत. मात्र, यांचा स्वभाव खूप चंचल असतो.

चंचल स्वभाव असल्यामुळे ह्या कधीच ठाम निर्णय घेत नाहीत. यांचे निर्णय सतत बदलत राहतात. यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते. यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते मात्र योग्य तो निर्णय त्यांना घेता येत नाही. हि व्यक्ती आपल्या आईवर खूप जास्त प्रेम करतात.

मंगळवार : ज्या व्यक्तींचा जन्म मंगळवारी होतो त्या व्यक्तीवर श्री हनुमानाची कृपा आढळते. हे लोक स्वभावाने खूप चांगले असतात. मात्र स्वभावाने जरी चांगले असले तरी हट्टीपणे यांमध्ये खूप असतो. एखादी गोष्ट जर त्यांना आवडली किंवा मनामध्ये भरली तर ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते काहीही करू शकतात.

मंगळवारी जन्मलेल्या व्यक्ती इमानदार असतात. दुसऱ्यांची मदत करतात. कोणत्याही स्वार्थावीना हे दुसऱ्याची मदत करतात. ह्यांना ऐश्वर्याचे जीवन जगणे पसंद असते. कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसे कमावण्याचा विचारही करत नाहीत. दुसर्यांप्रती सातत्याने इमानदारीने वागतात.

बुधवार : बुधवारी जन्मलेल्या लोकांना धार्मिक गोष्टींची फार आवड असते. हे लोक धार्मिक कार्य, देव देव खूप करतात. यांची बुद्धी तेजस्वी असते. अत्यंत बुद्धिमान हे लोकं असतात.

गुरुवार : ज्या व्यक्तींचा जन्म गुरुवारी होतो त्या व्यक्तींचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या समोर कितीही कठीण परिस्थिती आली तर त्या परिस्थीवर मात कशी करायची हे त्यांना चांगले माहिती असते. कितीही कठीण प्रसंग येउद्या ते अगदी अलगद बाहेर पडतात.

दुसर्यावरती छाप कशी सोडावी हे गुरुवारी जन्म झालेल्या लोकांकडून शिकावं. ज्या ठिकाणी जातात स्वतःचा ठसा उठवतात. यांच्या वागण्यातून, यांच्या बोलण्यातून समोरचा व्यक्ती आपोआप भावित होतात. समोरच्या व्यक्तीवर प्रचंड प्रभावित करण्याची ताकत या व्यक्तींमध्ये असते.

शुक्रवार : या व्यक्तींचा जन्म शुक्रवारी होतो या वाटी बुद्धिमान असतात. ह्यांचा स्वभाव अतिशय छान असतो आणि सहनशील असतात. तुम्ही त्यांना कितीही पीडा द्या, त्रास द्या मात्र घ्या व्यक्ती हा त्रास सहन करतात. तुमचं मन ते कधीच दुखावणार नाहीत.

कारण, शुक्रवारी जन्म झालेल्या व्यक्ती भावुक असतात. भावनेला त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठे स्थान असते. तुम्ही ह्या लोकांची चेष्ठा करा, मस्करी करा, ते त्याला कधीच मनाला लावून घेणार नाहीत. अत्यंत जिंदादिल प्रकारच्या ह्या व्यक्ती असतात.

मात्र शुक्रवारी जन्म झालेल्या व्यक्तींचं वैशिष्ट्य असे, कि हे विचारामध्ये खूप स्थिर असतात. म्हणून त्यांच्या मनामध्ये काय चालले आहे हे समोरच्याला लवकर समजत नाही. आपल्या मनातील गोष्ट कधीच दुसऱ्याला सहजासहजी सांगत नाहीत.

शनिवार : ज्या व्यक्तींचा जन्म शनिवारी होतो त्याच्यावरती शनी महाराजांची कृपा असते. या व्यक्तींवर शनी ग्रहाचा प्रचंड प्रभाव आढळतो. या व्यक्ती स्वतःमध्येच मस्त राहतात. अगदी मनमौजीपणे जीवन जगतात. एखाद्याला जर वचन दिले तर ते वचन ते कधीच तोडत नाहीत.

प्राण जाये पर वचन ना जाये या प्रकारे ते वागतात. म्हणून ते दुसऱ्याचे मन सहज जिंकून घेतात. या व्यक्ती हसमुख असतात. त्यांच्यामुळे एक प्रकारचे चैतन्य वातावरणात निर्माण होते. ते जिथे जातात तिथलेच होऊन राहतात. कोणत्याही वातावरणात मिसळून जातात. म्हणून लोकं ह्यांच्यावर अतिशय प्रेम करतात.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *