नारळ व कापूर आपण रोजच्या देवपुजेला वापरतो. या उपयासाठी पण एक नारळ व काही कापुराच्या वड्या लागणार आहेत. हा उपाय स्वामी वरती श्रद्धा भक्ती असणाऱ्या लोकांनीच करायचा. ज्याचं काम खूपच पेंडिंग आहे, खूप अडचणी येत आहे अशा लोकांनी हा उपाय केल्यास त्यांना फायदा होतो. तुमची इच्छा स्वामी पूर्ण नक्की करतील.
कारण स्वामींचा प्रभावी मंत्र आहे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. हा उपाय करताना एक नारळ त्याची शेंडी काढून घ्यावी व सात कापुराच्या वड्या घेऊन देवासमोर बसा समोर पाठ ठेवून त्यावरती नारळ अशा पद्धतीने ठेवा की त्याची शेंडी देवाकडे होईल. सात कपूराच्या वड्या जाळायच्य आहेत. पण सुरुवातीला एक कापूरवडी नारळावरती ठेवा.
नारळाच्या मधोमध सुरुवातीला ही एक कापुराची वडी ठेवा. ती प्रथम प्रज्वलित करा व श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप करा. शक्य तितका मनापासून मनातल्या मनात करा किंवा मोठ्याने केला तरी चालतो. तसेच ही कापुराची वडी विजू देऊ नका सतत एकावर एक संपत आली की घालत रहा व प्रज्वलित राहू द्या.
सात वड्या संपेपर्यंत जप सुरूच ठेवा हा उपाय तुम्हाला सकाळी देवपूजा केल्यावर किंवा सायंकाळी दिवे लावण्याचे वेळी केला तरी चालतो हा उपाय घरात सुख समृद्धी आणतो मनाला शांती देतो. स्वामींचा महिमा अगाध आहे, स्वामी त्यांच्या शिष्यांची इच्छा पूर्ण करतात, त्यांच्या संकटात धावून जातात.
हा उपाय दररोज करा तो नारळ जेव्हा अमावश्या किंवा पौर्णिमा येईल तेव्हा देवघरात फोडावा. जर त्याचे खोबरं चांगले निघाले तर प्रसाद म्हणून सर्व मंडळींना वाटा आणि जर खोबरं खराब निघाले असेल तर नदीच्या पाण्यात सोडून द्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवून या. परत तुम्ही हा उपाय पुन्हा सुरू ठेवू शकता. त्यामुळे घरात शांती येते भांडण वाद कटकटी होत नाही.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.