मित्रांनो, आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असतातच आणि त्या पूर्ण होण्यासाठी आपण दिवस-रात्र काबाडकष्ट करीत असतो. तसेच कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी देखील आपण भरपूर मेहनत घेत असतो. आपल्या प्रत्येकाच्या घरात काहीना काही अडचणी निर्माण होत असतात त्यांमध्ये आर्थिक अडचणी,कौटुंबिक वाद, समस्या उद्भवत असतात.
काही व्यक्तींना त्यांच्या व्यवसायामध्ये यश मिळत नाही, तर नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरी मध्ये बढती मिळत नाही व पगारवाढ होत नाही व विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होत नाही. अशा अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. यावर अनेक उपाय शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहेत.
मग आपण कोणीही सांगितले की, तर लगेच आपण तो उपाय करतो. परंतु मित्रांनो आपण अनेक उपाय करून देखील आपणाला त्याचा काही फरक पडत नाही. त्यामुळे आपण हतबल होऊन जातो. आपणही घरामध्ये नवनवीन उपाय करत असतो.पण हे उपाय आपण योग्य पद्धतीने न केल्यामुळे आपल्याला त्याचा लाभ होत नाही.
जर आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी निर्माण होत असतील,कौटुंबिक वाद होत असतील, तर त्यावर स्वामी समर्थ ने सांगितलेला एक अत्यंत प्रभावी उपाय पाहणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोनच वस्तूंची आवश्यकता आहे. त्यातील पहिली वस्तू आहे नारळ आणि दुसरी वस्तू आहे कापूर. तर हा उपाय कसा पद्धतीने करायचा आहे हे आपण जाणून घेऊया.
हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम मंगळवारचा दिवस निवडावा. तुम्ही हा उपाय कोणत्याही महिन्याच्या मंगळवारच्या संध्याकाळी हा उपाय केला तरीही चालेल. मंगळवारच्या संध्याकाळी स्वच्छ हातपाय धुऊन आपण देवघरात देवासमोर बसायचे आहे आणि नारळ व कापूर सोबत ठेवायचा आहे. तो नारळ सोलायचा नाही न सोलता त्यांना याचा वापर करायचा.
त्यानंतर तो नारळ आपल्या दोन्ही हातात धरायचा आहे व त्यावर कापूर ठेवून तो कापून पेटवायचा आहे. पेटवल्यानंतर तो दोन्ही हातात घट्ट धरून देवासमोर प्रार्थना करायची आहे की, आमच्या घरावरील सर्व संकटे दूर कर, आमच्या आर्थिक अडचणी पासून सुटका कर,आमच्या घरात सुख समृद्धी नांदू दे.अशी प्रार्थना करून तो नारळ खाली ठेवायचा आहे. ही प्रार्थना करीत असताना अगदी देवांवर आपली निष्ठा असणे, विश्वास असणे खूपच गरजेचे आहे. आपले मन हे अजिबात विचलित होता कामा नये.
दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून हा नारळ घेऊन पुन्हा एकदा देवघरात देवासमोर प्रार्थना करून हा नारळ वाहत्या पाण्यात म्हणजेच नदीत विसर्जित करायचा आहे. तर मित्रांनो असा हा साधा सोपा उपाय आणि तसेच कमी खर्चिक प्रभावशाली असा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये अवश्य करून पहा.
मित्रांनो हा उपाय मात्र तुम्हाला मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. अगदी मनोभावे व श्रद्धेने तुम्ही हा जर उपाय केला तर त्याचे लाभ तुम्हाला नक्कीच होतील. तर हा उपाय नक्की करून पहा. यामुळे घरातील सर्व संकटे दूर होतीलच. तसेच आर्थिक संकटांपासून सुटका होईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.