मुख्य दरवाजावर लावा 5 गोष्टी थांबलेली सगळी कामे होतील.

वास्तूशास्त्र

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो भाग्याची साथ कोणाला नको असते सांगा बर सगळ्यांनाच हवी असते. लोक भाग्याची साथ मिळवण्यासाठी लोक वाटेल ते उपाय करतात. पण वास्तूमध्ये भाग्याची साथ मिळवण्यासाठी अतिशय सोप्या गोष्टी सांगण्यात आले आहे.

वास्तुशास्त्रामध्ये असं मानले जाते की जर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वच्छता नसेल किंवा बूट आणि चपला विखुरलेल्या असतील तर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश थांबतो आणि वास्तुदोष निर्माण होतो.

परंतु मुख्य प्रवेशद्वारावर काही गोष्टी लावल्यास भाग्य साथ द्यायला सुरुवात होते या गोष्टी कोणता आहे चला जाणून घेऊया. मित्रांनो कलश हे संपन्नतेचे प्रतीक मानले जाते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे शुक्र आणि चंद्राचा प्रतीक आहे आणि श्री गणेशाच्या रुपात त्याची पूजा केली जाते.

त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारावर रोज कलश भरून ठेवल्यास गणेशाच्या कृपेने शुभ लाभ मिळतो. मित्रांनो लोटी किंवा कलश जे काही ठेवाल त्याचे तोंड रुंद असावे. रोज सकाळी आंघोळीनंतर हा कलश पूर्ण भरून ठेवावा आणि तुम्ही त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकू शकता असं केल्याने सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल.

हे पाणी रोजच्या रोज बदलले पाहिजे. मित्रांनो कोणत्याही शुभकार्याला पूर्वी किंवा कुठल्याही सणाला आपण घराला तोरण लावतो. कारण तोरण घराला लावल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आपली सर्व कार्य अडथळ्याशिवाय पूर्ण होतात.

आंब्याचे पान उत्तम अडून अशोकाच्या पानांपासूनही तोरण बनवता येते. वास्तू शास्त्रामध्ये असे मानले जाते की, सणांव्यतिरिक्त प्रत्येक मंगळवारी घरात तोरण लावल्यास त्याचे खूपच शुभ परिणाम प्राप्त होतात. मुख्य दरवाजावर चिनी नाणी लावणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते.

तीन चिनी नाणी एका लाल दोरीत बांधा आणि घराच्या आतील बाजूच्या मुख्य दरवाजाच्या हँडलवर ठेवा असे केल्याने तुमच्या घरात पैसा जमा होण्याचे प्रमाण वाढते आणि लोकांच्या हातून होणारा अनावश्यक खर्च टाळतो.

मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लाल आणि पिवळा किंवा निळा स्वस्तिक काढा. तुम्हाला हवे असल्यास बाजारातून बनवलेल्या स्वस्तिक आणून सुध्दा तुम्ही मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला लावू शकता. मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला लाल स्वस्तिक लावल्याने घरातील वास्तु आणि दिशा दोष दूर होतात.

दुसरीकडे मुख्य दरवाजाच्या अगदी वर मध्यभागी निळ्या स्वस्तिक लावल्याने घरातील लोक वाईट नजरेपासून दूर राहतात. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती किंवा चित्र ठेवण्यापूर्वी काही नियम जाणून घेणे गरजेचेआहे. असे म्हणतात की, ज्या बाजूला श्री गणेशाचं पोट असतं तिथे समृद्धी असते.

ज्या बाजूला पाठ विसावते तिथे गरिबी असते म्हणून जेव्हा-जेव्हा मुख्य दरवाजावर गणेशजी ठेवाल तेव्हा तेव्हा त्यांना आतल्या बाजूने ठेवा. बाहेर लावल्याने तुमच्या घरावर विपरीत परिणाम होतो. घरात गरिबी वाढू लागते ही दक्षता घेतल्यास भाग्याची योग्य ती साथ मिळेल अशी मान्यता आहे.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *