मित्रांनो, सर्वांनाच वाटते की, आपल्याकडे भरपूर पैसा असावा. यासाठी भरपूर जण मेहनत कष्ट घेत असतातच. परंतु मित्रांनो एवढे कष्ट मेहनत घेऊन देखील त्यांची इच्छा पूर्ण होत नाही म्हणजेच त्यांच्या अडचणी काही केल्याने कमी होत नाहीत. पण काहींच्या बाबतीत ते खरे होते, तर काही व्यक्ती कितीही मेहनत घेतली, कितीही कष्ट केले तरीही त्यांची परिस्थिती बदलत नाही.
त्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करतो व आपली आर्थिक प्रगती करण्याचा प्रयत्न करतो. त्या उपायांपैकी एक उपाय म्हणजे मनी प्लांट किंवा लक्ष्मी वेल. या झाडाचे नावच मनी प्लांट म्हणजे पैशाचे रोप. आपण याला लक्ष्मी वेल म्हणजे लक्ष्मी प्रदान करणारे रोप म्हणतो. मनी प्लांट घरी आणून आपण आपल्या आर्थिक परिस्थितीत बदल घडवून आणू शकतो.
अनेकांच्या दारामध्ये मनी प्लांट आपणाला पाहायला मिळतो. परंतु ते कशाप्रकारे ठेवावे? कोठे ठेवावे? हे आपल्याला माहीत नसल्याने त्याचे पूर्ण लाभ आपल्याला मिळत नाही. मित्रांनो, योग्य ठिकाणी मनी प्लांट लावून आपल्या घरात सुख व समृद्धी बरोबरच धनाचाही वर्षाव करता येईल. मनी प्लांटचा वापर अनेकजण घरात सजावटीसाठीही करतात. लक्ष्मी प्राप्तीसाठी हे रोप घरातच लावले जाते.
आपण जेव्हा मनी प्लांट चे रोप घरी आणणार असतो त्यावेळेस ते रोप आपण खरेदी करूनही आणायचे नाही किंवा कोणालाही विचारून किंवा सांगून देखील आणायचे नाही. ते गुपचूपपणे आणायचे आहे. गुपचूपपणे एक फांदी तोडून कोणालाही न सांगता घरी आणावी. परंतु ही फांदी तोडताना आपण ज्यांच्या घरातून ही फांदी आणत आहोत ते धनवान, श्रीमंत व समृद्ध असावेत.
त्यांच्या घरामध्ये नित्यनियमित देवांची पूजाअर्चना होत असावी. या गुपचूपपणे चोरून आणलेल्या मनी प्लांटमुळे तुमच्या घरात धन व सुख समृद्धी येईल. मनी प्लांट घरात लावल्यानंतर जर त्याचे एखादे पान पिवळे पडले असेल किंवा खराब झालेल्या असतील तर त्या लगेचच काढून टाकायच्या आहेत. त्या तशाच ठेवायच्या नाहीत.
मनी प्लांट घरात आणताना गोल व छोट्या छोट्या पानांचे बघून आणावे. कुंडीमध्ये मनी प्लांट असेल किंवा बाटलीमध्ये असेल तरीही मनी प्लांटच्या मुळ्या कोणाला दिसणार नाही अशाप्रकारे मुळ्या झाकून द्याव्यात. बाटली असेल तरीही तिला रॅपर लावावे म्हणजे त्याच्या मुळ्या कोणाच्या दृष्टीस पडणार नाही.
मनी प्लांट पिवळसर, पोपटी नसावे. जर ते हिरवेगार असेल तर आपली प्रगतीही वेगाने होते. मनी प्लांट जितक्या वेगाने वाढते तितक्या वेगाने आपली प्रगती होत राहते. मनी प्लांट लावताना मुख्य दरवाजाच्या बाजूला घरात आतील बाजूस लावावे. त्याचा वेल दरवाजाच्या वरती जाईल म्हणजे आपण घरात प्रवेश करताना,किंवा कामासाठी बाहेर पडताना आपल्या डोक्यावर मनी प्लांट असावा.
मनी प्लांटच्या कुंडीला किंवा बाटलीला लाल रंगाची रिबन बांधावी. यामुळे त्याच्या आपल्याला दुप्पट फायदे मिळतात. तसेच मित्रांनो तुम्ही जेव्हा मनी प्लांटला पाणी घालीत असताना एका ग्लासात पाणी घेऊन त्यात दोन चमचे दूध टाकावे व मग ते पाणी मनी प्लांटला घालावे. त्यामुळे मनी प्लांट वेगाने वाढतो व प्रगतीही वेगाने होते.
तर मित्रांनो तुमच्याही घरी जर मनी प्लांट चे रोप असेल तर या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि या गोष्टी तुम्ही नक्की करून पहा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच तुमच्या जीवनामध्ये फरक झालेला दिसून येईल. तुमची प्रगतीकडे वाटचाल सुरू होईल.
टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.