मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडीअडचणी असतात प्रत्येक जण कोणता ना कोणता दुःखाला सामोरे जात असते प्रत्येकाला सर्वकाळ हा सुखाचा येईल असे नाही काहींना थोडाफार दिवसासाठी का असेना दुःखही असतेच तर तुम्हाला कोणती एखाद्या गोष्टीमुळे जर चैन पडत नसेल किंवा एखादी कोणतीही गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे घडत नसेल.
तर तुम्ही त्या गोष्टीसाठी खूप बेचैन होऊन जातात जर तुमच्या मनासारखी एखादी गोष्ट जरी नाही झाली तर त्याची तुम्हाला चिडचिड देखील होते व त्यामुळे घरामध्ये भांडण तंटा वाढत जाते. मोहिनी एकादशी चे व्रत केल्याने सर्व दुःखातून मुक्ती मिळते असं खुद्द भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे.
काय आहे मोहिनी एकादशी आणि कसं करावं कधी करायचे आहे मोहिनी एकादशी. चला तर मित्रांनो जाणून घेऊया मोहिनी एकादशी नेमकी कशी करायची.भगवान श्रीहरी विष्णूनी भक्तांच्या रक्षणासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारची रूपे घेतले त्यातलं एकरूप आहे ते म्हणजे मोहिनी रूप भगवान श्रीहरी कृष्णाने मोहिनीचे हे घेतलेले रूप हे एक स्त्री रूप आहे.
आणि हे रूप घेण्यामागचे कारण ते सुद्धा भक्तांचे रक्षणासाठी घेतलेले आहे समुद्रमंथन जेव्हा झालं त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे रत्ने बाहेर आले त्यातून मातालक्ष्मी बाहेर आली त्याचबरोबर विष देखील बाहेर आलं आणि हे सर्व बाहेर आल्यानंतर सर्वात शेवटी तो अमृत कलश जो पिल्याने मनुष्य देवता सगळेच अमरत्वाला प्राप्त होतात.
व्यक्तीला त्या देवाला कोणीही काहीही नुकसान पोहोचू शकत नाही.असा अमृत कलश घेऊन धन्वंतरी बाहेर आलें तो अमृत कलश मिळवण्यासाठी देव व राक्षस यांच्यामध्ये युद्ध सुरु झाले. युद्ध चालू असताना कोणीही माघार घ्यायला तयार नव्हते त्यामुळे सर्व देवी देवता श्री हरी भगवान विष्णूना शरण गेले.आणि त्यांनी मोहिनी रूप धारण केलं.
मोहिनी रूप धारण करून राक्षसांचे लक्ष भगवान श्री हरी कृष्णांनी वेधून घेतले.आणि मग मोहिनी रूप धारण करूनच अमृत संरक्षण भगवान श्रीहरी कृष्णाने केले.मोहिनी एकादशीच्या दिवशी भक्तांनी सकाळी लवकर उठून सर्वात अगोदर स्नान करावे त्याच्यानंतर ना आपल्याला आपल्या देवघरांमध्ये जाऊन पूजा करायची आहे.
श्रीहरी विष्णूंची मूर्तीची पूजा आपल्याला करायची आहे किंवा त्यांची कोणतीतरी एक प्रतिमा आपल्याला आपल्या देवघरांमध्ये स्थापन करायची आहे कृष्णांना प्रिय असणारी तुळस फुल व फळे व्हायचे आहे. विष्णू सहस्त्रनाम ऐकावे किंवा त्याचे आपल्याला वाचन देखील केले तरी चालू शकते.
त्याचबरोबर श्री भगवान विष्णू यांचा कोणत्यातरी एका मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे व तो जर आपल्याला 108 वेळा करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला श्री विष्णूंची किंवा विठ्ठलाची आरती करायची आहे व आपल्याला एकादशीच्या पूर्ण दिवस उपवास करायचा आहे.
गरजू व्यक्तींना आपल्याला मदत करायची आहे व त्याचबरोबर त्यांना अन्नदान देखील करायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण देवपूजा करूनच आपला उपवास सोडायचा आहे हे व्रत प्रभू श्रीरामाने सुद्धा केलेलं होतं असा पुराणांमध्ये उल्लेख केलेला आहे प्रभू श्रीराम जेव्हा त्यांच्या विरहामध्ये दुःखी होते.
तेव्हा त्यांनी त्यांच्या गुरूंना विचारले तेव्हा त्यांचा गुरुनी मोहिनी एकादशी करण्याचे त्यांना सुचवले. त्याच्यानंतर श्री प्रभू रामचंद्रांनी मोहिनी एकादशीचे व्रत केले. मोहिनी एकादशीचे प्रत केल्याने सहस्त्र गोदानाचे पुण्य आपल्याला प्राप्त होत एवढेच नाही तर अश्वमेध यज्ञ केल्याचे देखील आपल्याला पुण्य मिळतं. असे देखील सांगण्यात येतो इतकं हे पवित्र असो मोहिनी एकादशीची उरत आहे हे व्रत केल्यामुळे तुम्हाला काही अडीअडचणी दुःख असेल तर हे व्रत केल्याने तुमचे सर्व अडचणी दूर होणार आहेत.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.