मेष राशींच्या व्यक्तींचे वैशिष्ट्य आणि उपाय..

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो, भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार आपल्याकडे बारा राशी पाहिल्या जातात. त्या व्यक्तीच्या राशीनुसार तसा स्वभाव आपल्याला त्या-त्या व्यक्तींमध्ये पाहायला मिळतो. मेष राशीच्या मंडळींचा स्वभाव, वैशिष्ट्य, नातेसंबंध, नोकरी किंवा व्यवसाय, आरोग्य, उपासना यांच्याबाबत आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

1) कालपुरुषाच्या कुंडलीनुसार पहिली रास येते मेष. मेष ही राशीचक्रातली प्रथम रास आहे. मेंढा हे या राशीचे प्रतीक आहे. मंगळाच्या सकारात्मकतेने भरलेली ही रास असून, ही अग्नी तत्वाची रास आहे.
2) मेष राशीचा स्वामी मंगळ असून अगदी एका वाक्यात मेष राशिबद्दल सांगायचं झाल्यास नेतृत्व, प्रचंड आशावाद आणि आत्मविश्वास, ऊर्जा आणि उत्साह म्हणजे मेष राशी होय.
3) मेंढा हे मेष राशीचे प्रतिक आहे. त्यामुळे या राशीचा अंमल हा डोक्यावर असतो. मेष राशीचे लोक डोक्याने फार काम करतात. म्हणूनच त्यांच्यामध्ये शौर्य व धाडस हे ओतप्रोत भरलेलं असतं.अन्यायाविरुद्ध बंड पुकारणे हा या राशीचा स्थायी भाव आहे. अगदी साधी चर्चा करीत असतांना आपला मुद्दा पटवून देण्यासाठी हे लोक भांडणापर्यंत जातात.कारण त्यांचा स्वतःवर व ते करीत असलेल्या प्रयत्नांवर पूर्ण विश्वास असतो.
4) शांत बसणे मेष राशीच्या लोकाना जमत नाही. अंगात धडाडी भरलेली असल्यामुळे त्याच धडाडीने कोणत्याही कामाचा श्रीगणेशा करण्यात या लोकांचा हातखंडा असतो. राशी प्रतिक मेंढा असल्यामुळे मेंढ्यापप्रमाणे धडक मारण्यासही हे लोक चुकत नाहीत. हे करीत असतांना होण्याच्या परिणामांचीही त्यांना चिंता नसते. मेष राशीच्या लोकांना भावनांचे खोटे प्रदर्शन सहन होत नाही. हे लोक छोट्या छोट्या गोष्टींवरही रागवतात. त्याचबरोबरच त्या रागाला चटकन दूरही सारतात.
5) मेष राशीच्या मंडळींमध्ये आणखीन एक मुख्य लक्षण म्हणजे या मेष राशीचे लोकं कोणतेही कार्य आणि वस्तू यांचा कुशलतेने व्यवस्थित व्यवस्थापन करतात.
6) मेष जन्म लग्नाचे व्यक्ती तडफदार असतात. यांचे व्यक्तिमत्व खूप आकर्षक असते हे दिसायला देखणे रुबाबदार असतात. काहींशी निर्दयी असतात.अशा व्यक्ती नेतृत्व करणाऱ्या असतात सामर्थ्यवान असतात. या व्यक्ती कोणावरही पटकन विश्वास ठेवत नाहीत. यांच्या या स्वभावामुळे लोक यांना थोडे घाबरून राहतात. तसेच बोलताना मोजकेच बोलतात. या लोकांचे कोणाशी जास्त पटत नाही. या राशाचे लोक जोडीदारावर नेहमी वर्चस्व गाजवतात. ही रास थोडी घमेंडी रास आहे.
7) मेष राशीच्या व्यक्तींचे जोडीदार हे कर्क, सिंह, तूळ आणि धनु राशीचे असू शकतात. मेष राशीच्या व्यक्तींचे बहुदा इतर राशींच्या तुलनेत वरील राशींच्या व्यक्तींशी जुळते.
8) मेष राशीतील जातक मानसिक रुपामध्ये खूपच शक्तिशाली असतात, त्यामुळे आपल्या सकारात्मक आणि मानसिकतेच्या आधारे ही मंडळी आपल्या कार्यात यश हे स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर, मनगटाच्या जोरावर खेचून आणण्यामध्ये यशस्वी होतात.यांच्यामध्ये एक कामाच्या प्रती आणि एकंदरीत जीवनाच्या सुद्धा प्रति उत्साहाची भावना ही नेहमीच भरभरून असते.
9) हे व्यक्ती कोणत्याही प्रकारची कामे ही अगदी नियोजनरीत्या आयोजित करु शकतात. कारण हे लोक उत्तम आयोजक म्हणून ओळखले जातात. या आपल्या खाजगी आयुष्यात जगताना अतिशय नीती वादी असण्याचे पाहायला मिळातात.हे लोक याच तत्त्वला आयुष्यात कायम धरुन चालताना दिसतात. तसेच हे माणसे कायम स्टायलिश लाइफस्टाइल पसंत करतात. यांना चांगलं खायला, गानी ऐकायला, संगीत ऐकायचं, प्रसंगी डान्स करायचा या सगळ्या गोष्टी आवडतात .
10) या राशींच्या जातकाला अपघात, भाजणे, मेंदू विकृती, ताप, देवी, मलेरिया रक्ताच्या गाठी, डोकेदुखी आदी आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. जीवनात यशस्वी होण्यासाठी या राशीच्या व्यक्तींनी गणपती आणि काळभैरवाची तसेच कुलदेवतेची उपासना केल्यास यश मिळण्यास मदत होते.
11) या राशीचे लोक सहसा मिल्ट्री, पोलीस खातं, क्राइम ब्रांच, अग्निशामक दल, सर्जन डॉक्टर मेडिकल किंवा मेडिकलची उपकरणे आदी विभागांमध्ये विशेष प्राविण्य मिळवतात. ही रास तल्लख असल्याने आपल्या क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी मिळवतात.
12) ही लोक आनंदी आणि मजेदार असतात. पण ही लोकं त्यांच्या करिअरवर पूर्ण लक्ष केंद्रित करतात. तसेच हे लोकं मनी माइंडेड असतात. समाजात ते स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण करतात आणि त्यांना समाजात खूप मान-सन्मान मिळतो. तसेच त्यांच्याकडे संपत्तीची कमतरता नाही. त्यांना महागड्या वस्तू घेण्याचा शौक आहे.
13) मेष राशीच्या व्यक्तींचा स्वभाव म्हणजे मूतमिंत चैतन्य उसळणारे तारुण्य आणि ओसंडून जाणारा उत्साह होय. अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वात आणि मनगटात भरपूर जोर असतो अपूर्व ताकद असते.स्वभावात हुकुमशाहीपणा त्यांचे बोलणे, वागणे आक्रमक वृत्तीचे असते. यांच्या या स्वभावामुळे यांना अपमान सहन होत नाही. यांचा स्वभाव कडक आणि तापट असतो. काहीवेळा फटकळ बोलून मोकळे होतात. या राशीच्या व्यक्तींना दुसऱ्यांवर वर्चस्व गाजविण्यात आनंद वाटतो. मेष म्हटलं की पराक्रम, धाडस, आत्मविश्वास, निर्धर शक्ती, धडाडी, बाणेदारपणा आपल्याला बघायला मिळतो.
14) कामाच्या बाबतीमध्ये आवेग जास्त प्रमाणात असते. कोणतेही काम वेगाने करण्याची ही मंडळी नेहमीच इच्छा ठेवतात. एखाद्या विषयाचे निर्णय सुद्धा अत्यंत वेगाने हा त्यांचा स्वभाव असतो. कोणत्याही कामाचं निर्णयाचं भिजत घोंगडे ठेवणं त्यांना बिलकुल आवडत नाही आणि तशी माणसं सुद्धा यांना आवडत नाही.
15) ही लोकं जीवनाचा पुरेपूर आनंद घेतात आणि मुक्तपणे खर्च करतात. तसेच हे लोक विनोदी स्वभावाचे पाहायला मिळतात. हे लोक आयुष्यात खूप चिंता कधीच करत नाहीत.
16) कोणत्याही कामाची आखणी करणे ज्याला आपण नियोजन करणं असं म्हणतो त्यामध्ये मत्र यांना फारसा रस नसतो. मात्र काम पुर्णत्वाला घेऊन जाण्याची त्यांची तयारी मात्र जोमात आणि जोरात असते हेच गतिशील मोकळ्या मनाचे प्रतिस्पर्धी सुद्धा असतात आणि नेहमीच कोणत्याही कामांसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देत असतात.
17) उर्जेने परिपूर्ण आहे आणि त्यांना कार्यभार स्वीकारणे आवडते. मेष नेहमी नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आणि ते करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत चैतन्य आणण्यासाठी तयार असतात. मेष हा उत्कट, निष्ठावान आणि दृढ भावनांनी युक्त असतो. ते मनापासून काळजी घेतात आणि गोष्टी निश्चित करण्यात विश्वास ठेवतात. मेष राशीच्या व्यक्ती अद्वितीय, दृढनिश्चयी असतात आणि जीवनाला एक रोमांचक प्रवास वाटतात.
18) नक्षत्रानुसार अश्विनी नक्षत्राचे चार चरण, भरणी नक्षत्राचे चार चरण व कृत्तिका नक्षत्राचे पहिले चरण मिळून नऊ चरण म्हणजे मेष राशी होते. अश्विनी नक्षत्राचा स्वामी केतु असून यात जन्मलेली व्यक्ती देव गणाची असते. बौद्धिक प्रगल्भता, तेज स्मरणशक्ती चंचल व चतुराई असे गुण अश्विनी नक्षतत्रात जन्मलेल्या लोकांच्या अंगी असतात.भरणी नक्षत्राचा स्वामी शुक्र असून यात जन्मलेली व्यक्ती मनुष्य गणाची असते. स्वार्थी वृत्ती, स्वकेंद्रित न होणे तसेच स्वतंत्र निर्णय क्षमतेचा अभाव असणे या नक्षत्राचा स्थायी भाव आहे.कृतिका नक्षत्राचा स्वामी रवि असून यात जन्मलेली व्यक्ती राक्षस गणाची असते. कृतिका नक्षत्रात जन्मलेले लोक अधिक संतापी, आक्रमक व अहंकारी असतात. मात्र त्यांना शस्त्र, अग्नी व वाहन यांच्यापासून भीती असते.
19) याचे मॅनेजमेंट अतिशय उत्तम दर्जाचं असतं. मेष राशी नीतत्वाची त्यामुळे आणि मंगळ उष्ण प्रकृतीच्या ग्रह या राशीचा स्वामी ग्रह असल्यामुळे काही तापट स्वभावाची ज्याला आपण शॉट टेम्पल असं म्हणतो अशी ही राशी असते.परंतु एवढ्या यांना राग येतो ना तेवढाच लवकर यांचा राग शांत सुद्धा होतो.
20) प्रेम, चैतन्य पुढारीपणा व दिशा दर्शविणारी ही रास निकराची लढत दे-ण्यात तयार असते. विलक्षण बुद्धिमत्तेचे दर्शन यामधुन घडते. परंतू प्रसंगी घमंड, अहंकार यातून वेडेवाकडे निर्णय मेष राशीच्या लोकांकडून घेतले जातात. शरीराच्या वैशिष्ट्यांनुसार मेष राशीचे लोकांचा चेहरा – मान लांबट, सशक्त अवयव, डोळे पिंगट रंगाचे, भरपुर राठ केस, खालचे दात अरुंद, सडसडीत बांधा, झरझर चालणे, दिसण्यास तडफदार ही वैशिष्ट्ये सांगता येतील.
21) या राशीच्या लोकांमध्ये आढळून येणारे मुख्य गुण म्हणजे धाडसी सोबतच धैर्यशील व प्रेमळ असणे होय. याशिवाय कर्तृत्ववान, बुद्धिमान, अभिमानी, सदैव उत्साही हे लोक असतात. धडक मारण्याचा मूळ स्वभाव असला तरी हे लोक उपद्रवी नसतात हे विशेष आहे. वेगवेगळ्या विषयात मेष राशीच्या लोकांना रुची असते. कामाचा उरकही या राशीच्या लोकांचा भयंकर असतो अशा प्रकारे हे काही मेष राशीचे वैशिष्ट्य आहेत.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *