माता लक्ष्मी प्रिय असणारी 4 फुलांची झाडं…

अध्यात्मिक माहिती

माता लक्ष्मीला प्रिय असलेली ही 4 फुलांची झाडे तुमच्या घरात असायलाच हवीत. कारण ही फुलांची रोपे घरात लावली तर वास्तुशास्त्रानुसार माता लक्ष्मीचे आगमन सुद्धा आपल्या घरांत होत. मग कोणती आहेत ती पांढरी 4 झाडं? चला जाणून घेऊ या..
वास्तुशास्त्रानुसार झाडांचे महत्त्व सांगितले गेले आहे. कोणते झाड घरात लावावे? कोणती लावू नये?

याबद्दल सविस्तर वर्णन वास्तुशास्त्रामध्ये आपल्याला आढळत आणि त्यामध्ये 4 पांढर्‍या झाडांबद्दल सांगितलं आहे. अशी 4 रोपे सांगितली आहेत जी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि त्या रोपांचे आपल्या अंगणामध्ये किंवा गॅलरीमध्ये असं आपल्या घरात सुद्धा माता लक्ष्मीला आमंत्रित करत आहे.

1. पांढरी रुई : हिला श्‍वेत मांदार असंही म्हटलं जातं. या वनस्पतीत माता लक्ष्मीचा वास असतो. याची 14 वर्षे पूजा केली असता त्याच्या बुडाशी गणपती तयार होतो अर्थात त्याच्या खोडामध्ये गणपती तयार होतो अशीही मान्यता आहे. तसेच अनेक अध्यात्मिक गोष्टींसाठी या वनस्पतीचा उपयोग करतो. तसेच ज्याला जलद धनलाभ हवा आहे त्यांनी आपल्या घरासमोर हे झाड नक्की लावावं. हे झाड आपण पूर्व किंवा उत्तर दिशेला जाऊ शकता. पांढऱ्या रुईने फक्त धनलाभ नाही तर शत्रूवर विजय ही प्राप्त होतो. तसेच ज्यांना वैवाहिक जीवनात काही समस्या आहेत त्यांनी सुद्धा हे झाड लावावं असा सल्ला वास्तुशास्त्र देतो.

2. पांढरी कन्हेर: ही वनस्पती लक्ष्मी कारक असून हिच्या ठाई माता लक्ष्मी वास करते म्हणून गणपती घरात लावणे अत्यंत शुभ मानले जातात. याला शेवग्याच्या शेंगा सारखी छोटीशी शेंग येत असेल आणि इथे आल्यावर तिची पंचोपचार पूजा करून तिजोरी ही शेंग ठेवावी. घरात सकारात्मकता तर निर्माण होते पण मनही प्रसन्न होत. असं ही म्हणतात की, ज्या प्रकारे कन्हेरा झाड वर्षभर फुलांनी डवरलेला असतं. त्याच प्रकारे या घराच्या अंगणात आहे गॅलरीत आहे जिथे लावलं जातं तिथेही वर्षभर धनाचा तुटवडा जाणवत नाही.

3. पांढरी शेवंती: ही वनस्पती देवीचा रूप मानले जाते. देवीचा निवास या वनस्पतीच्या ठिकाणी असतो. ही वनस्पती घरात असणं सगळ्यात कार्यासाठी शुभ मानले जात. त्यामुळे तर देवीला शेवंतीच्या फुलांची वेणी सुद्धा वाहिली जाते. शुभ कार्याची श्रीमंतीच्या फुलांनी शोभा वाढते. शेवंतीच्या फुलांचे झाड घरात लावावे अंगणात लावणार गॅलरीमध्ये लावणे अत्यंत शुभ मानले जाते.

4. पांढरी जास्वंद : जास्वंद ही अत्यंत औषधी वनस्पती आहे. अनेक आजारांवर जास्वंदीचा उपयोग केला जातो. स्त्रियांच्या आजारांसाठी विशेषतः ही गुणकारी आहे. लाल जास्वंद जसे गणपती बाप्पा आवडतं तशीच पांढरी जास्वंद माता लक्ष्मीस प्रिय आहे. त्यामुळे पांढऱ्या जास्वंदीचे रोप तुम्ही तुमच्या घरात लावू शकता. तसेच माता लक्ष्मी चरणी ही पांढरी जास्वंद अर्पण करू शकतात. त्यामुळे महालक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल.

मग तुमच्या घरातही माता लक्ष्मीच्या कृपेने भरपूर पैसे द्यावे, सुख- समृद्धी यावी असं तुम्हाला वाटत असेल तर या चार पांढर्‍या झाडांपैकी कमीत कुठलाही एक झाड तरी तुम्ही तुमच्या घरात नक्की लावा आणि घरांमध्ये माता लक्ष्मीला आमंत्रित द्या. तुमच्या पैकी कोणाकडे आहे यातील एक झाड असेल तर तुमचा अनुभव कसा आहे ते आम्हाला कमेंट नक्की सांगा..

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *