मंदिरात असे काढा स्वस्तिक , प्रत्येक इच्छा होईल पूर्ण..

अध्यात्मिक राशिभविष्य

हिंदू धर्मात शास्त्रामध्ये स्वस्तिकला प्रमुख शुभ आणि सकारात्मक उर्जादायक चिन्ह मानले जाते. तसेच स्वस्तिकाचा वापर जगभरातील संस्कृतींमध्ये देखील केला जातो. त्यामुळेच भारतीय संस्कृतीतील शांतता आणि सातत्याचे प्रतीक असलेले स्वस्तिक चिन्ह हे जे जर्मनीतील हुकूमशहा हिटलर याने आर्यांच्या वंशश्रेष्ठत्वच्या संकल्पनेत एक सुचक म्हणून वापरले होते.

त्यामुळे स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे शुभप्रतीक आहे. याशिवाय, असे म्हणतात की, याचा अर्थ सर्वांचे कल्याण असो असा होतो. स्वस्तिक हे शांती, समृद्धी आणि मंगल यांचे प्रतीक मानले जाते. कोणत्याही अग्रपूजेचा मान या चिन्हास आहे. स्वस्तिक हे मध्ये सूर्य, इंद्र , वायू , पृथ्वी , लक्ष्मी,विष्णू, ब्रह्मदेव शिवपार्वती तसेच श्री गणेश अशा अनेक देवतांचा वास असतो असे हिंदू शास्त्रात सांगितले जाते.

म्हणून कोणत्याही पूजेमध्ये सुरुवात ही स्वस्तिक काढुन करण्याची प्रथा आहे. स्वस्तिकचे हिंदु धर्मानुसार चार बाहू सांगितले जातात यामध्ये अनुक्रमे धर्म, अर्थ, काम व मोक्ष आहेत आणि भगवान श्री विष्णुंचे हात असल्याचे सांगितले आहे तसेच ते या चारही दिशांचे पालन आणि रक्षण करत असतात.

असे सांगितले जाते की, स्वस्तिकाची आडवी रेघ ही विश्वाचा विस्तार आणि उभी रेघ ही विश्वाच्या उत्पत्तीचे कारण आहे. तसेच स्वस्तिकाचा मध्यबिंदू हा भगवान श्री विष्णुंचे नाभिकमळ असून श्री ब्रम्हाचे उत्त्पत्तीस्थान मानले जाते.जर देवघरासमोर स्त्रीने स्वस्तिक काढलं त्या स्त्रीला वैधव्याचा भीती राहत नाही असे पद्मपुराण मध्ये सांगितले जाते.

जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असतील तर देवघरासमोर हळदीने स्वस्तिक काढल्यास त्या दुर होतात. तसेच तुमच्या देवघरासमोर कुंकवाने स्वस्तिक काढल्यास तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात. तसेच तुमच्या जवळच्या एखाद्या मंदिरात जाऊन तिथे उलटे स्वास्तिक काढाल्यास तुमच्या मनातील सर्व इच्छाची पुर्तता होते.

हिंदु धर्मशास्त्रनुसार उलटे स्वस्तिक केवळ मंदिरामध्येच काढण्यास संमती आहे.तुम्ही चुकुनही तुमच्या घरात किंवा दारावर हे उलटे स्वस्तिक काढला तर अतिशय विपरीत परिणाम तुमच्या घरावर होत असतात. मात्र तुम्ही तुमच्या एखाद्या विशेष इच्छापूर्तीसाठी एखाद्या मंदिरामध्ये उलट स्वस्तिक काढलात तर तुम्हाला अतिशय शुभदायी फळ प्राप्त होते.

त्यामुळे स्वस्तिक ला सर्व दिशाच सौरभ मानले जाते. तसेच असे म्हणतात की कोणत्याही शुभ कामाची सुरुवात ही स्वस्तिक काढून केल्यास त्या कामात कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण होत नाहीत.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *