मकर राशीतील लोकांच्या खास गोष्टी ! कसा असतो यांचा स्वभाव?

राशिभविष्य वास्तूशास्त्र

मित्रांनो, ज्योतिष शास्त्रामधील राशीचक्रातील दहावी राशी आहे मकर. या राशीचा स्वामी शनी आहे आणि मकर राशीचे लोकं मेहनती, समर्पित आणि निष्ठावान असतात. त्यांचा शासक ग्रह शनि आहे, ज्यामुळे ते अत्यंत शिस्तप्रिय असतात. या राशीचे लोकं जे काही काम निवडतात त्यात ते प्राविण्य कमवितात. मकर राशीचे लोकं त्यांच्या कामाप्रती समर्पित असतात. त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती आणि समृद्धी मिळविण्यासाठी ते कठोर परिश्रम करतात. यशस्वी होण्यासाठी ते शॉर्टकट मारत नाही.

जेवढे बोलायचे आहे तेवढेच बोलतात , बोलताना सुद्धा खूप अभ्यास करूनच बोलतात. त्यामुळे हे जे काही बोलतात ते समोरच्या व्यक्तीला पटते. या गोष्टीमुळे म्हणजे फक्त बोलण्यामुळे ह्या व्यक्ती समाजावर प्रभाव पाडू शकतात. मकर राशी हि चर स्वभावाची राशी आहे.चर स्वभाव म्हणजे हे मानसिक चंचल असतात. ह्यांना खूप गोष्टींमध्ये आवड असते.विविध क्षेत्रामध्ये हे लोक भाग घेत असतात.कोणतेहि काम दिखावा म्हणून करत नाहीत किंवा कोणताही अहंकार ह्या राशीच्या लोकांकडे नसतो.

आपण केलेल्या कामाचे कौतुक स्वतः करत नाही आणि दुसऱ्यांना सांगत हि नाही म्हणून मकर राशीचे लोक जास्त समाजासमोर येत नाही. चर स्वभाव असल्याने जर भरपूर लोक एकत्र असतील तर ह्यांना काम करायला खूप उत्साह येतो. मकर राशी हि तमोगुणी राशी आहे.

ह्या लोकांना शिळे अन्न खायला आवडते आणि मकर राशीचा स्वामी हा शनी आहे शनी असल्यामुळे ह्यांना उदासीनता येऊ शकते. शनी असल्यामुळे हि लोक रूढी प्रिय असतात म्हणजे देव धर्म , कुलाचार ह्या सर्व गोष्टींचे सुद्धा पालन करत असतात.

मकर राशीच्या लोकांना जुन्या गोष्टींची खूप आवड असते म्हणजे जुने शास्त्र किंवा विचार कसे स्वतःच्या जीवनात अंमल करता येईल ह्याचा विचार करत असतात. अनुभवातून शिकणे हा मकर राशीचा एक गुण आहे. राशी स्वामी शनी असल्याने हि लोक कर्णाचा हिशोब चांगला ठेवतात.

स्वतःच्या कर्मसोबतच जर कोणी समोरचा व्यक्ती चुकत असेल तर त्याला त्याची चूक दाखवून देतात.मकर राशीचे लोक समोरच्या व्यक्तीला खूप छान समजून घेतात आणि भावना जपतात. कुटुंबाची जबाबदारी किंवा सासू सासऱ्यांची एक मकर राशीची स्त्री खूप छान पार पडते.

मकर राशीच्या लोकांना स्वतःची मर्यादा ओलांडायला आवडत नाही.राशी स्वामी शनी असल्याने हि लोक त्यागी असतात म्हणजे दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःच्या गोष्टींचा त्याग करायला तयार असतात.खूप कष्ट करण्याची ह्या लोकांची तयारी असते.मकर राशी हि पृथ्वी तत्वाची राशी आहे.एकाग्रता खूप असते आणि कोणत्याही गोष्टीचे नियोजन हे स्थिर मनाने करू शकतात.

मकर राशीच्या लोकांना स्थिरता आवडते. जे चालू आहे नीट त्यामध्ये ते कोणतीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून रिस्क घेत नाहीत. मकर राशीचे चिन्ह हे एक सुसर आहे म्हणजे शरीर मगरी सारखे आहे. हा प्राणी जास्त सुस्त बसून असतो आणि हालचाली करत नाही. मकर राशीचा अंमल हा गुडघ्यांवर असतो. त्यामुळे ह्यांना गुडघ्याचे किंवा संधीवाताचे आजार होऊ शकतात

मकर राशी हि समाधानी राशी आहे त्यामुळे जास्त महत्वकांक्षा नसतात. खूप जास्त अपेक्षा सुद्धा करत नाही.मकर राशीचे लोक नाती तुटू नये म्हणून पडती बाजू सुद्धा घेतात. स्वाभिमानी पण असतात. मकर राशीचे लोक खूप नम्रपणे बोलतात , एकदम सेवाभावी वृत्ती असते. खूप निस्वार्थ पणे मेहनत करतात आणि दुसऱ्यांना मदत सुद्धा करतात.

तर मित्रांनो या होत्या मकर राशीच्या लोकांच्या काही खास गोष्टी. अश्या प्रकारचा स्वभाव हा मकर राशीच्या व्यक्तींचा असतो.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *