नमस्कार मंडळी
महिन्याच्या सुरवातीस आपणास काही चांगल्या बातम्या मिळतील तर काही बाबतीत सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा मिळेल. आपण जर एखादे बेकायदेशीर कृत्य केले असेल तर आपणास त्याचे यथोचित परिणाम भोगावे लागण्याची शक्यता आहे.
नोकरी करणाऱ्या जातकां कडून त्यांचे वरिष्ठ अनेक बाबतीत सल्ला सुद्धा घेतील. अशावेळी स्वतःला सिद्ध करण्याची जवाबदारी आपल्यावरच राहील. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढेल. हा महिना व्यापाऱ्यांसाठी काहीसा नाजूक असल्याने त्यांना थोडी काळजी घ्यावी लागेल.
आर्थिक गुंतवणूक सुद्धा योग्य प्रमाणात करणेच हितावह होईल. हा महिना आर्थिक दृष्ट्या लाभदायी आहे. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या सहकार्याने आपल्या प्राप्तीत वाढ होईल. विद्यार्थी आपल्या अभ्यासात पूर्णपणे रमून जातील. त्यांना आपल्या शिक्षकांची मदत सुद्धा भरपूर मिळेल. काही काळासाठी कुटुंबियां पासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे.
वैवाहिक जीवनातील तणाव निवळू लागला तरी सुद्धा प्रतिकूलता संपली नसल्याने जोडीदारास त्रास देऊ नये. आपल्या सासुरवाडीस एखादी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या मदतीस धावावे.
विवाहेच्छुकांना विवाह बंधनात अडकण्याची संधी मिळेल. आरोग्याच्या बाबतीत हा महिना सामान्यच आहे. योग्य व्यायाम करा व त्याच्या जोडीने पौष्टिक आहार सुद्धा घ्या. महिन्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.