मित्रांनो, आपण प्रत्येक जण हे कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे उपवास, व्रत करीत असतात. प्रत्येक जण हा आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी तसेच आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी तसेच आपल्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी कोणत्या ना कोणत्या देवी देवतांची अगदी मनोभावे श्रद्धेने पूजा व्रत करीत असतात.
तर मित्रांनो बरेच जण हे शिवशंभूंचे म्हणजेच शंकरांचे भक्त आहेत. सोमवार हा शंकरांचा वार मानला जातो. या दिवशी बरेच जण उपवास देखील करीत असतात. मित्रांनो महाशिवरात्री या दिवशी शंकरांची विशेष अशी पूजा केली जाते. या दिवशी बरेच लोक हे उपवास देखील करतात आणि महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचे दर्शन देखील घेत असतात.
तर मित्रांनो तुम्हाला देखील तुमच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असेलच तर मित्रांनो आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही महाशिवरात्रीला जर हा उपाय केला तर यामुळे तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होऊ शकते. तर तो उपाय नेमका कोणता आहे चला तर मग जाणून घेऊया.
तर मित्रांनो महाशिवरात्रीला खूपच विशेष असे महत्त्वाचे स्थान आहे. तर तुम्ही या दिवशी योग्य ब्राह्मणांचा सल्ला घेऊन पारदच्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना करून दररोज पूजा करू शकता. यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होते.
मित्रांनो महाशिवरात्रीला जर तुम्ही गरिबांना अन्नदान केले तर तुमच्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही.
तसेच पितरांच्या आत्म्याला शांती देखील मिळते. तसेच मित्रांनो तुम्ही जर या दिवशी पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक केला आणि “ओम नमः शिवाय” या मंत्राचा जप केला तर यामुळे मनाला शांती मिळते. मित्रांनो, शिवरात्रीच्या दिवशी पीठाने 11 शिवलिंगे बनवून त्यांना 11 वेळा जलाभिषेक करावा.
या उपायाने संतती होण्याची शक्यता निर्माण होते. शिवलिंगाचा 101 वेळा जलाभिषेक करावा. त्याच वेळी ओम हौं जुन सह. ओम भुरभुव: स्व. ओम त्रयंबकम यजमाहे सुगंधी पुष्टीवर्धनम्। उर्ववारुकमिव बंधननामृत्यो मुखिया ममृतात् । ओम स्वाः भुवः ॐ हा मंत्र जपत रहा. यामुळे रोग बरा होण्यास फायदा होतो.
तसेच शिवरात्रीला 21 बिल्वांच्या पानांवर चंदनाने ओम नमः शिवाय लिहून शिवलिंगाला अर्पण करा. यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतात. वरील हे उपाय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी जर केले तर यामुळे तुमच्या जीवनामध्ये नक्कीच सुख शांती लाभेल. तसेच इच्छा देखील पूर्ण होतील आणि कोणत्याही प्रकारच्या अडचणी देखील तुम्हाला येणार नाहीत.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.