माघ पौर्णिमा कधी आहे? पूजा विधी नक्की जाणून घ्या

Uncategorized

मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात अनेक सण, उत्सव अगदी आनंदाने साजरी करताना आपणा सर्वांना पाहायला मिळतेच. प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्या देखील हिंदू धर्मामध्ये खूपच महत्त्वाची मानली गेलेली आहे. विशेष महत्त्व असे त्यांना प्राप्त झालेले असते. मित्रांनो सध्या माघ महिना सुरू आहे आणि या महिन्यांमध्ये येणारी जी पौर्णिमा आहे हिला माघ पौर्णिमा म्हणून ओळखले जाते.

या माघ पौर्णिमेला विशेष असे महत्त्व दिले गेलेले आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले तर त्याचा आपल्याला नक्कीच लाभ देखील मिळतो. मित्रांनो हा दिवस खूपच महत्त्वाचा दिवस मानला गेलेला आहे.

मित्रांनो माघ पौर्णिमेला जर तुम्ही नदीत पवित्र स्नान केले तर यामुळे आपल्या पुण्याची प्राप्त होते. म्हणजेच त्या पापापासून आपली सुटका होते अशी मान्यता आहे. या दिवशी बरेचजण उपवास देखील करीत असतात. पवित्र नद्यांमध्ये स्नान देखील करीत असतात. माघ पौर्णिमा ही खूपच विशेष अशी मानली गेलेली आहे.

मित्रांनो पूजेच्या दृष्टीने प्रत्येक महिन्याची पौर्णिमा ही विशेष मानली जाते. परंतु माघ पौर्णिमेला खूपच महत्त्वाचे आणि धार्मिक स्थान देखील दिले गेलेले आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे महत्त्वाचे मानले जाते. ज्यामुळे आपल्याला पापापासून सुटका देखील मिळते आणि पुण्याची प्राप्ती देखील आपणास भेटते.

हिंदू पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान विष्णू गंगा नदीत निवास करतात. अनेक अनुयायांचा असा विश्वास आहे की, या दिवशी प्रार्थना केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. या प्रसंगी माघ मेळा देखील भरतो जो एक मोठा धार्मिक सण आहे.

तर मित्रांनो यावर्षीची माग पौर्णिमा 5 फेब्रुवारी रोजी आहे. चार फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 09:29 वाजता पासुन सुरू होईल आणि 5 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 11:58 वाजता समाप्त होईल.

मित्रांनो या माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान करावे. जर तुम्हाला गंगेत स्नान करणे शक्य नसेल तर तुम्ही गंगेचे पाणी आपल्या घरातील पाण्यामध्ये मिसळून स्नान केला तरीही चालते. तसेच मित्रांनो तुम्ही स्नाननंतर ओम नमो नारायणाय या मंत्राचा करत सूर्य देवाला अर्घ्य द्यावे.

पाण्यात तीळ अर्पण करावे. यानंतर पूजा सुरू करा. चरणामृत, पान, तीळ, कुंकुम, फळे, फुले, पंचगव्य, सुपारी, दुर्वा इत्यादी अर्पण करा. शेवटी आरती करून प्रार्थना करायची आहे. पौर्णिमेला चंद्र आणि धनाची देवी माता लक्ष्मीची पूजा करावी.

मित्रांनो, माघ पौर्णिमेला सर्वात महत्वाचा विधी म्हणजे सूर्योदयाच्या वेळी पवित्र नदीत पवित्र स्नान करणे. पवित्र नदीत स्नान केल्यानंतर भगवान विष्णू आणि भगवान हनुमान यांची त्यांच्या प्रमुख देवतेसह पूजा केली जाते. भगवान विष्णूचे भक्त या दिवशी सत्यनारायण व्रत ठेवतात. उपवास करणार्‍यांनी परमेश्वराला अर्पण करण्यासाठी पवित्र राहुन नैवेद्य तयार करावे आणि नंतर सत्यनारायण कथा वाचावी.

यानंतर मित्रांनो, सत्यनारायण पूजा करून फळे, सुपारी, केळीची पाने, मोळी, तीळ, अगरबत्ती आणि चंदन भगवान विष्णूला अर्पण करावे. रात्रीच्या विधींमध्ये चंद्र देवाला अर्घ्य अर्पण करण्याची प्रथा आहे.

तसेच तुम्ही माघ पौर्णिमेला रामायण आणि भगवद्गीता पठण देखील करू शकता. असे केल्याने पुण्य मिळते. याशिवाय ‘अन्न दानला देखील खूपच महत्त्व आहे. या दिवशी अनेक दानधर्म करण्याचे महत्त्व आहे. माघ महिन्यात दान करायला सगळ्यात महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे तीळ. तिळाचे दान केल्याने तुम्हाला चांगले फळ प्राप्त होते. तर मित्रांनो या माघ पौर्णिमेला तुम्ही देखील अश्या पद्धतीने अवश्य पूजा विधी करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *