लिंबू मिरची घराबाहेर लटकवण्यामागे काय आहे वैज्ञानिक कारण?

जरा हटके

नमस्कार मित्रांनो,

आपला देश हा विविध संस्कृती आणि परंपरांचा देश आहे. आपल्या देशात वैज्ञानिक तथ्यापेक्षा जास्त श्रद्धेला प्राधान्य दिले जाते. पण हीच श्रद्धा काही वेळेस अंधश्रद्धा बनते. प्रत्येक व्यक्ती स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी अंधश्रद्धेशी प्रत्येक गोष्ट मान्य करतात.

आपल्यातील माणसांना त्यांना ज्या मध्ये जास्त फायदा दिसतो,या सर्व गोष्टी शुभ किंवा अशुभ मानून त्या नियमांचे पालन करतात.
आपल्या देशामध्ये लिंबू-मिरची एका दोऱ्या मध्ये बांधून घर, दुकान, व ऑफिस च्या बाहेर लटकवून ठेवणे हि एक सामान्य प्रथा आहे.

हि अंधश्रद्धा नसून यामागे पौराणिक कारण सांगितले जाते. या पौराणिक कारणानुसार, दरिद्रिता म्हणजे लक्ष्मीदेवीची मोठी बहीण म्हणूनच तिला जेष्ठ देवी म्हंटले जाते. असे म्हणतात की, ज्या वेळी श्रीहरी विष्णू श्री लक्ष्मी चा विवाह करण्याचे ठरविले, त्यावेळी देवींनी अशी अट घातली होतो की,

पहिला माझ्या जेष्ठ बहिणीचा विवाह झाला पाहिजे, मग त्यावेळी भगवान श्री हरी विष्णूंनी एका मुनींना अलक्ष्मी विवाह करण्यास तयार केले. ज्यावेळेस विवाह नंतर दुःसाह मुनी आपल्या आश्रमात आले तेव्हा, त्यांच्या आश्रमात होम-हवन सुरु होते. ते यमाचे मंत्र उच्चार कानावर पडताच देवी अलक्ष्मी तेथून दूर पळून एका पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसली होती.

तेव्हा देवीने सांगितले की, हे पूजा पाठ बांध झाल्याशिवाय मला आत प्रवेश करता येणार नाही. या पौराणिक कथेवरून समजते कि दारिद्र्य हे ज्या ठिकाणी भगवंताचे पूजन तसेच होम-हवन होत नाही. तेथेच वास करत असते.

याशिवाय अलक्ष्मी पिपळाच्या झाडाखाली वास करत असल्याने, आपल्या हिंदू धर्मात पिंपळाचे झाड घराच्या आस-पास लावले जात नाही. कारण या झाड खाली दारिद्र्याचा वास असतो.
अलक्ष्मी ला तिखट व आंबट पदार्थ खूप आवडतात.

म्हणून आपल्या घरच्या व दुकानाच्या बाहेर लिंबू-मिरच्या बांधून ठेवल्या जातात. साधारणपणे असे सांगितले जाते कि, या लिंबू मिरची मुळे आपल्या घराला दृष्ट लागत नाही पण हा समज चुकीचा आहे . जेव्हा अलक्ष्मी देवी घरात प्रवेश करत असते, ती बाहेरूनच हे लिंबू-मिरच्या खाऊन निघून जाते असे पुराणात सांगितले आहे.

या उलट देवी लक्ष्मी गोड पदार्थासाठी घरात प्रवेश करते. एकदा लक्ष्मी श्री हरी विष्णू सोबत आपल्या बहिणीला भेटण्यासाठी आले, तेव्हा श्री हरी विष्णू ने तिला असा आशीर्वाद दिला कि, हे देवी अलक्ष्मी तुला शनिवारी लक्ष्मीनारायण भेटण्यासाठी आल्यामुळे भविष्यात जो कोणी शनिवारी दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावेल.

त्यांच्या घरी आम्ही दोघे हि कायमचे वास्तव्य करू, तेव्हा पासून शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावला जातो असे सांगितले आहे. परंतु जेष्ठ देवीने सांगितले कि मला सप्ताहातील एक दिवस हक्काचा हवा, त्या दिवशी मी माझ्या पतीसाठी या झाड खाली नृत्य करेन, या दिवशी जर इतर कोणी आमच्या मध्ये आले, तर अलक्ष्मी त्याच्या घरी वास्तव्य करेल.

तेव्हा पासून रविवार हा अलक्ष्मीचा दिवस म्हणून ओळखला जातो.त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जाऊ नये. आणि त्या खाली दिवा लावू नये. आपल्या घरातून पिंपळाचे झाड काढून टाकायचे असेल तर , ते शास्त्राप्रमाणे ते फक्त रविवारी काढावे,

त्याशिवाय ते काढण्यापूर्वी त्याच्या समोर एक लिंबू व सात मिरच्या ठेवून ते झाड काढावे आणि त्या नंतर लगेच तिथे लिंबू चिरावा. त्यामुळे अलक्ष्मी त्या लिंबूचा भाग ग्रहण करून तेथून कायची निघून जाते, त्यानंतर तेथे पुन्हा पिंपळाचे झाड कधी येणार नाही.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *