मित्रांनो दिवाळीच्या या सणांमध्ये लक्ष्मीपूजनाला खूपच विशेष असे स्थान दिले गेलेले आहे. लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर राहावी यासाठी प्रत्येक जण हा मनोभावे व श्रद्धेने लक्ष्मी आणि कुबेर महाराजांची पूजा करीत असतात. यावर्षी 24 ऑक्टोंबर सोमवारच्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे हा दिवस खूपच शुभ मानला जातो. लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. सर्वजण अगदी मनोभावे व श्रद्धेने लक्ष्मी पूजा करीत असतात.
मित्रांनो लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक जण हा प्रयत्न करीत असतो. परंतु मित्रांनो आपल्या काही चुकांमुळे देखील लक्ष्मीमाता आपल्यावर प्रसन्न होत नाही म्हणजे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करीत नाही.
तर मित्रांनो, याच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही कोणालाही ही एक वस्तू देऊ नका. जेणेकरून लक्ष्मी तुमचे घर सोडून जाईल. ही जर वस्तू तुम्ही कोणाला जरी दिली तर तुमच्या घरात कधीच सुख समृद्धी नांदत नाही.
तर मित्रांनो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या वस्तूना खूप महत्त्वाचे स्थान आहे.लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विविध प्रकारे गरीब-श्रीमंत प्रत्येक व्यक्ती लक्ष्मी पूजन करीत असतो. लक्ष्मीला प्रसन्न करून ती आपल्या घरात नांदावी असे प्रत्येकाला वाटत असते.
लक्ष्मीपूजनात कोणत्याही गोष्टीची कमी राहू नये आपल्याकडून कोणतीही चूक होऊ नये असे प्रत्येकाला वाटत असते. तर याच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला एक वस्तू कोणालाही उसनवार द्यायची नाही दिली तर तुम्हाला वर्षभर ती वस्तू तुमच्या हातून जातच राहते. ती वस्तू तुमच्या हातात कधीच टिकून राहणार नाही.
ती वस्तू म्हणजे पैसा. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वजण पैशांचे पूजन करतात तर याच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही कोणालाही पैसे उधार देऊ नये. अगदी एक रुपया देखील.दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही कोणालाही उधार उसनवार पैसे दिलेत तरीदेखील चालतील.परंतु जर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही कोणालाही पैसे दिले तर वर्षभर तुमच्या हातून पैसा सतत निसटत जाईल.
प्रत्येक जण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या पैशाचे पूजन करीत असतात.सतत आपल्या घरी पैसा टिकून राहावी अशी प्रार्थना करतात. बऱ्याच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर तुम्ही पैसे दुसऱ्यांना दिले तर वर्षभर तुम्ही असेच सर्वांना उधार पैसे देत राहणार व तुमच्या घरात पैशाची चणचण भासायला वेळ लागणार नाही.म्हणून मित्रांनो तुम्हीदेखील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणालाही उसनवार पैसे देऊ नका.
टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.