लहान मुलांना चांदीचे दागिने का घालतात?

माहिती

अनेक ठिकाणी बाळांना जन्मानंतर बारशाच्या वेळी विधीपूर्वक पैंजण घालण्याची परंपरा आहे किंवा अनेकदा लहान बाळांना चांदीच्या ताटात जेवण बनवताना आपण पाहतो. पण लहान चांदीचे दागिने घातले जातात? चांदीचे ताट वाटीतून जेवण भरवतात? यामागे शास्त्रीय कारण सांगतल जातं. चला तर मग जाणून घेऊया लहान मुलांना चांदीची दागिने का घालतात.

आपल्या घरांत लहान मुलांचे आगमन झाल्यानंतर आपण त्यांच्यासाठी अत्यंत आवडीने चांदीचे दागिने घेतो. आपले नातेवाईक किंवा घरातील ज्येष्ठ मंडळी आपल्या लहानग्यांना एखाद्या शुभप्रसंगी असे चांदीचे दागिने भेट देतात. हातातल्या चांदीच्या बांगड्या, स्वत कमरेला चांदीचा करगुटा असो, पायात घालायच्या जोडी असो आता जेवणाची भांडी, ही चांदी लहान यांच्या अंगावर अत्यंत शोभून दिसते.

या सोबतच चांदीचे पैजणमुळे निर्माण होणारा आवाज सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा अशा लहान मुलांना स्पर्श करू शकत नाही असं म्हणतात. चांदी या धातूवर अत्यंत महत्त्वाचा धातू मानला गेलाय. स्त्रियांच्या आधी डोक्यापासून ते पायाच्या जोड्या पर्यंत चांदीचे दागिने पाहायला मिळत असतात.

लहान मुलांनाही चांदीचे दागिने बनवले जातात? त्या चांदीचे दागिने लहान मुलांना घालण्याचे महत्त्व म्हणजे त्यामुळे मुलाचे सौंदर्य खुलून दिसतच. त्याचप्रमाणे चांदीच्या ताटात जेवल्यामुळे लहान मुलांचा आरोग्यही उत्तम राहतं. चांदीमुळे लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाला चालना मिळते.

मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. लहान मुलांना अपचनामुळे होणाऱ्या पोटाच्या समस्या सुद्धा कमी होतात, म्हणूनच लहान मुलांना चांदीच्या भांड्यातुन भरवण्यास सांगितले जाते. चांदीला जंतुनाशक धातू मानले जाते. चांदीमध्ये लोकांशी लढण्याची क्षमता असते. चांदीमुळे लहान मुलांची रोगाशी लढण्याची क्षमता सुद्धा वाढते. असं मानलं जातं की, लहान मुलांना घातल्यानं रोग कमी होतात आणि मुले निरोगी राहतात.

तान्या बाळाला चांदीच्या वाटीतून दुधाचा औषध देण्यास काहीच हरकत नाही असं सांगतात. चांदीमध्ये असलेले गुणधर्म चांदीच्या भांड्यातुन अन्नात उतरतात आणि लहान मुलांच्या शरीरात जातात. चांदीचे भांड्यातून लहान मुलांना अन्न दिल्यास मुलांवर त्याचा खास परिणामही होतो.

आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांदीच्या भांड्यातून अन्न खाल्ल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. ज्या व्यक्ती चांदीचे दागिने वापरतात त्यांना उष्णतेचा त्रास होत नाही, म्हणूनच मुलांचा स्वभाव शांत होण्यासाठी चांदीच्या भांड्यात ओतून अन्न दिलं जातं.
चांदीचे दागिने घातल्याने मुलांच्या मानसिक विकासाची कोणतीही कमतरता येत नाही, असा समज आहे.

चांदी धातू हा मनाचा कारक मानला जातो, म्हणूनच त्यांना चांदीचे दागिने घातल्याने त्यांचा मानसिक विकास चांगला होतो आणि त्यांच्या मनावर सकारात्मक परिणाम होतो त्यामुळे लहान मुलांना चांदीच्या बांगड्या आणि पैंजण घातले जातात. ज्योतिष शास्त्रानुसार लहान मुलांनी पायात पैंजण, गळ्यात माळ, हातात चांदीच्या बांगड्या घालणं अत्यंत शुभ मानले जातं.

शिवाय विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर चांदी हा प्रतिक्रियाशिल धातू म्हणाला जातो आणि चांदी शरीरातून सोडलेली ऊर्जा शरीरात परत करते असं सांगितलं जातं. तुम्हीसुद्धा चांदीचे दागिने वापरता का? आणि त्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा..

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *