स्वामी केंद्रानुसार कसे असावे आपले मुख्यद्वार? नक्की जाणून घ्या!

अध्यात्मिक

मित्रांनो आपल्या घराचे मुख्यद्वार स्वामी केंद्रानुसार कसे असावे आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. कारण हे आपले घराचे जे मुख्यद्वार असते. त्या दारातूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा येत असते. त्याचबरोबर दैवी शक्ती व वाईट शक्ती देखील या घराच्या मुख्य दरवाजातूनच घरामध्ये येत असते. त्यामुळे स्वामी केंद्रानुसार आपले मुख्यद्वार कसे असायला पाहिजे.

आपल्या मुख्यद्वाराची आपल्याला कशी काळजी घ्यायला पाहिजे? तसेच कोणकोणते खबरदारी घ्यायला पाहिजे? तेही स्वामी केंद्रानुसार याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये घेणार आहोत. घराच्या मुख्य दरवाज्यातून आपण घरामध्ये प्रवेश करतो त्या दाराच्या चौकटीला बाहेरील बाजूस कवड्याचे तोरण लावायचे आहे. कवड्याचे तोरण लावणे खूप शुभ असते.

यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते व आपल्या घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी, शांतता सर्वकाही लाभते. घराचा मुख्य दरवाजा जो असतो. त्यावर कोणतेही स्टिकर लावायचे नसते. त्याचबरोबर मुख्य दरवाजावर कोणतेही कोरीव काम, नक्षीकाम जास्त प्रमाणात करू नये. घराचा मुख्य दरवाजा हा सुटसुटीत व मोजकेच नक्षीकाम असलेला असावा.

कारण घराचा मुख्य दरवाजा हा आपल्या वास्तूचा चेहरा असतो. म्हणून आपल्या घराला शोभेल असे दार लावावे. आणि आपल्या मुख्य दरवाजाची काळजी घ्यावी. प्रत्येक शनिवारी घराच्या मुख्य दरवाज्यावर गोमूत्र शिंपडावे. त्यामुळे दारावर असलेली नकारात्मक शक्ती वाईट वादा नष्ट होते. दररोज सकाळी उठल्यानंतर दार व उंबरठा स्वच्छ लोटून पुसून घ्यायचा आहे.

उंबरठा स्वच्छ पाण्याने धुऊन हळदीकुंकू लावून त्याची पूजा करावी. व रांगोळी दोन्ही बाजूस स्वस्तिक काढावे. दररोज न चुकता उंबरठ्याची पूजा करावी. सणावाराच्या दिवशी आपण आपल्या दाराला जे फुलाचे तोरण करतो. ते तोरण वाळल्याबरोबर लगेचच काढून टाकावे. वाळलेले तोरण दरवाजाला लावू नये. यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते.

त्याचबरोबर वाळलेली फुले हे दारिद्र्याचे लक्षण असते. त्याचबरोबर घराच्या मुख्य दरवाजावर गणपतीचे फोटो लावावे. तसेच जर आपल्या घराचे मुख्य द्वार दक्षिणेला असेल तर पंचमुखी हनुमानाचा फोटो मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूस लावावा. आणि मुख्य दरवाजावर कुंकवाचे स्वस्तिक काढायचे आहे. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही.

वरील लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही देखील तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याची काळजी घेऊ शकता. व स्वामी केंद्रानुसार आपल्या मुख्य दरवाजाची रचना देखील करू शकता. यामुळे आपल्याला असंख्य लाभ होतील. केंद्रानुसार जर आपले प्रवेशदार असेल तर आपल्या घरामध्ये कशाचीही कमी राहणार नाही. आणि नकारात्मक ऊर्जा देखील येणार नाही यामुळे आपल्या घराचे रक्षण होईल.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *