कोणाच्या घरी मुलगी जन्म घेते? स्वामींनी दिलेले हे उत्तर एकदा नक्की वाचाच!

अध्यात्मिक माहिती वायरल

मित्रांनो, जेव्हा आपल्या घरामध्ये बाळाची चाहूल लागते तेव्हा येणारे बाळ मुलगा असेल तर मुलगी असेल याबद्दलची उत्सुकता अनेकांना लागत असते. काही जण असे असतात की ज्यांना मुलगा किंवा मुलगी दोन्ही चालते किंवा काही जण असे असतात की, त्यांना फक्त मुलगा हवा असतो. परंतु आपल्या आजूबाजूला असे सुद्धा काही जण असे असतात की त्यांना मुलगी हवी असते म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही मुलींविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहे.

मित्रांनो जेव्हा आपल्या घरात मुलगी जन्म घेते ते घर अगदी आनंद, उत्साह आणि चैतन्यमय बनते आणि त्या घरातील सारे दुःख पळून जातात.घरात मुलगी जन्म घेते ते घर अगदी आनंद उत्साही राहते. मित्रांनो ज्या घरात लहान लहान पावलांचा पैंजणांचा आवाज येतो. त्या घरात नेहमी सुख शांती वैभव नांदते आणि सारे दुःख पळून जातात.

मित्रांनो असे म्हटले जाते कि, मुलगी झाली कि लक्ष्मी घरी येते. पहिली बेटी धनाची पेटी. भगवंत सर्वांच्याच घरी मुली पाठवत नाहीत. जे नशीबवान असतात जे मोठ्या मनाचे असतात त्यांच्याच घरी भगवंत मुली पाठवतात. ज्यांचे मन वाईट असते त्यांच्या घरी भगवंत मुली पाठवत नाहीत. ज्यांच्या देण्याची दान करण्याची नीती असते अश्याच घरी मुली जन्म घेतात. त्याचमुळे त्यांना कन्यादानाचे भाग्य मिळते.

मित्रांनो, एकदा स्वामी विवेकानंद वैष्णवी देवीच्या मंदिरात दर्शन करायला जात असताना त्यांना वाटेत एक शेतकरी दिसला. त्यांच्यासोबत 2 मुली दिसल्या. त्यातील जी लहान मुलगी होती ती खांद्यावर बसलेली होती. तर दुसरी मुलगीचा हाथ धरून ते डोंगर चढत होते. तर विवेकानंद त्या शेकऱ्याला म्हणाले कि, बाबा तुम्ही कोठे निघाले आहात? तर त्या शेतकऱ्याने सांगितले, मी देवी आईच्या मंदिरात दर्शनासाठी जात आहे.

त्यावेळी स्वामी विवेक त्यांना म्हणाले, तुम्हाला त्या मुलीचा भार झाला असेल तर असे करा कि तिचा भार माझ्या खान्द्यावर तीला द्या आणि वरती मंदिरात गेले कि मी तिला तुमच्याकडे देतो.

त्यावेळी शेतकऱ्याने खूप सुंदर उत्तर दिले तो म्हणाला, मुलगी कधीही वडिलांच्या खांदयावर भार असत नाही. उलट वडिलांच्या खांदयावर असते तेव्हा ती वडिलांचा भार हलका करीत असते. अश्या असतात मुली. ओझे नसतात. ज्या माणसाला मुली ओझी वाटतात तो मनुष्य बाप असूच शकत नाही. एकवेळ मुलगा आपल्या आईवडिलांना दुःखात पाहू शकतो.

परंतु मुलगी आपल्या आईवडिलांना कधीच नाही. आई वडिलांना थोडेही दुःख झाले तर मुलींचे हृदय कासावीस होते. जोपर्यंत मुलगी घरात असते तोपर्यंत घरात बागडत असते. परंतु एकदा का ती लग्न होऊन सासरी गेली कि, आपण तिची वेळोवेळी आठवण करत राहतो. जोपर्यंत तिचा विवाह होत नाही तोपर्यंत वडिलांसोबत बसून ती जेवण करेल.

वडील कामावरून दमून, भागून आल्यावर ती त्यांना पाणी आणून देईल. त्यांची विचारपूस करेल. काही हवे नको ते पाहिल आणि वडीलांच्या चेहऱ्यावर जरा जरी चिंता दिसल्यास त्यांना कारण विचारेल. मित्रांनो मुलगी म्हणजे वडिलांना आई सारखीच असते. ती त्यांच्या वडिलांची काळजी घेते. वेळप्रसंगी रागावेन तर काही वेळा लाडात येऊन बोलेल. चूक असेल तर त्यांना दाखवून देईल. परंतु ती जर सून असेल तर जितकी काळजी वडिलांची घेईल तितकी सासू सासऱ्यांची घेनार नाही. मुलीला लांब दिले असेल आणि तिला माहेरी येणे जमत नसेल तर ती आपल्या आई वडिलांच्या आठवणीने व्याकुळ होईल.

अशी कोणतीच स्त्री नाही जिला आपल्या आईवडिलांची आठवण येत नाही. मुलीला सासरी जाताना वडील दरवाजाआड राहून रडतात. जोपर्यंत मुलगी घरात आहे तोपर्यंत आनंद साजरा करा. अश्या मुली ज्यांची फक्त देण्याची नीती असते अश्या नशीबवान लोकांच्याच घरी जन्माला येतात. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला स्वामींनी हे एक उत्तर सांगितलेले आहे की, ज्याच्याही घरामध्ये मुलगी जन्म घेते त्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी येत असते. मुलगी घरामध्ये जन्म घेतल्यानंतर घरामध्ये असणाऱ्या सर्व दुःख, अडचणी, समस्या दूर होऊन जातात आणि घरामध्ये समृद्धी येत असते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *