पुरुषांशी संबंध ठेवल्यानंतर ठार मारायची राणी! इतिहासातील सर्वात भयानक राणी!!वाचून अंगावर येईल काटा..

जरा हटके

नमस्कार मंडळी

जगाच्या इतिहासात अशी अनेक व्यक्तिमत्त्व होऊन गेली, जी चांगल्या वाईट कामांसाठी ओळखली जातात. सतराव्या शतकात आफ्रिकेमध्ये (Seventeen Century in Africa) एक अशी राणी (Queen) होऊन गेली की तिचं नाव ऐकलं तरी पुरुषांच्या अंगावर काटा उभा राहतो. कारण ही राणी अनेक पुरुषांशी संबंध ठेवायची आणि त्यानंतर त्यांना ठार मारायची. या राणीची कहाणी आपण जाणून घेणार आहोत.

या राणीचं नाव होतं एनजिंगा एमबांदी! एनजिंगा ही सतराव्या शतकात सध्याचा आफ्रिकी देश असलेल्या ‘अंगोला’ची राणी होती. युरोपीय वसाहतवाल्यांशी तिने तीव्र लढा दिला होता. फक्त लढाच दिला नव्हता तर त्यांच्या नाकीनऊ आणले होते.

काही इतिहास संशोधक एनजिंगाचं वर्णन अतिशय क्रूर आणि सत्तेसाठी लोभी असलेली राणी असं करतात. सत्ता मिळवण्यासाठी तिने स्वतःच्या भावाचीही हत्या घडवून आणली होती. परंतु या राणीच्या इतिहासातील सर्वात चर्चित बाब म्हणजे ही राणी पुरुषांशी संबंध ठेवायची आणि नंतर त्यांना जिवंत जाळून ठार मारायची.

एनजिंगा (Nzigha) ही एमबांदू लोकांचं नेतृत्व करत असे. तत्कालीन दक्षिण-पश्चिमी राष्ट्रे एनदोंगो आणि मतांबाची या देशांची ती राणी होती. पोर्तुगीज या भागाला ‘एनगोला’ नावाने ओळखत. पुढे याच एनगोलाचा अपभ्रंश होऊन अंगोला हा देश अस्तित्वात आला.

पोर्तुगीजांनी सोने-चांदी तसेच इतर नगदी पिकांसाठी या भागांवर हल्ले करायला सुरुवात केली. पोर्तुगीजांनी ब्राझीलमधील आपल्या वसाहतीमधून या भागात गुलाम आणायला सुरुवात केली.

याच काळाच्या सुमारास एनजिंगाचा जन्म झाला होता. तिचे वडील एमबांदी किलुंगी राजा होते आणि ते पोर्तुगीजांशी लढा देत होते. त्यांच्याबरोबर एनजिंगासुद्धा लढत होती. 1617 मध्ये एमबांदी किलुंगी यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा मुलगा म्हणजेच एनजिंगाचा भाऊ एनगोला याच्या हातात एमबांदीची सत्ता आली. पण तो आपल्या वडिलांप्रमाणे शूर आणि बुद्धिमान नव्हता.

शिवाय एनगोलाला संशय होता की त्याची बहिण एनजिंगासोबत असणारे लोक त्याच्याविरोधात कटकारस्थान रचत आहेत. त्यामुळे त्याने एनजिंगाच्या मुलाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. परंतु याकाळात पोर्तुगीज आक्रमणे सातत्याने वाढू लागली. त्यांच्याशी लढण्याची धमक नसल्यामुळे त्याने हे राज्य आपल्या बहिणीशी अर्ध अर्ध वाटून घेतलं. पुढे 1624 च्या दरम्यान एका छोट्या बेटावर तो राहू लागला आणि तिथंच त्याचा अचानक मृत्यू झाला.

आपल्या मुलाच्या हत्येचा बदला म्हणून तसेच पूर्ण राज्य आपल्या अधिपत्याखाली यावे यासाठी एनजिंगाने त्याच्यावर विषप्रयोग केल्याचे बोललं जाते. त्याचवेळी पोर्तुगीज आक्रमणाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचेही बोललं जातं.

एनजिंगा पोर्तुगीज मिशनरीमध्ये राहून पोर्तुगीज भाषा शिकली. त्यांची कामाची पद्धत तिने आत्मसात केली. त्यांच्याबरोबर संबंध चांगले राहावे यासाठी ख्रिश्चन धर्मही स्वीकारला. त्यानंतर तिचे नाव ‘एना डे सुजा’ असे झाले. परंतू तिचे हे संबंध फार काळ टिकले नाहीत आणि त्यांच्यात संघर्ष सुरु झाला. परंतु तिने पोर्तुगीजांना कधीच वरचढ होऊन दिलं नाही.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले DASHING MARATHI   हे फेसबुक पेज नक्की लाईक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *