कसे असावे आपल्या घरातील देवघर? नक्की जाणून घ्या

अध्यात्मिक वास्तूशास्त्र

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये देवघर हे असतेच. आपण दररोज सकाळ संध्याकाळ देवघरामधील देवतांची पूजा अर्चना तसेच आरती करीत असतो. अगदी मनोभावे आणि श्रद्धेने आपण विधिवत पूजा देवघरातील देवतांची करीत असतो. देवघरांमध्ये आपल्या अनेक वेगवेगळ्या देवी देवतांच्या मुर्त्या पाहायला मिळतात आणि या मूर्तींची आपण अगदी मनोभावे आणि श्रद्धेने पूजा करीत असतो.

सकाळी उठल्यानंतर अंघोळ करून झाल्यानंतर प्रत्येक जण आपल्या घरातील देवपूजा ही करतच असतो. आपल्या शास्त्रामध्ये आपल्याला अनेक गोष्टींची माहिती पाहायला मिळते. शास्त्रानुसार आपल्या घरातील देवघर हे कसे असावे? याचीच माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे.

घरातील देवघरांमध्ये असणाऱ्या देवतांची पूजा केल्यानंतर आपणाला एक प्रकारची शांतता लाभत असते. तसेच दररोज देवतांची पूजा केल्याने घरामध्ये सकारात्मकतेचे वातावरण देखील होऊन जाते. तसेच ज्या काही अडीअडचणी असतील, टेन्शन असतील, मानसिक ताण तणाव असेल तो या देवपूजेमुळे पूर्णपणे निघून जातो.

आपल्या शास्त्रामध्ये देवघर हे कोणत्या दिशेला असावे? कशा पद्धतीने आपले देवघर असावे? याची माहिती पाहायला मिळते. तर आपल्या घरातील देवघर हे कसे असावे चला तर मग जाणून घेऊयात. घरातील देवघर हे कोणत्या दिशेला कोणत्या साईडला आहे हे खूपच महत्त्वाचे असते. म्हणजेच यामुळे वास्तुदोष किंवा घरामध्ये असणारे वादविवाद, भांडणतंटे हे सर्व अवलंबून असते.

तर देवघरातील घरातील देवघराची दिशा ही खूपच महत्त्वाची असते. कारण देवघराची जर जागा चुकली तर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे वास्तुदोष देखील निर्माण होऊ शकतात. अनेक अडचणींचा आपणाला सामना देखील करावा लागू शकतो.
तर तुमच्या घरातील देवघर हे जर पूर्वेला असेल तर यामुळे तुम्हाला ऐश्वर्य आणि सुख समाधान प्राप्त होते.

देवघर उत्तर दिशेला असेल तर तुम्हाला सर्व सुखाचा लाभ होऊ शकतो. परंतु जर तुमच्या घरातील देवघर हे दक्षिण दिशेला असेल तर यामुळे तुम्हाला शत्रू पिडा भरपूर प्रमाणात जाणवेल. पश्चिम दिशेला असलेले देवघर हे अजारपण आपल्या घरामध्ये घेऊन येते.

जर तुमच्या घरातील वास्तूच्या आग्नेय दिशेला तुमचे देवघर असेल तर तुम्ही जर घरामध्ये कितीही होम हवन केले तरी देखील हे निष्फळ तुमच्यासाठी ठरते. तसेच आपल्या देवघरांमध्ये देव हे एकमेकांकडे पाहत असतील अशा स्वरूपात अजिबात ठेवायचे नाही. तसेच देव्हाऱ्यामध्ये पैसा देखील आपण लपवून ठेवायचा नाही.

देवघरांमध्ये कमीत कमी मूर्ती तसेच फोटो असावेत. आपले जे इष्ट दैवत आहे तसेच बाळकृष्ण, महादेवाची पिंड आणि गणपती हे देवघरात असणे गरजेचे आहे. देवघरामध्ये एकाच देवांचे दोन किंवा त्याच्यापेक्षा अधिक मुर्त्या अजिबात असू नयेत. संसारी माणसाने मारुती देव हा देव्हाऱ्यामध्ये पुजू नये. कारण त्यामुळे वंश खंडित होऊ शकतो.

घरामध्ये कुठेही मारुतीची मूर्ती असेल तरी चालेल. देव्हाऱ्या मध्ये शनीची पूजा करू नये. यामुळे जीवन संकटमय आणि उदास राहते. देव्हाऱ्यामध्ये म्हसोबा सुद्धा पुजु नये. यामुळे कुलदेवतांचे कृपाछत्र राहत नाही. देव्हाऱ्यामध्ये पूजेच्या मूर्ती तीन इंचापेक्षा जास्त मोठ्या नसू नये. देवघर नेहमी स्वच्छ व सुंदर ठेवावे. सकाळी व संध्याकाळी दिवा व अगरबत्ती नक्की लावावे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *