अंगठी हा जरी दागिन्यांचा एक प्रकार असला तरी ज्योतिष शास्त्रात त्याचा वापर विविध प्रकारच्या रत्नांसाठी केला जातो. ही रत्ने केवळ शोभेची नसून भाग्य ग्रहांना अनुकूल दिशा देणारी असतात. त्यासाठी ज्योतिष शास्त्राने सुचवलेल्या रत्नाची अंगठी घातली जाते. परंतु गेल्या काही काळात या अंगठीवर नक्षीदार कासव का बसल? आणि त्याचा ज्योतिष शास्त्राशी काय संबंध आहे? चला जाणून घेऊया..
असं म्हणतात की, कासव हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि समुद्रमंथनात ते प्राप्त झालं. घरात कासवाचे चिन्ह ठेवणे शुभ मानले जातात. त्या काळात अलंकार रूपात परिधान केल्याने पैशाशी संबंधित सर्व कामे पूर्ण होतात. कासवाची नक्षी असलेली अंगठी घालताना योग्य पद्धतीने घातली पाहिजे आणि तिची दिशा योग्य असली पाहिजे.
जेव्हा जेव्हा आपण कासवाची अंगठी घालतो, तेव्हा कासवाचे डोकं आपल्याकडे आणि शेपटाची बाजू बाहेरील बाजूला पाहिजे. कासव हे माता लक्ष्मीच्या संबंधित असल्याने शुक्रवार हा अंगठी घालण्यासाठी शुभ दिवस मानला जातो तर शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार मानला जातो.
अलंकार म्हणून ही अंगठी वापरत असाल तर धातूचे बंधन नाही. परंतु भाग्यकारक म्हणून तिचा वापर करणार असाल तर मात्र ही अंगठी चांदीमध्ये घडविल्यास जास्त लाभदायी मानली जाते. मात्र, सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही अंगठी कोणत्या बोटात घातली पाहिजे? हे तुम्हाला माहीत आहे का?
शास्त्रानुसार, कासवाच्या अंगठी ही नेहमी अनामिकेत म्हणजेच करंगळीच्या बाजूच्या बोटात परिधान केले पाहिजे तरच ती लाभदायक ठरते. कासवाच्या गतीने का होईना रोज थोडी थोडी प्रगती केली पाहिजे असे म्हणतात. त्यानुसार ही अंगठी आपल्या प्रगतीला निश्चितच हातभार लावेल.
असं जरी असलं तरी जर तुम्ही कासवाची अंगठी भाग्यासाठी घालणार असाल तर तुमचं भाग्य तुम्हाला साथ द्याल म्हणून घालणार असाल तर मात्र तुम्हाला ज्योतिषी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण तुमच्या राशीनुसार तुम्हाला योग्य आहे की नाही या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला ज्योतिष तज्ज्ञांकडून मिळू शकते आणि हो हे सगळे जरी असला तरी आमची घातली आणि चमत्कार झाला आता होत नाही किंवा अंगठी घातली आणि पैशांचा पाऊस पडला असला तर अजिबात होत नाही.
कारण कष्टाला पर्याय नसतो. पण कष्ट करूनही जेव्हा आपल्याला यश मिळत नाही तेव्हा आपल्या मार्गात ग्रह दोष आहे का? वास्तु दोष आहे का? त्याची खातरजमा करून घ्यावी लागते आणि त्यावर उपाय म्हणून अशा प्रकारच्या अंगठ्या घालायलाही सांगितल्या जात आणि मग हे उपाय आपल्याला लागू पडतात. पण कष्ट मात्र त्यास करावे लागतात. कष्ट केल्यानंतर त्या प्रयत्नांना योग्य ते फळ यावं यासाठी हे उपाय आपल्याला मदत करतात..
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.