करपट ढेकर, अपचन, पोट गच्च झाले तर हा एकच उपाय करा, गोळीपेक्षाही फास्ट गॅस बाहेर निघेल.

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

आपल्यापैकी बऱ्याच जणांना कधी ना कधी अपचन, पोटात गॅसेस होऊन पोट दुखायला लागण्याची समस्या जाणवली असेल अशा वेळी पोटदुखीची अनेक कारणे असतात. तुम्ही जर जेवताना वेगाने जेवण करत असाल,

तुम्हाला जर चिंगम खाण्याची जास्त सवय असेल तर तुम्हाला अशी अपचन आणि गॅसेसची समस्या हमखास होते. याशिवाय दोन जेवणाच्या दरम्यानचे अंतर जास्त असणे, गॅसेस उत्पन्न करणारे पदार्थ, तसेच कोबी, मुळा, डाळीचे पदार्थ खाणे, अति प्रमाणात जेवण करणे, धुम्रपान करणे,

मानसिक ताणतणाव या सगळ्या कारणांमुळे अपचन होऊन गॅसेसची समस्या उद्भवते. मित्रांनो सांगायचे तात्पर्य एवढेच की आपण जर या कारणांपासून स्वतःचा बचाव करु शकलात तर तुम्हाला अपचन होणार नाही आणि पोट दुखीची अशी समस्या झाली तर तुम्ही हा घरगुती उपाय करा.

तुमची अपचनाची समस्या नष्ट होईल. हा उपाय कसा बनवायचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचा वापर कसा करायचा हे आज आपण पाहणार आहोत. अपचनावर अतिशय गुणकारी असा हा आजचा उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आवश्यक आहे लिंबू.

मित्रांनो लिंबाचा रस आपली बिघडलेली पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी आणि विशेष करून अपचन नष्ट करण्यासाठी फार गुणकारी औषध आहे. आपण साधारणत: एक चमचा एवढा लिंबाचा रस एक वेळच्या उपायासाठी घ्यायचा आहे. त्यानंतरचा दुसरा घटक म्हणजे काळीमिरी.

गरम मसाल्यातील हा पदार्थ पोटात संबंधीच्या अनेक तक्रारींवर गुणकारी आहे. याशिवाय तुम्हाला भूक लागत नसेल तर अशा वेळी काळीमिरी गुणकारी ठरते. आपण या काळीमिरीची बारीक अशी पावडर तयार घ्यायचे आहे. या पावडरपैकी अगदी थोडीशी म्हणजे दोन चिमटी एवढे पावडर यामध्ये टाकायची आहे.

शेवटचा घटक म्हणजे काळे मीठ. असे मोठ्या आकाराचे खडे मीठ विकत आणून घरीच त्याचे बारीक अशी पावडर तयार करून घ्यायचे आहे. अपचन आणि गॅसेस यांसाठी काळे मीठ अत्यंत उपयुक्त असते. आपण एक ते दोन चिमटे एवढे काळेमीठ घ्यायची आहे.

आपल्याला हे सर्व घटक व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचे आहे. मित्रांनो अपचन आणि गॅसेस होऊ नये म्हणून आपण आपल्या शरीरासाठी आवश्यक एवढेच अन्न खाल्ले पाहिजे. तळलेले मसालेदार पदार्थ खाणे टाळले पाहिजे. दररोज सकाळी किमान अर्धा तास व्यायाम केल्याने देखील फार फायदा होतो.

असे हे तयार केलेले मिश्रण सकाळ संध्याकाळ असे दोन वेळा प्यायचे आहे. एका दिवसाच्या या उपायाने तुमची अपचनाची आणि गॅसेसची समस्या, पोट गच्च होण्याची समस्या पूर्णपणे नष्ट होईल. पण हा उपाय दोन ते तीन दिवस तुम्ही अवश्य करा फरक नक्की जाणवेल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *