कधी आहे भाऊबीज? जाणून घ्या तिथी, महत्त्व आणि भावाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो, आता सगळीकडेच दिवाळीचे वातावरण आहे. दिवाळी हा सण खूपच हिंदू धर्मातील मोठा सण मानला जातो. या दिवशी आपापसातील मतभेद विसरून सर्वजण एकत्र येऊन दिवाळीचा सण साजरा करतात. मित्रांनो यावर्षी दिवाळी ही 24 ऑक्टोंबरला आहे.

दिवाळीमधीलच भाऊबीज हा एक भाऊ बहिणी मधील आपापसातील प्रेम व्यक्त करणारा दिवस आहे. या दिवशी प्रत्येक बहीण ही आपल्या भावाला ओवाळते. तसेच भाऊ देखील आपल्या बहिणीला तिच्या संरक्षणाची जबाबदारी घेतो.

भाऊबीज हा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यंदा तारखांच्या संदर्भात संभ्रमाची स्थिती असून भाऊबीज कोणत्या दिवशी साजरी होणार असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.

पंचांग आणि शास्त्रीय नियमांनुसार यंदा भाऊबीज 26 किंवा 27 ऑक्टोबरला कोणत्या दिवशी साजरी करणे योग्य राहील हे जाणून घेऊया.

पौराणिक कथेनुसार यमद्वितीयाच्या दिवशी म्हणजेच भाऊबीजच्या दिवशी यमराज दुपारी बहिणीच्या घरी आले आणि बहिणीची पूजा स्वीकारून तिच्या घरी जेवले असे मानले जाते. यानंतर वरदानात यमराजांनी यमुनेला यमद्वितीयाच्या दिवशी म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशी जो भाऊ बहिणींच्या घरी येईल आणि बहिणींची पूजा स्वीकारेल तसेच तिच्या हाताने तयार केलेले अन्न खाईल, त्यांना अकाली मृत्यूची भीती राहणार नाही असा आशिर्वाद दिला.यामुळेच यमद्वितीया म्हणजेच भाऊबीज दुपारच्या वेळी साजरी करण्याला अधिक महत्त्व आहे.

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वादशी तिथी ज्या दिवशी दुपारी असते. त्याच दिवशी भाऊबीज सण साजरा करावा असे शास्त्रात सांगितले आहे. या दिवशी यमराज, यमदूत आणि चित्रगुप्त यांची पूजा करावी आणि त्यांच्या नावाने अर्घ्य अर्पण करावे.

या दिवशी दिवे दान करण्याला देखील महत्त्व आहे. परंतु दोन्ही दिवशी दुपारी द्वितीया तिथी असेल तर यम द्वितीया भाऊबीज हा सण द्वितीया तिथीलाच साजरा करावा.

यावर्षी कार्तिक द्वादशी तिथी दोन दिवस आहे. त्यामुळे भाऊबीज देखील 26 आणि 27 ऑक्टोबर या दोन दिवशी आहे. परंतु 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 02.43 वाजेपर्यंत भाऊबीज सण साजरा करणे शुभ राहील. ही तिथी 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 01.18 ते 03.30 पर्यंत असेल. अशा परिस्थितीत 26 ऑक्टोबरला भाऊबीज साजरा करणे शास्त्रानुसार योग्य असेल.

अनेक ठिकाणी लोक उदय तिथीनुसार सण साजरा करतात. अशा परिस्थितीत जिथे लोक उदय तिथी मानतात तिथे 27 ऑक्टोबरला भाऊबीज पूजा केली जाऊ शकते. जे 27 ऑक्टोबर रोजी भाऊबीज साजरी करतील त्यांच्यासाठी शुभ मुहूर्त 11:07 ते 12:46 मिनिटे राहील.

या वर्षी रक्षाबंधनाप्रमाणेच भाऊबीजही दोन दिवस साजरी होणार आहे. 26 ते 27 ऑक्टोबर दरम्यान कोणत्याही दिवशी तुम्ही तुमच्या परंपरेनुसार आणि मान्यतांनुसार भाऊबीज साजरी करू शकता.

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही देखील या शुभ मुहूर्तावर भाऊबीज हा सन अगदी आनंदाने साजरा करा.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *