जीवनात सुख समृद्धी यावी, यश पैसा मिळावा आदी हेतूने अनेक जण रोज आपल्या इष्टदेवतेची पूजा करतात. मनाच्या शांतीसाठी देवाचं नित्य स्मरण केलं जातं. खरं तर प्रत्येक देवतेची पूजा करण्याची पद्धत ही निरनिराळी असते. तुम्ही जर भगवान विष्णूचे भक्त असाल तर तिथे तुळशीला विशेष महत्त्व दिले जाते.
तसेच भगवान शंकराचे भक्त असाल तर पूजा विधीत बेलपत्र, जलाभिषेक याला विशेष महत्त्व दिले जाते. धर्मशास्त्रात नमूद केल्यानुसार देवतांच्या आवडीच्या गोष्टी आपण अर्पण करत असतो. बऱ्याच वेळा आपण देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर ते ताट देवासमोरच ठेवतो पण असं करण चुकीचं ठरतं आणि नंतर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. चला तर मग याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात.
कोणत्याही देवतेची पूजा करताना काही नियम सांगितले गेले आहेत. पूजा विधि करताना या नियमांचे पालन प्रत्येकाने करणे आवश्यक असते. देवाला नैवेद्य अर्पण करण्याचे देखील काही नियम आहेत. पूजा विधी झाल्या नंतर नैवेद्याचे ताट लगेच उचलून बाजूला ठेवावे असे जाणकार सांगतात. हे ताट तसेच देवघरात ठेवले तर घरात नकारात्मक ऊर्जा जास्त वाढते.
सर्वसाधारण पणे पूजा विधी आटोपल्यावर आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो आणि त्यानंतर ते ताट देवा समोरच ठेवतो. हे चुकीच आहे. कारण देवासमोर ठेवलेल्या ताटावर वेगवेगळ्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडत असतो. पण ते ताट लगेच काढून घ्यायला पाहिजे.
जीवनात सुख समृद्धी, पैसा, यश प्राप्त व्हावे दुःख, अडचणी, अनाआरोग्यासारख्या समस्या दूर व्हाव्यात म्हणून आपण देवाची पूजा करतो, त्यांची आराधना करतो. धर्मशास्त्रात या संबंधित काही नियम सांगितले आहेत. देवाला नैवेद्य अर्पण करताना काही गोष्टी ध्यानात घेणे आवश्यक आहे.
नैवेद्य संबंधी नियमांकडे दुर्लक्ष झाले तर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्यावर व आपल्या घरावर होत असतो. देवाला नैवेद्य अर्पण करताना त्यातील पदार्थांमध्ये मीठ किंवा मिरचीचा वापर केलेला नसावा, हे वर्जित मानले जाते. नैवेद्य दाखवताना ताटातील सर्व पदार्थांवर तुळशीपत्र ठेवावं. नैवेद्य दाखवून झाल्यावर नैवेद्याचे ताट पूजा विधी पूर्ण होताच लगेच बाजूला काढावे. देवा समोरील हे ताट तसेच ठेवलं तर यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते.
देवाला नैवेद्य हा सोने, चांदी, पितळच्या ताटात किंवा केळीच्या पानावर वाढावे. हे सर्व धातू नैसर्गिक असून हिंदू धर्मात त्यांना शुद्ध आणि पवित्र मानले गेले आहे. नैवेद्य अर्पण केल्यावर ते ताट देवासमोरून लगेच उचलावे. त्यानंतर तो प्रसाद कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला दिला पाहिजे आणि तुम्ही स्वतः खायला पाहिजे.
काही लोक देवाला नैवेद्य अर्पण केल्यावर ते ताट देवघरातच ठेवतात हे खूप अशुभ मानले जाते. यामुळे घरात वाईट परिणाम भोगावे लागतात, प्रत्येकावर नकारात्मक ऊर्जा समावते. त्यामुळे अशा गोष्टी टाळण्यासाठी धर्मशास्त्रामध्ये सांगितलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे प्रत्येकाने गरजेच आहे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.