मित्रांनो, दिवाळी हा खूप मोठा सण मानला जातो. या दिवशी सगळीकडेच वातावरण खूपच आनंदाचे तसेच प्रसन्नतेचे असते. आपापसातील दुरावा विसरून सर्वजण एकमेकांसोबत प्रेमाने राहताना आपल्याला पाहायला मिळते. अनेक गोडधोड पदार्थ प्रत्येकाच्याच घरी बनवले जातात. दिवाळीच्या दिवशी आपण लक्ष्मी चे पूजन करतो. विविध वस्तूंची खरेदी देखील दिवाळीच्या दिवशी केली जाते. त्यामुळे दिवाळी प्रत्येकाच्या आवडीचा असतो.
प्रत्येक जण दिवाळीसाठी आपले घर स्वच्छ दिसण्याचे प्रयत्न करीत असतो. त्यामुळे सगळीकडे साफसफाई केलेली असते. तर मित्रांनो आज मी तुम्हाला दिवाळीपूर्वी जर तुम्हीही आपल्या घराची स्वच्छता करीत असाल तर तुम्हाला साफसफाई करताना या गोष्टी जर आपल्या घरामध्ये आढळल्या तर या मागच्या संख्येचा विषयी जाणून घेणार आहोत. घराची साफसफाई करताना जर तुम्हाला या गोष्टी जर आढळल्या तर हा मातेने दिलेला आपणाला आशीर्वाद समजावा. यातून मातेने आपल्याला काही शुभ संकेत दिलेले असतात.
चला तर मग पाहूया हा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यातून आपल्याला शुभ संकेत पहावयास मिळतो. जर तुम्हाला घराची स्वच्छता करीत असताना जर तुमच्या एखाद्या पाकिटात किंवा कोणत्याही कपड्यांच्या खिशात पैसे सापडले तर हे खूप शुभ मानले जाते.
त्यामुळे लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. ज्यावेळेस घराची साफसफाई करत असताना बासुरी किंवा मोरपंख सापडले तर हा देखील खूप शुभ संकेत आहे. त्यामुळे आपल्या घरावर लक्ष्मीची कृपा सदैव राहते. लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर असणार आहे हे यातून आपल्याला समजून जाईल.
घराच्या स्वच्छते दरम्यान जर आपणाला लाल कापड दिसले तर ते लाल कापड तसेच तुम्ही सांभाळून ठेवा. कारण या लाल कापडामुळे तुमचा उद्याचा दिवस चांगला जाणार आहे हा संकेत दिला जातो. जर तुम्ही स्वयंपाक घर स्वच्छ करीत असताना तुम्हाला जर पिशवीत तांदूळ सापडले तर ते शुभ मानले जाते. त्यामुळे तुम्ही खूप भाग्यवान आहात हे समजून जावे.
तसेच मित्रांनो तुम्ही तुमच्या घराची साफसफाई करताना तुम्हाला जर शंख किंवा शिंपले जर तुम्हाला सापडले तर ते पाण्याने स्वच्छ धुवून तुम्ही ते तुमच्या तिजोरी किंवा संपत्तीच्या ठिकाणी कुठेही ठेवले तरी चालेल. त्यामुळे घरात सुख, समाधान, ऐश्वर्य प्राप्त होते.
तर अशा काही गोष्टी जर तुम्हाला घराची स्वच्छता करीत असताना जर आढळल्या तर त्याच वेळेस तुम्ही देखील समजून जा कि तुमच्यासाठी हे खूप शुभसंकेत आहेत. म्हणजेच माता लक्ष्मीचा तुमच्या कुटुंबावर कृपा आशीर्वाद असणार आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा आता सामना करावा लागणार नाही मात्र लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न असून त्यांची कृपादृष्टी कायम तुमच्या कुटुंबावर असणार आहे.
टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.