हॉटेल,लॉज, ट्रायल रूममध्ये लपवलेला छुपा कॅमेरा असा ओळखा..

माहिती

आपण काही वेळा कामासाठी किंवा पर्यटनाच्या निमित्ताने आपल्याला देशा-परदेशात प्रवास करावा लागतो. अशावेळी मुक्कामासाठी आपण हॉटेलात राहत असतो. परंतु, अनेकदा हॉटेलच्या रूममध्ये व्यक्तीच्या वैयक्तिक हालचाली टिपण्यासाठी छुपा कॅमेरा बसविण्याची शक्यता असते,मग अशावेळी नक्कीच आपल्या मनात असुरक्षितता निर्माण होत असते.

त्यामुळे, आजकाल असे छुपे कॅमेरा वापरून, महिलांचे किंवा मुलींचे नको असलेल्या अवस्थेतील, फोटो किंवा व्हिडिओ काढले जातात. मग अनेक वेबसाईट्स वर हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याचे अनेक गुन्हे समोर आले आहेत. त्यामुळे प्रवासणानिमित्त,आपण एखाद्या हॉटेलमध्ये किंवा लॉजमध्ये राहत असल्यास, किंवा एखाद्या कपड्याच्या दुकानात ट्रायल रूमचा वापर करीत असाल, तर या गोष्टींकडे अगदी गांभीर्याने लक्ष दिली पाहिजे.

मग अशावेळी, तुम्ही काही टिप्स किंवा उपायानें,ज्याद्वारे तुम्ही ओळखू शकाल की, रूममध्ये किंवा त्या ट्रायल रूम मध्ये छुपा कॅमेरा आहे की नाही.या साध्या-सोप्या टिप्स वापरून, तुम्ही तुमच्या तुमच्या कुटुंबाला संरक्षण करू शकता. यामध्ये एक नंबर टिप्स किंवा उपाय म्हणजे,ज्या रूममध्ये थांबणार आहात, त्या रूममध्ये गेल्यावर,सर्वप्रथम त्या रूमच्या सर्व लाईट्स बंद करा.

आणि मग त्या खोलीमध्ये रेड लाईट किंवा ग्रीन लाईट दिसते का, याची निरीक्षण करावे.जर त्या रूममध्ये लाल कीव हिरव्या रंगाची लाईट चमकत असल्यास, तर तो कॅमेरा असण्याची शक्यता असते. तसेच दुसरा पर्याय म्हणजे, तुम्ही राहत असलेल्या,रूमचा हँडलची तपासणी करा.

कारण एका सर्वेक्षणानुसार, जवळजवळ 50% केसेसमध्ये, या हँडलला हे हिडन कॅमेरा अटॅच केलेले असतो.त्यामुळे त्याचं बारकाईने निरीक्षण केले पाहिजे.याशिवाय तिसरा पर्याय म्हणजे, या हिंडन कॅमेराना एक मायक्रोफोन जोडलेला असल्याने, त्यामुळे या मायक्रोफोनचा अगदी बारीक असा आवाज सतत येत असतो,त्यामुळे रूम मध्ये केल्याबरोबर सर्व लाईट्स बंद करून, अगदी बारकाईने असा आवाज ऐकू येतो का ते पाहावे.

तसेच प्रत्येक रूममध्ये, आरसा असल्याने, विशेष करून आपण कपडे चेंज करतो, त्या ठिकाणी आरसा लावलेला असतो. कधी कधी हा आरसे फसवे असतात,कारण या आरसाच्या मागे हिंडन कॅमेरा असण्याची शक्यता असते.हे ओळखण्यासाठी, आपलं एक बोट त्या आरशावर ठेवा,तेव्हा आपलं बोटांत आणि आरशातील बोटांत फरक किंवा कॅप असल्यास,हा आरसा असतो,याउलट ही दोन्ही बोटे अगदी एकमेकांना चिकतल्यास, हा आरसा नसतो.

तसेच पाचवा रूममध्ये घेल्यास,सर्वप्रथम त्या रूमचे सर्व कोपरे चेक करावे, बरेचसे हिडन कॅमेरे हे कोपऱ्यावरचा लावलेले असतात, त्यामुळे कोपरे अत्यंत बारकाईने पाहावे,तसेच शेवटची टिप्स म्हणजे, आपल्या रूमचा दरवाजाच्या खाली कुठे स्पेस आहे का,हे पाहावे. आजकाल अगदी लहान लहान कॅमेरा,तुम्ही रूममध्ये गेल्यानंतर या दरवाजा खालच्या फटीतून आतमध्ये सरकवले जातात,त्यामुळे आतील सर्व घडामोडी रेकॉर्ड केल्या जाऊ शकतात.

याशिवाय, हिडन कॅमेरा डिटेक्टर नावाचा एक डिवाइस विकत घेतल्यास, हा कॅमेरा तुमच्या रूममध्ये कुठे हिंडन कॅमेरा असल्याची माहिती देईल. हे शक्य नसल्यास, दुसरी गोष्ट म्हणजे काही मोबाईल अप्लिकेशनचा वापर करून तुम्ही असे हिंडन कॅमेरे तपासू शकतात.

याशिवाय एक अतिशय चांगला उपाय म्हणजे, रूममध्ये गेल्यानंतर ,जर तुमच्या मोबाईलचा नेटवर्क येत नासल्यास, तर त्या रूममध्ये 100% कॅमेरा असल्याचे सांगितले जाते. याशिवाय जर आपण रूममध्ये गेल्यावर, कॉल लागत नसेल,तर अशा वेळेस, त्या रूममध्ये हिडन कॅमेरा असल्याचे दिसून येते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *