भगवान शंकर खूपच भोळे आहेत, त्यांना भोळा सांब असेही म्हणतात. मनापासून, पूर्ण श्रद्धेने जर कुणी शिवाची पूजा, आराधना, भजन केले, शिवलिंगावरती शिवाच्या प्रिय वस्तू वाहिल्या तर निश्चितच शिव शंकर प्रसन्न होतात. बऱ्याच स्त्रिया शंकराची उपासना, उपवास करतात, व्रर करतात. साक्षात महादेवाची असीम कृपा त्या व्यक्तीवर असते.
महादेवाची कृपा ज्यांच्यावर असते आशा व्यक्तीची लक्षणे महात्मा विदुर यांनी पुराणात सांगितली आहेत. तसेच या व्यक्तीचे कोणीही नुकसान करु शकत नाही कारण साक्षात देवादीदेव महादेवाची कृपा त्यांच्यावर असते. विदुर हे अत्यंत हुशार, चतुर, ज्ञानी पंडित व्यक्तित्व महाभारतात होते. ते साक्षात यम देवाचा अवतार घेऊन पृथ्वीवर जन्माला आले होते.
त्यांची अगाध नीतिमत्ता व प्रचंड बुद्धिमत्ता होती त्यामुळेच ते हस्तिनापूर चे प्रधान होते व त्यांच्या नितीमध्ये महादेवाचे वरदहस्त असणाऱ्या व्यक्ती त्यानी वर्णन केल्या आहेत. मनुष्य जन्म सुखी व समृद्ध करायचा असेल तर विदूरणीती नक्की वापरा, कारण त्यामुळे आपल्याला आपले भविष्य थोडेतरी जनता येते म्हणजेच आपल्या आजच्या कर्माचा परिणाम थोडक्यात काय असू शकतो,
चूक बरोबर काय असते, आपण कसे वागले पाहिजे हे सारे विदुर नितीमध्ये धर्माचे अगाध ज्ञान असणाऱ्या विदुरानी लिहून ठेवले आहे. ज्या व्यक्ती सामान्य जीवन जगतात, कितीही संपत्ती, धन असले, तरीही त्यांना मोठेपणा वाटत नाही, थोडा सुद्धा अहंकार वाटत नाही उलट सर्वांना मदत करून अशा व्यक्ती पुढे जातात
ज्यांचे मान, लोभ नसतो, अशा व्यक्तींच्या मागे भगवान शंकर उभे असतात त्यांना प्राणी सुद्धा आवडतात व ते माणूस आणि मुक्या प्राण्यांवर कोणताही अन्याय होऊ देत नाहीत. ज्या व्यक्ती खूप धनवान असूनही नम्र असतात, ज्याप्रमाणे नदी स्वतःचे पाणी पीत नाही, वृक्ष फळं खात नाही त्याप्रमाणे शिवाचा वरदहस्त असणाऱ्या व्यक्ती स्वतःसाठी काहीही करत नाहीत करतात तर फक्त परोपकार.
इतरांना मदत करणे, गरिबाला दान, भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी देतात व दुसऱ्यांची सेवा करत, शंभोची उपासना करत जगतात. या व्यक्ती विनम्र असतातच त्यासोबत क्षमाशील देखील असतात, त्यांना राग नसतो, त्या लगेच क्षमा करून टाकतात. तसेच या व्यक्ती मोठ्या धिराच्या असतात, संकटाला धीराने सामोरे जातात व नाशवंत अशा या देहाची, धनाची इच्छा ठेवत नाहीत.
अशा व्यक्तींच्या मागे सदैव भगवान शंकर पाठीशी असतात. या व्यक्ती नेहमी साधी राहणी पसंत करतात, साधे जेवण, सभ्य बोलणे, इतरांचा मान राखणे अशा गोष्टी या व्यक्तींमध्ये दिसून येतात.या व्यक्ती अतिशय शांत स्वभावाच्या असतात त्यांचे वागणे,बोलणे हे समोरच्याला आधार देणारे असते.
टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.