‘हे’ पाच संकेत आपणाला मिळत असतील तर समजा की आपले कुलदैवत आपल्या पाठीशी आहे !

अध्यात्मिक

मित्रांनो मित्रांनो आपले कुलदैवत आपल्या पाठीशी आहे की नाही. कुलदेवता पासून आपणाला आशीर्वाद मिळत आहेत की नाही. घरात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी या आपल्या कुलदैवतापासून घडत आहेत की नाहीत. अशा अनेक गोष्टी आपण विचारत असतो, विचार करत असतो. तर काही मंडळींना चौकशी करून धार्मिक अंदाज बांधण्याची देखील सवय असते.

कारण मित्रांनो कुलदैवत हे आपले रक्षण करते असते. आपल्यावर येणाऱ्या अदृश्य संकटांचा ते सामना करत असते. वाईट शक्तींपासून आपले रक्षण करत असते. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या वाईट शुभ अशुभ घटना ही आपली कुलदैवत पाहत असते आणि वाईट घटनांपासून दूर ठेवत असते चांगल्या घटना घडण्यास मदत करत असते.

मात्र हे सर्व आपले कुलदैवत करत असताना कुलदैवत आपल्या पाठीशी आहे की नाही हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. तर मित्रांनो आपली कुलदैवत आपल्या पाठीशी आहे हे जाणून घेण्यासाठी काही संकेत आम्ही येथे आजच्या या लेखांमध्ये नमूद करत आहोत. हे संकेत आपल्याही बाबतीत घडत असतील तर नक्की समजा की आपली कुलदैवत आपल्या पाठीशी आहे तुम्हाला सदैव आशीर्वाद देत आहे.

चला तर मित्रांनो जाणून घेऊ कोणत्या आहेत ते पाच संकेत.

पहिला संकेत: मित्रांनो आपल्या सोबत आहे की नाही हे जाणण्याचा पहिला संकेत म्हणजे आपण जेव्हा रात्री झोपलेला असतो तेव्हा पहाटेच्या वेळी देवी देवता आपली कुलदैवत आपल्या स्वप्नात येणे हा पहिला संकेत आहे.

दुसरा संकेत: मित्रांनो जेव्हा आपण घरी केव्हा मंदिरामध्ये पूजा करत असतो ना माणूस म्हणून करत असतो अशावेळी कुलदेवतेला किंवा देवाला वाहिनी फुल किंवा माळ आपल्या डोळ्यासमोर खाली पडते तेव्हाही समजावे की आपले कुलदैवत आपल्या सोबत आहे आधी आपल्याला आशीर्वाद देत आहे चांगले होण्याची संकेत देत आहे.

तिसरा संकेत: आपल्या कुलदेवतेचा काही वार असेल उदाहरणार्थ सोमवार मंगळवार गुरुवार रविवार असेच आठवड्याचे सर्वोच्च सर्व वार काही कुलदेवतांचे असतात त्याप्रमाणे समजा आपला देखील कोणता तरी वार आहे आणि त्या दिवशी आपणाला वारंवार आपण जी कडे जाल तिकडे दिवसभरात एकाच वेळी आपल्या कुलीवतेचे दर्शन होणे म्हणजेच कुठे फोटो पाहायला मिळणे तर कुठे मूर्ती पाहायला मिळणे तर कुठे त्या देवाची गाणी ऐका लिहिणे नामस्मरण ऐकायला येणे हा तिसरा संकेत आहे.

चौथा संकेत: मित्रांनो यातील चौथा संकेत म्हणजे आपल्या कुलदेवतेचे जे काही लेणी आहे म्हणजेच गुलाल हळदीकुंकू अबीर हे लवकर संपत नसल्यास किंवा आपण ज्या ठिकाणी किंवा ज्या पाकिटामध्ये बरणीमध्ये ठेवले आहे आणि त्यामध्ये आपणाला काही वेगळ्या प्रकारचे आकार दिसत असतील तर समजावे की आपले कुलदैवत आपल्या सोबत आहे.

पाचवा संकेत : मित्रांनो यातील पाचवा संकेत म्हणजे आपण जेव्हा आपल्या घरातील देव्हाऱ्यामध्ये कळस भरतो आणि त्यावर नारळ ठेवलेला असतो तेव्हा त्यावर कोंब येणे. हो मित्रांनो जेव्हा आपल्या घरातील देव्हाऱ्यामधील कळसाला जेव्हा कोंब येतो तेव्हा समजावे की आपले कुलदैवत आपल्या पाठीशी आहे आपण करत असलेली सर्व पूजा नामस्मरण हे त्यांना मान्य आहे आणि ते आपल्या सदैव पाठीशी आहेत आपले सदैव रक्षण करत आहेत आणि आम्हाला आशीर्वाद देखील देत आहेत.

तर मित्रांनो असे पाच संकेत आपणाला जर दिसले की समजावे आपले कुलदैवत आपल्या पाठीशी आहे. आणि यामुळे आपले तसेच आपल्या कुटुंबाची चांगली रक्षण ते करत आहेत आपल्या कुटुंबाला आपणाला अदृश्य स्वरूपात मार्गदर्शन करत आहेत आणि आपण प्रगती साधता आहोत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. त्याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *