हरतालिकेच्या दिवशी सुवासिनी महिलांनी करावे हे 1 काम, सौभाग्यप्राप्ती होईल…

अध्यात्मिक

आपण जीवनभर अखंड सौभाग्य रहावे, यासाठी हरतालिकेचे व्रत केले जाते. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हे व्रत केलेलं जाते. ‘हर’ हे भगवान शंकराचेच नाव आहे. शंकराची आराधना करण्यात येत असल्याने या व्रतास हरतालिका म्हणून संबोधण्यात येते.हरतालिका व्रत केल्यास, सर्व पापे आणि कौटुंबिक चिंता दूर होण्यास सुरुवात होते.

तसेच हिंदु शास्त्रामध्ये हरतालिकाच्या व्रताबाबत ‘हरित पापान सांसारिकान क्लेशाञ्च’, अर्थात हे व्रत सर्वप्रकारचे दु:ख, कलह, व पापांपासून मुक्ती देते, असे म्हटले आहे. शिव-पार्वतीच्या आराधनेचे हे सौभाग्य व्रत फक्त महिलांसाठी आहे. निर्जला एकादशीप्रमाणेच हरतालिका व्रताच्या दिवशीही उपवास पाळण्यात येतो.तसेच असे सांगितले जाते की,घरातील वैवाहिक महिलांनी हा उपवास,व्रत केल्यास पती दीर्घायुष्य लाभते,आयुष्य वाढेल.

त्यामुळेच हरतालिका हा सुहासिनी महिलांचा आणि ज्या मुलींचे लग्न होणार आहे किंवा कुमारीका मुलीचा खास दिवस मानला जातो. या दिवशी महिला आपल्या पतीसाठी व्रत,पूजा करीत असतात आणि कुमारिका सुद्धा चांगला वर मिळावा, यासाठी हा उपवास करीत असतात. हरतालिका चा दिवस गणपतीच्या एक दिवस येतो.

खूप थोडे दिवस बाकी आहेत,या हरतालिका दिवशी तुम्ही व्रत करत असाल, त्याव्यतिरिक्त जर हरतालिकेच्या दिवशी हे एक काम केल्यास, नक्कीच तुम्हाला सौभाग्य प्राप्ती होईल आणि तुमच्या पतीचे आयुष्य वाढण्यास मदत होईल. मात्र हा उपाय फक्त सुहासिनी महिलांनी करायचा आहे. मुलींनी हा उपाय करायचा नाही.

हा उपाय म्हणजे,महिलांनी हरतालिकेच्या दिवशी कोणत्याही एका सुहासिनी महिलेची ओटी भरायचे आहे. मग यामध्ये आपण किमान कमीत कमी 1 महिलेची ओटी भरायची आहे, मग यानंतर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार त्यापेक्षा जास्त सुद्धा महिलांची ओटी भरू शकतात. फक्त 3, 5 आणि 7 य संख्यामध्ये ओटी भरु नये.

तुम्ही 2, 4 किंवा 11 महिलांची ओटी भरली तरी चालते. ही ओटी तुम्ही सोप्या पद्धतीने भरू शकता.या ओटीमध्ये नारळ देऊ शकता किंवा एखादी फळ देऊ शकतात.तसेच गहू तांदूळ टाकून,त्यामध्ये अकरा रुपये दक्षिणा ठेऊ शकता.तसेच शक्य असल्यास, तुम्ही एखादी साडी देऊ शकतात किंवा ब्लाउज पीस या ओटीमध्ये घालू शकता.

तसेच तुम्ही एखादी सुवासिनी महिला घरी बोलवुन ओटी भरू शकता किंवा जिथे हरतालिकाची पूजा असेल, तिथे तुम्ही त्या महिलेची ओटी भरू शकता. ही ओटी आपल्याला तांदळाने किंवा गव्हाणे भरायची आहे. ओटी भरतांना तुम्ही एखादी फळ आणि अकरा रुपये दक्षिणा सुद्धा ठेवावी, अशा साध्या सरळ पद्धतीने तुम्ही ओटी भरू शकता.

आपण हरतालिकेच्या दिवशी तुमच्या पद्धतीने ओटी नक्की भरली पाहिजे, कारण सुवासिनी महिलेला ओटी कशी भरतात, हे माहिती असते. तुम्ही ही ओटी तुमच्या पतीच्या आयुष्यासाठी ,पतीच्या दीर्घायुष्यासाठी नक्की भरली पाहिजे. कमीत कमी एका महिलेची ओटी भरा, यामध्ये साडी ब्लाउजपीस नाही दिले, तरी चालेल पण गहू तांदूळाने ओटी भरली पाहिजे. या ओटीमध्ये तुम्ही एखादे फळ आणि देवा 11 रुपये दक्षिणा ठेवळूआस तरी चालेल. मग यानंतर तुम्ही हळदीकुंकू करून, अशा रीतीने तुम्ही हरतालिकेच्या दिवशी ओटी अवश्य भरावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *