गुरुपुष्यामृत योगला घरात इथे काढा एक स्वस्तिक, लक्ष्मी धावत येईल!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक कामे करीत असताना शुभ मुहूर्त पाहूनच त्या कामाची सुरुवात केली जाते. आपणाला कामांमध्ये सफलता मिळावी यासाठी आपण योग्य तो मुहूर्त बघूनच त्या कामाची सुरुवात करीत असतो. मित्रांनो हिंदू धर्मामध्ये गुरुपुष्यामृत योग हा देखील खूपच शुभ मानला जातो. हा खूपच दुर्लभ संयोग मानला जातो.

तर तुम्हाला आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास कायम राहावा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये सदैव सुख समाधान नादावे असे जर वाटत असेल तर तुम्ही गुरुपुष्यामृत योग ला एक स्वस्तिक या ठिकाणी काढायचे आहे. ज्यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा वास कायम राहील.

या दिवशी आपण सकाळी लवकर उठावं. आपल्या मुख्य दरवाजासमोर सुंदर अशी रांगोळी काढावी. आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती एक स्वस्तिक सुद्धा नक्की काढा. कुंकवाचा किंवा हळदीचा वापर करून काढलेले हे स्वस्तिक माता लक्ष्मीस आपल्या घराकडे आकर्षित करतात.

या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्या देवघरामध्ये एक श्री यंत्राची स्थापना नक्की करा. जर तुम्ही आपल्या घरामध्ये श्रीयंत्र अजूनही स्थापित केलेले नसेल तर तुम्ही गुरुपुष्यामृत योग ला श्रीयंत्र स्थापन करून माता लक्ष्मीला प्रसन्न करू शकता.

याचे खूपच शुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. तसेच माता लक्ष्मी देखील प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये सदैव त्यांचा वास राहतो आणि घरातील गरिबी दारिद्र्य निघून जाते. गुरुपुष्य अमृत योग दिवशी केलेली माता लक्ष्मीची पूजा ही विशेष फलदायी असते. आपण माता लक्ष्मीची पूजा करा आपली पूजा सकाळी करू शकतात व संध्याकाळी करू शकत नाही.

लक्ष्मीला कमळाचं फूल अत्यंत प्रिय आहे . असेही कमळाचे फूल आणि सफेद मिठाई देवीला नैवेद्य म्हणून मातेस नक्की अर्पण करा. कमळाचे फुल नसेल तर कोणतेही लाल रंगाचे फूल तुम्ही अर्पण करू शकता. गुरुपुष्यामृत योगा मध्ये माता लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीचे पूजन करताना एक मंत्र बोलायचं आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणता मंत्र आपल्याला बोलायचं आहे तो.

”ओम श्रीम् रीह् दारिद्र विनाश् धनधान्य समृद्धी देही देही नमः ” या मंत्राचा एकशे आठ वेळा याचा जप करा. तुम्हाला धनप्राप्तीचे नवीन नवीन योग नक्कीच निर्माण होतील. जे स्वस्तिक आपण आपल्या दरवाजा वर काढले आहे व जी रांगोळी काढली आहे त्यामध्ये लाल रंग भरण्यास विसरू नका. या वस्तू माता लक्ष्मी आपल्या वास्तूकडे आकर्षित करतात.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *